Indrayani Hospital & Cancer Institute , Alandi Devachi,Pune
Indrayani Hospital & Cancer Institute was established in 2008.
आपणा सर्वांना माहीत आहेच की,मार्च अखेर म्हणजे एक आर्थिक वर्षा अखेर आणि नवीन आर्थिक वर्षारंभ.हया कालावधीत बहुतेक सर्व काॅर्पोरेट कंपन्यांकडून टॅक्स भरणा, विविध स्तरांवर सी.एस.आर.वाटपची लगबग असते.
आमच्या आळंदी येथील इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटला देखील विविध कंपन्यांकडून तसेच वैयक्तिक आयकर भरणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर विविध देणग्या किंवा हाॅस्पिटल उपयोगी विविध साधने किंवा आधुनिक मशीन्स नेहमीच मिळत असतात.
यंदाचे वर्षी देखील, वैयक्तिक डोनेशन व्यतिरिक्त, काही महत्त्वाची व जरूरीची रूग्णोपयोगी मशीन्स मिळाली.आमचे आसपास,चाकण तसेच रांजणगाव येथील उद्योजकांतर्फे काही मशीन्स मिळाली.त्यात प्रामुख्याने,मॅमोग्राफी,कलरडोपलर,ओ.टी.टेबल तसेच अॅनेस्टेशियाचे मशीन इ.यांचा समावेश आहे.तर एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून, आमच्या नियोजित,कॅथलॅब प्रोजेक्ट साठी, पूर्ण प्रोजेक्टच्या खर्चाची आर्थिक जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
आज गुढीपाडवा, नवमराठी वर्षाची सुरुवात आणि मुख्य म्हणजे आपल्या प्राणप्रिय, इंद्रायणी कॅन्सर हाॅस्पिटल चा वर्धापनदिन.दि.१ एप्रिल २००८ रोजी याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपले हाॅस्पिटल व त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली होती.त्यानंतर आजपर्यंत हाॅस्पिटल ने , डॉ.संजय देशमुख सर, देशपांडे सर, यांच्या नेतृत्वाखाली जी नेत्रदीपक कामगिरी केलीय ,त्यात आपल्या सर्वांचा देखील मोठा सहभाग आहे.
आज या आपल्या संपूर्ण वाटचालीत अनेकांनी हातभार लावला,हे मान्य करायलाच हवे.
आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आपल्या सर्वांचे अभिनंदन.अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो,हीच सदिच्छा.🙏🙏
ह्या निमित्ताने , डॉ.सोनाली देशमुख मॅडम, डॉ.अस्मा पठाण मॅडम, डॉ.भुषण झाडे सर, डॉ.नितिन गोसावी सर यांचे हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
काल रविवार दि.१७ मार्च रोजी,पुणे शहरातील, टिळक रोडवर असलेल्या, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात, कर्करोगाशी संबंधित एका काॅन्फरन्सचे (CME) आयोजन करण्यात आले होते,तसेच या निमित्ताने, फायनान्सशियल डायरीचे प्रकाशन देखील करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार,सौ.मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.
याप्रसंगी, डॉ.सारडा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवाॅर्ड प्रदान करण्यात आले,हे संपूर्ण वर्ष कर्करोगाशी संबंधित असल्याने, चेअरमन, डॉ.संजय देशमुख,यांनी विविध स्तरांवर,ह्या रोगाशी कशा पद्धतीने लढा देण्यात येत आहे,हेड अॅण्ड नेक चे रूग्ण जास्त आढळून येत असल्याचे सांगितले,तसेच खेडोपाडी देखील यांची संख्या मोठी असल्याचेही सांगितले.ह्यावर सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर,अगदी खेड्यांमध्ये पण आधुनिक पद्धतीने उपचार चालू असल्याचे सांगितले.आळंदीतील,चर्होली सारख्या ग्रामपंचायत हद्दीतील, इंद्रायणी कॅन्सर हाॅस्पिटल मधे देखील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर उपचार चालू असल्याचे सांगितले व उपस्थितांना, त्यासंबंधीची चित्रफीत दाखविण्यात आली.
आज इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल ,आळंदी, पुणे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सौ अपर्णा गणेश दराडे ,प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष असून ,आदिवासी भागातील त्यांचे काम विशेष वाखाणण्याजोगे आहे,तसेच महिला सक्षमीकरण, त्यांना शैक्षणिक व कायदेशीर मदत करणे इ.कामे त्या हिरिरीने करतात.हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर ब्रिगेडियर डॉ.जोशी सर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कर्मचाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.विश्वस्त अनिल पत्की यांनी समयसूचक काही अनुभव सांगितले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती काकड यांनी केले.
काल दि.१५ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर दिनानिमित्त, आमच्या आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर हाॅस्पिटल मधे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री.रवी मेहबुबानी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते ,बाल रूग्णांना भेटवस्तू देण्यात आल्या.मेहबुबानी कुटुंबीयांनी , हाॅस्पिटलला एक अॅनेस्टेशियाचे मशीन भेट म्हणून दिले, हाॅस्पिटलचे मुख्य, डॉ संजय देशमुख सर यांनी सर्वांचे आभार मानले.
आज दि.२६ जानेवारी रोजी ,आळंदी येथील आमच्या इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट मधे, आपल्यादेशाच्या७५व्या प्रजासत्ताकदिना निमित्त ,झेंडावंदनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री.गनबोटे सर उपस्थित होते.सुरवातीस
हाॅस्पिटलचे मुख्य डॉ. संजय देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले ,तर मुकुंद देशपांडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली,त्यानंतर त्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,नंतर नवीन ओ.पी.डी. विभागाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हाॅस्पिटल चे सर्व डाॅक्टर्स , विश्वस्त तसेच स्त्री, पुरुष कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिल पतकी यांनी केले.
आळंदी येथील आमच्या "इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिटय़ुट "मध्ये कार्यरत असलेले #क्लिनिकल ट्रायल # विभागाचे स्थलांतर, आमच्याच हॉस्पिटल च्या अंतर्गत एका प्रशस्त जागेत करण्यात आले.हॉस्पिटल प्रमुख डॉ संजय देशमुख सर यांनी रिबिन कापून शुभेच्छा दिल्या
त्यावेळी उपस्थित रिसर्च विभागातील स्टाफ व हॉस्पिटल कर्मचारी तसेच अधिकारी.
शनिवार दि.१३ जानेवारी रोजी, आळंदी येथील आमच्या "इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट" मधे, दुसऱ्या सायंटिफिक अॅडव्हायजरी कमिटीची,काॅन्फरन्स पार पडली.सदर काॅन्फरन्स मधे,खास निमंत्रित पाहुणे व तज्ञ सल्लागार तसेच हाॅस्पिटलमधील सर्व विभागातील,तज्ञ डॉक्टर्स ह्यांचा समावेश होता.
निमंत्रितांमधे,
१.डॉ.राजेश दिक्षित (टाटा कॅन्सर हाॅस्पिटल, मुंबई )
२.पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर (माजी अध्यक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR).
3.डाॅ.अतुल बुडुख (टाटा कॅन्सर हाॅस्पिटल, मुंबई)
४.डाॅ.रविंद्र गुई (संचालक,साईंटिया क्लिनिकल सर्व्हिसेस)
५.श्री.श्रीराम वेदापुरी (Med.Tech, 3rd Health care,Mumbai)
६ .डाॅ.आशिष अत्रे,(स्टार इमेज ,जोशी हाॅस्पिटल ,पुृणे.)
७.सौ.स्वाती देवळे.(आकार चॅरिटेबल ट्रस्ट)
तसेच हाॅस्पिटलमधील कार्यरत विविध विभागांतील तज्ञ डॉक्टर्स, डॉ.रेवती आर., डॉ.अस्मा पठाण, डॉ.अंजली युनियाल, डॉ.पारूल गुप्ता, डॉ.हेमंत केमकर, डॉ.दिनेश चौधरी.इ.उपस्थित होते.
परिषदेचे निमंत्रक व हाॅस्पिटल चे प्रमुख डॉ.संजय देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून , थोडक्यात प्रास्ताविक केले.त्यानंतर मागच्या परिषदेतील मिनिट्स वाचून दाखवले,त्यास मान्यता मिळाल्यानंतर, पुढील कामकाजास सुरुवात झाली.
हाॅस्पिटलच्या विविध तज्ञ डॉक्टर्सनी आपापल्या विषयांवर विस्तृत प्रेझेंटेशन केले.यावर उपस्थित पाहुणे व इतर डॉक्टर्स यांच्या शंकांना समर्पक उत्तरे दिली.
त्यानंतर, उपस्थित पाहुणे व तज्ञांनी,आपापले अभिप्राय व अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले आणि हाॅस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच रिसर्च टीमचे विशेष अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे निमित्ताने, डॉ राजेश दिक्षित, यांच्या हस्ते HBCR 2021-2022च्या रिपोर्ट च्या ,पुस्तकाचे अनावरण करण्यात आले तर डॉ.रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते वेलनेस पॅकेज च्या माहिती पत्रकाचे अनावरण केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंजिरी जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन, ब्रिगेडियर व मेडिकल डायरेक्टर डॉ जोशीसर यांनी केले.
नाताळच्या स्वागतासाठी "गिफ्ट गिव्हिंग डे" च्या निमित्ताने आमच्या आळंदी येथील इंद्रायणी हाॅस्पिटलमधील बाल कर्करोग विभागाने कॅन्सरग्रस्त बालरूग्णांसाठी ,एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सर्व रुग्णांनी सॅंटाच्या वेशभूषेत, संगीताच्या तालावर नाच व गाणी गाऊन ,आपला आनंद द्विगुणित केला ,तसेच सर्वांना विविध प्रकारची गिफ्टस व खाऊ,चाॅकलेट इ. वाटण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला, हाॅस्पिटल चे प्रमुख डॉ संजय देशमुख सर यांचे हस्ते केक कापण्यात आला,तसेच नर्सिंग विभागाच्या नर्सेस ने ,नाताळची विशेष गाणी गायली.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=7384516464932554&id=100001228210549&mibextid=Nif5oz
आमच्या आळंदी येथील इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये यंदाची दिवाळी आम्ही एका वेगळ्या पद्धतीने साजरी केली.आपणास माहीत असेलच की, सप्टेंबर २०२२ पासून आमच्या हाॅस्पिटल मधे बालकर्करोग विभाग सुरू केला आहे.पुरूष ,महिलांबरोबरच आता बिचार्या बाल गोपाळांना सुध्दा हा रोग आता मोठ्या प्रमाणावर आपले अस्तित्व दाखवू लागलाय.
२ते ३ महिन्यांच्या लहान बाळांपासून ते १५-१६ वयोगटात देखील,ह्या दुष्टचक्रात अनेक जीव सापडत आहेत.
कॅन्सरच्या विविध तपासण्या,त्यावरील उपचारांसाठी, ३/४ महिन्यांच्या ,तो बरा होईपर्यंतच्या हाॅस्पिटलच्या फेर्या, यामुळे बिचारे खुपच त्रासलेले असतात, आणि खुप कंटाळतात त्यामुळे चिडकेपणा काही वेळा आक्रमकपणा देखील वाढतो.
या सर्वांचा विचार करून, आमच्या हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ संजय देशमुख सर यांचे नेतृत्वाखाली व कर्करोग विभागातील, डॉ.रेवती, ब्रिगेडियर डॉ.जोशी सर तसेच ज्योती इ.नी, वर्षभरासाठी काही कार्यक्रमांची आखणी केली व या बालरूग्णांना,नुसता मानसिक आधारच नाही,तर सर्व सणांच्या निमित्ताने,ते साजरे करायचे ठरवले.याअंतर्गत, दहीहंडी, नवरात्रातील गरबा, विविध प्रकारची खेळणी,खेळ ,चित्रकला, रांगोळी, पेंटिंग इ.
अशाच प्रकारे आम्ही दिपावलीच्या पार्श्वभूमीवर,ह्या बालगोपाळांसाठी विविध प्रकारच्या पणत्या आणून त्यावर पेंटिंग करायला शिकवले,अगदी उत्साहाने सर्वांनी आपला सहभाग नोंदवला व त्याचा आनंद लुटला, आपल्या पाल्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून, त्यांच्या पालकांना देखील खुप आनंद झाला.सोबत सर्वांना गोड ड्रायफूट ची साथ होतीच.
कॅन्सरच्या उपचारांबरोबरच , त्यांच्या मध्ये, क्रिएटिव्हीटी कशी वाढवायची जेणेकरून आपल्या रोगाला व त्यावरील कंटाळवाण्या उपचारांचा त्यांना विसर पडेल व पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने चालवतील.असा एक छोटा प्रयत्न आम्ही करतो.
काल खंडेनवमी व आज दसऱ्याच्या निमित्ताने आळंदी येथील आमच्या इंद्रायणी हाॅस्पिटल मधे रेडिएशन, केमोथेरपी, आॅपरेएशन थिएटर,एण्डोस्कोपी,सी.टी.स्कॅन,पेडियॅट्रीक,हिस्टोलॅब,लाॅंड्री आणि अॅंम्ब्युलन्स अशा सर्वांचे पुजन, विविध डॉक्टर्स, विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आले.
आज ,श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने, आळंदी येथील आमच्या "इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट" मधे,बालकैन्सर विभागातील,बालगोपाळांसाठी दहीहंडी च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ह्याप्रसंगी सर्वच गोपाळांनी हंडी फोडली, नंतर झालेल्या कार्यक्रमात, त्यांनी चित्रं काढली.ह्या कार्यक्रमाचे आयोजन, हाॅस्पिटलच्या बालकर्करोग विभागाने केले होते.ह्याप्रसंगी, हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ संजय देशमुखसर, डॉ.भुषण झाडेसर विश्वस्त अनिल पत्की, डॉ.नितीन गोसावी, डॉ.रेवती,ज्योती व इतर स्टाफ तसेच रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते
काल दि.१५ आॅगस्ट रोजी, आळंदी येथील आमच्या इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट मधे ,आपला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे,शिरोडकर प्रेसिकाॅम प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर व व्यवस्थापकीय संचालक , श्री.मनोज शिरोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.हाॅस्पिटलचे प्रमुख व प्रसिद्ध कॅन्सर सर्जन, डॉ संजय देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्योती कक्कड यांनी केले.
आज दि.२७जुलै रोजी,पी.एम.पी.एम.एल तर्फे, आळंदी -चाकण-आळंदी मार्ग क्र.३६४ अशी बससेवा सुरू करण्यात आली.ह्या निमित्ताने,ह्या रस्त्यावरील वाढलेल्या वस्तीतील नागरिकांसाठी तसेच इंद्रायणी कॅन्सर हाॅस्पिटलला नियमित, उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची खुपचं सोय झाली.
सदर बसची पहिली फेरी असल्याने, इंद्रायणी हाॅस्पिटल च्या वतीने, हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय देशमुख सर,यांचे हस्ते गाडीचे पूजन करण्यात येऊन,वाहक व चालक ह्यांचा फेटा घालून सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी श्री.विजय मदगे डेपो मॅनेजर,भोसरी , बबनराव कुर्हाडे, अरुण घुंडरे,आप संघटनेचे कार्यकर्ते व हाॅस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
17 जून 2023 रोजी इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी तर्फे कॅन्सर नोंदणीवर एक वैज्ञानिक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे प्रमुख पाहुणे टाटा मेमोरिअल सेंटर, सेंटर फॉर कॅन्सर, मुंबई. एपिडेमिओलॉजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. अतुल बुडूख होते. या सत्रात कर्करोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.
डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, चे सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ समीर गुप्ता, आणि असिस्टेंट प्राध्यापक डॉ प्रशांत चंद्रा उपस्थित होते.
आदित्य बिर्ला रुग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, डॉ. अजिता केंद्रे-चंद्रा उपस्थित होते. तसेच रुबी हॉल क्लीनिक च्या डेप्युटी जनरल मॅनेजर शुभदा कुझ, उपस्थित होत्या. व्याख्यान प्रामुख्याने कर्करोग नोंदणीचे महत्त्व आणि कर्करोग नियंत्रणात त्याचा उपयोग यावर केंद्रित होते. या सत्रामध्ये एकूण 40 जणांची उपस्थिती होती.
हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ संजय देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले , पाहुण्यांची ओळख व सुत्रसंचलन अनुक्रमे, डॉ.नितिन गोसावी व डॉ.मंजिरी जोशी यांनी केले, आभारप्रदर्शन, ब्रिगेडियर डॉ.जोशी यांनी केले.
Indrayani Hospital & Cancer Institute , Alandi Devachi,Pune film
आपल्या इंद्रायणी हाॅस्पिटलला,आपण देत असलेल्या रूग्णसेवेने प्रभावित होऊन, समाजातील अनेक घटक आपापल्या परीने , आपल्या हाॅस्पिटलला काहीं ना काही तरी मदत नेहमीच करीत असतात,पण उपचार घेत असलेल्या, श्री.सदात अली सय्यद या रुग्णानेच ,गरीब रुग्णांचे मदती साठी दिलेली आर्थिक मदत हे एक वेगळेच योगदान आहे, सध्या चालू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान च्या पार्श्वभूमीवर ही मदत विशेष पुण्याची म्हटली पाहिजे.त्यासाठी विशेष आभार .
हाॅस्पिटलच्यावतीने मुख्य विश्वस्त व कैन्सर सर्जन डॉ संजय देशमुख यांनी ते योगदान स्वीकारले, त्या प्रसंगी, रूग्णाचे नातेवाईक व मेडिकल डायरेक्ट र ब्रिगेडियर डॉ.जोशी उपस्थित होते
आज गुढीपाडवा, आमच्या इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिटय़ूट चा वर्धापनदिन,
त्या निमित्ताने,आमच्या हॉस्पिटलच्या रूग्णांच्या सेवेसाठी,शरीराच्या अंतर्गत विविध तपासण्यांसाठी तसेच काही उपचारार्थ अशा दुहेरी उद्देशांसाठी एक इंडोस्कोपी चे मशीन बसवण्यात आले.या मशीनच्या सहाय्याने,शरीराच्या अंतर्गत भागात ,कोठे कॅन्सर आहे का,तसेच कोठे रक्तस्त्राव होतो का किंवा सर्व अवयवांची पहाणी व तपासणी करणे आणि या सर्वांवरील उपचार अशा प्रकारची दुहेरी कामे मशीन द्वारे केली जातात.मित्रांनो सर्वसाधारण पणे ह्या चाचण्यांना, बाहेर 10 ते 15 हजार रूपये आकारणी केली जाते.
सदरील मशीन चे उदघाटन, सुभाष केमिकल इंडस्ट्रीज प्रा.लि.चे संचालक,श्री.किशोर झंवर यांचे हस्ते पार पडले.अध्यक्ष स्थानी ,डॉक्टर सुनिल पाठक,जेष्ठ आयकर सल्लागार होते.
आमच्या हॉस्पिटल मधे,केमोथेरपी या उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खुपच वाढत आहे ,त्यासाठीची वेटिंग लिस्ट पण खुप मोठी आहे,त्यासाठी वाढीव जागेची गरज भागवण्यासाठी,आणखी 2 मजले वाढीव बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ, श्री.मोनेसर ,प्रसिध्द स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीस,विश्वस्त व सिव्हिल इंजिनिअर श्री.मुकुंद देशपांडे यांचे हस्ते गुढीपूजन करण्यात आले.
हॉस्पिटल चे मुख्य विश्वस्त व कॅन्सर सर्जन ,डाॅ.संजय देशमुख सर यांनी सर्वांचे स्वागत केले.
आज,जागतिकमहिला दिनानिमित्त, आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सुप्रसिद्ध अर्थतज्ञ व आखिल भारतीय भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष राहीलेल्या तसेच अर्थशास्त्रात लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मधून एम.एस.सी. (अर्थशास्त्र).पदवी घेऊन, १९८२ – १९९४ या कालावधीत इंडसर्च, यशदा आणि महाऊर्जा ह्या ठिकाणी वरिष्ठ पदावर असलेल्या,डॉक्टर किरणताई मोघे,ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, सध्या अखिल भारतीय घरेलु कामगार समन्वय समिती (सीटू) च्या सचिव आहेत.हॉस्पिटलच्या विश्वस्त व ऑन्को रेडिओलाॅजीस्ट डॉक्टर सोनाली देशमुख यांनी ,त्यांचे स्वागत केले. उपस्थित डॉक्टर मंजिरी जोशी,डाॅ.दर्शना,डाॅ.रेवती,डाॅअस्मा पठाण, ज्योती कक्कड यांनी ,दिप प्रज्वलित केल्यावर, डाॅ.रेवती यांनी सरस्वतीपूजनाचे गीत सादर केले.त्यानंतर, सर्वांची भाषणे झाली,
सूत्रसंचालन, डाॅ.मंजिरी जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन ज्योती कक्कड यांनी केले.
इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी येथे कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन अक्सिलेटर मशीन बसवण्यात आले. आज या मशिनचे लोकार्पण बजाज फिंसर्वच्या सीएसआर चेअरमन श्रीमती शेफाली बजाज यांच्या हस्ते कऱण्यात आले. या प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, अजय साठे ,हॉस्पिटल चे मुख्य डाॅ.संजय देशमुख,सचिव मुकुंद देशपांडे,डाॅ.सोनाली देशमुख व अनिल पतकी विश्वस्त,ब्रिगेडियर डाॅ.राजीव जोशीसर, रेडिएशन विभागातील, डॉक्टर भुषण झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम, राज्याचे सचिव डॉक्टर नितीन करीर, यांचे हस्ते ,वृक्षारोपण करण्यात आले.या वेळेस, हॉस्पिटल च्या संपूर्ण वाटचालीवर आधारित एक छोटी फिल्म प्रदर्शित करण्यात आली
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Address
412105
The Hand Surgery Clinics, 81/A/11 Giridarshan Society, Baner Road, Behind Nexa Showroom
Pune, 411007
We are a dedicated team of expert surgeons & associates, trained extensively at curing injuries and
Koregao Park
Pune, 411001
Dr. Passang is known in India and Europe for promoting acupuncture and is on the board of many healt
KHETMALAS HOSPITAL, Lane-3, Gajanan Maharaj Society, Near Shantinagar, Gangadham/Iskcon Road, Kondhwa BK
Pune, 411048
khetmalas hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy is dedicated to womens health under one roof.
3rd Floor, Wing A, Todkar Garden, New Bibwewadi Kondhwa Road
Pune, 411037
Established in the year 2002, Harsh Hospital has made an exceptional name in the city. Hospital is l
Ganesham Commercial, A Building, 1st, 3rd & 4th Floor, Nashik Phata Road, Near Govind Yashada Chowk, Sai Nagar Park, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad
Pune, 411027
Delivering premier care in Pimple Saudagar: Expertise in cardiology, pediatrics, and surgery. 🏥
Sr No 50/1/1 'Ghodake Complex' D. P Road, Kate Puram Chowk, Pimple Gurav
Pune, 411061
Multispeciality & Trauma Centre
388, Opp. Yamunanagar Bajaj Material Gate, Kounteya Housing Society
Pune, 411044
Pioneer of this center Vaidya Atul J. Kale is working in this field since15 years. He has completed
Unity Hospital/Orthopaedic & Gynaecology Multispeciality Hospital
Pune, 411007
Highly skilled, experienced, and specialist by training Dr. Amit Kale and Dr. Preeti A Kale strive to
Sr No. 530/1, Paud Road, Bhugaon
Pune, 412115
Accident & Maternity Specialty Hospital
Rajmata Colony Katraj Kondhwa Road Near Iskon Temple Kondhwa
Pune, 411037
We are providing healthcare service in Pune.