AtulDangat
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AtulDangat, Public Service, SNO. 5, Datta narmada complex, Near talati office, Navbharat High School, Shivane, Pune.
CityPride Multiplexes Pawankhind - पावनखिंड AtulDangat
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांनी गाजविलेला थोर पराक्रम ⚔️आपल्या घराघरात पोहोचावा याच उद्देशानं आणि शिवजयंतीच्या निमित्तानं सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित, दिगपाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित पावनखिंड हा चित्रपट 🎥आपल्या प्रभागातील जनतेला माझ्यातर्फे AtulDangat मोफत दाखविण्यात येणार आहे.
कोथरूड येथील सिटी प्राईड CityPride Multiplexes या चित्रपटगृहात दिनांक २८ फेब्रुवारी आणि १,२,३ मार्च या कालावधीत पावनखिंड Pawankhind - पावनखिंड या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक नागरिकांनी या चित्रपटाचे मोफत पासेस माझ्या शिवणे येथील कार्यालयातून मिळवावेत असे आवाहन मी करत आहे.
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे
शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा १४४ वा प्रकटदिन 🌺🌺🌺.
आजचा दिवस शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने किर्तन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यंदाच्या प्रकट दिनाचे वैशिष्ट्ये म्हणजे या वर्षी “श्रीं”च्या प्रकटदिनाची तारीख आणि तिथी एकाच दिवशी आली आहे. हा योगायोग अनेक वर्षांनंतर जुळून आलाय.
याच विशेष दिनी मला AtulDangatशिवणे येथील शोभा हाईट्स येथे संत श्री गजानन महाराजांची आरती करण्याचे भाग्य लाभले.
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे #गजानन
जे कार्य जनहिताचे आहे ते कार्य करण्यास, तसे निर्णय घेण्यास मी AtulDangat नेहमीच तत्पर असतो.
दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, शिवणे येथील माझ्या कार्यालयात मोफत सुकन्या समृद्धी योजना Ministry of Women & Child Development, Government of India खाते सुरू करण्याचा आणि मोफत नवीन आधार कार्ड दुरुस्ती Aadhaar व लिंक करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचे टोकन शिवणे येथील माझ्याच कार्यालयात दिनांक १० फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत उपलब्ध होणार असून या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मी अतुल दिगंबर दांगट करीत आहे.
Election Commission of India Income Tax India India Post Beti Bachao Beti Padhao Vikas Dangat
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे
आज ११ फेब्रुवारी
आमच्या कुटुंबासाठी आणि खासकरून माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस.
आज माझे बंधू मा. श्री. विकास बाळासाहेब दांगट Vikas Dangat यांचा जन्मदिवस 🎂.
प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या पाठीमागे भक्कम उभा राहणारे , सुखदुःखात माझी साथ देणारे, राजकारणा पलीकडे जाऊन लोकांची सेवा करणारे माझे मोठे बंधू आणि शिवणे गावचे उपसरपंच यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 💐💐
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे
पुणे महानगरपालिकेमध्ये PMC Puneनव्याने समाविष्ट 23 गावातील कर्मचारी यांच्या संदर्भात मा. आयुक्तनी जो अन्यायकारक निर्णय घेतला होता .
त्यासंदर्भात माननीय सचिन भाऊ दोडके Sachin Shivajirao Dodke यांनी याबद्दल माननीय शरदचंद्रजी पवार साहेब Sharad Pawar व मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब Ajit Pawar यांच्याकडे या कर्मचाऱ्यांची बाजू मांडली यांची बाजू ऐकून घेऊन दोघांनी माननीय विभागीय आयुक्त सौरभ राव साहेब यांनी जो या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना त्यांचे योग्य ते म्हणणे मांडायचे पूर्ण अधिकार देऊ असे आश्वासन दिले.
मा. आयुक्त विक्रम कुमार साहेब व मा. विभागीय आयुक्त सौरभ राव साहेब यांनी पुढील कार्यवाही साठी मा. उपायुक्त उदय पाटील साहेब यांची नियुक्ती केली .मा. आयुक्त व मा. विभागीय आयुक्त यांना निवेदन देताना नगरसेवक सचिन भाऊ दोडके, युवा नेते अतुल दिगंबर दांगट AtulDangat , सरपंच नितीन शेठ धावडे सरपंच नितीन शिवाजी धावडे पाटील , युवा नेते राहुल शेठ घुले ,अमित चोरगे व विकास दांगट Vikas Dangat उपस्थित होते.
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #आपलं_वारजे
आज पुणे मेट्रो Pune Metro Rail Project शहराच्या सर्वच भागातून जाणार आहे .
तीच मेट्रो आपल्या शिवणे, उत्तमनगर , कोंढवे धावडे व कोपरे या नवीन समाविष्ट गावांमधूनही धावली पाहिजे यासाठी मी सतत पाठपुरावा करीत होतो. याच कार्याचा एक भाग म्हणून आज दुसऱ्या टप्प्यात माती परीक्षण (SOIL TEST) देशमुख वाडी येथील लक्ष्मी प्रॉपर्टी समोर येथे पार पडले.
याप्रसंगी माझ्या बरोबर रवींद्र पाटीलबुवा दांगट(सुप्रिडेट सेंट्रल एक्साईज) Ravi Dangat Patill, शिवसेना विभागप्रमुख सतिश दांगट ,
मा. महेंद्र दांगट Mahendra Dangat ,मा.उपसरपंच अनिल देशमुख , मा. विकास दांगट Vikas Dangat, मा. सचिन देशमुख,मा. राऊत काका, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 🚅🚈
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
भारताच्या 🇮🇳 स्वातंत्र्य संग्रामातील महानायक लाला लजपतराय यांची जयंती!
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल – बाल – पाल या तीन प्रमुख नायकांपैकी एक.
या त्रिकोणातील प्रसिध्द लाला लजपतराय केवळ एक निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हें तर एक उत्तम लेखक 🖊 , वकील 👨🎓, समाज – सुधारक आणि आर्य समाज देखील होते.
ब्रिटीश सरकार विरूध्द शक्तिशाली भाषण देत त्यांना हादरवुन सोडणारे
लाला लजपतराय यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पाहाता त्यांना ’पंजाब केसरी’ आणि ‘पंजाब चा सिंह’ देखील म्हंटल्या जायचे.
असे थोर महानायक लाला लजपतराय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#जन्मदिन #अभिवादन
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
#प्रजासत्ताकदिन #गणतंत्रदिवस
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
पुणे महानगरपालिका PMC Pune प्रशासनाने समाविष्ट ३४ गावानां टँकरने होणारा पाणी पुरवठा 🚰 गेले ७ दिवसापासून बंद केला होता.
त्याच्या निषेध म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका भवनाच्या दालनात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप Prashant Jagtap - Pune याच्यां नेतृत्वात आदोंलन करण्यात आले. याप्रसंगी सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांद्वारे तीव्र निषेध करण्यात आला.
सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवून ते पाणी टँकर पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
Sachin Shivajirao Dodke Vikas Dangat
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज २५ जानेवारी
राष्ट्रीय मतदार दिवस.
एक मतदार 🗳️ म्हणून नागरिकांना याबाबत जागरुक करणं हा त्यामागचा मुख्य हेतू. भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे.
त्याही अधिकाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही.लोकशाही राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या या राष्ट्रात मतदारांचं महत्त्व फार मोठं आहे.
एक सजक मतदार म्हणून आपले कर्तव्य बजवूया.
सर्वांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Election Commission of India
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज २४ जानेवारी २०२२
राष्ट्रीय कन्या दिवस 👭👧
देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो
चला मुलींना, महिलांना त्याचे असलेले हक्क, अधिकार याबाबत जागृत करूया.
आजही समाजात मुलींसोबत होत असलेले भेदभाव नष्ट करूया.
समाजात मुलगा-मुलगी यांच्याकडे समान दृष्टीकोनातून बघण्याचा दृष्टीकोन तयार करूया. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आज मुलींना सक्षम करूया. Beti Bachao Beti Padhao
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज २३ जानेवारी
स्वातंत्र्य काळातील अग्रगण्य नेते आदरणीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!” असे घोषवाक्ये देणारे स्वातंत्र्य काळातील प्रमुख नेते सुभाषचंद्र बोस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले.
नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा होती, ज्याने अनेक देशप्रेमी तरूणांच्या मनात जोश निर्माण झाला.
सुभाषचंद्र बोस हे आपल्या दृढ संकल्प आणि कधीही तडजोड न करणाच्या विचारांनी ओळखले जातात.
असे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! 🌺🌺🌺
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
२३ जानेवारी
म्हणजेच मराठी माणसांचा आवाज बुलंदपणे जगभर पोहोचणारे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अनेक वर्षे वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व.
वक्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली.
क्रांतिकारी निर्णयाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेबांचे नाव महाराष्ट्राच्या सत्तापटलावर कायमचे कोरले गेले आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙏🙏
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
आज २१ जानेवारी २०२२,
संकष्ठी चतुर्थी.
गणपती बाप्पा तुझ्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार.
सगळ्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदुदे
हेच तुला मागणे.
बाप्पा तू भक्तांच्या पाठीराखा आहेस, माय, बाप, बंधू,सखा सार काही तूच आहेस.
चराचरात तुझी महिमा,पूर्ण होउ दे मनोकामना.
सर्व गणेशभक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺🌺🌺
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
नुकतेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण 💉 सुरु करण्यात आले आहे.
शिवणे येथील नवभारत हायस्कुल येथे सुद्धा ही मोहीम राबविण्यात यावी याकरिता मी AtulDangat स्वतः पाठपुरावा केला होता.
त्या पाठपुराव्याला यश आले असून आज नवभारत हायस्कुल, शिवणे १५ ते १८ वयोगटातील तब्बल २०० विद्यार्थ्यांना कोव्हॉक्सीनचा पहिला डोस देण्यात आला.
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज १९ जानेवारी
मेवाडचे शूर पराक्रमी राजे महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी.
राजस्थानची भूमी कायम वीरांची आणि महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली गेली आहे.
त्याच वीरांपैकी एक म्हणजे महाराणा प्रताप. 1576 मध्ये हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये असे युद्ध ⚒️ झाले होते, जे संपूर्ण जगासाठी आजही आदर्श आहे. महाराणा प्रताप यांनी अत्यंत शक्तीशाली अशा मोगल बादशाह अकबराच्या 85000 सैनिकांच्या विशाल सैन्या समोर आपल्या केवळ 20000 सैनिक आणि तोकड्या शास्त्रांच्या आधारे अनेक वर्षे संघर्ष केला.
सलग 30 वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही. असे वीर राजे महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺🌺🌺
#वीर_शिरोमणि_महाराणा_प्रताप
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
पुणे मनपात नव्याने समाविष्ट 23 गावातील कर्मचाऱ्यांचा लढा💪🏻⏰
मा. सुप्रियाताई सुळे Supriya Sule यांना पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 23 गावातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवणे येथे निवेदन देण्यात आले होते . त्या अनुषंगाने पुणे मनपा PMC Pune चे आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयात काल सकाळी अकरा वाजता मा. नगरसेवक सचिनभाऊ दोडके यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग आयोजित केली होती.
त्यावेळी आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन ज्या कामगारांवर जिल्हा परिषदने Pune Zilla Parishad सादर केलेल्या अहवालात अन्याय झालेला आहे त्या सर्वांनी वैयक्तिक अर्ज 📄 करावा अशी मा.आयुक्तांनी मागणी केली व त्या सर्वांच्या अहवालाची फेरतपासणी करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त साहेबांनी या मीटिंगमध्ये दिले .
त्यावेळी नगरसेवक सचिनभाऊ दोडके Sachin Shivajirao Dodke,अतुल दिगंबर दांगट AtulDangat, समीरशेठ जाधवराव ,सौरभ नाना मते सरपंच सौरभनाना मते उपस्थित होते .
सदैव आपलाच- अतुल दिगंबर दांगट⏰
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज 'सेल्फी' 🤳 घेणं हे अनेकांना आवडतं . बरेच लोक आवडीच्या ठिकाणी जाऊन त्या विशिष्ट जागेवर आपली स्वतःची किंवा मित्र, कुटुंबासोबत सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करतात, आपल्या संग्रहात ठेवतात . त्यामुळे ती विशिष्ट जागाही जनसमुदायात पोहोचते.
आज जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिताताई इंगळे Anitatai Ingale यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'आपले शिवणे' सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग्य आला.
याप्रसंगी मा. खा. सुप्रियाताई सुळे Supriya Sule , नगरसेवक मा. सचिनभाऊ दोडके Sachin Shivajirao Dodke आणि मा. सायलीताई वांजळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज १७ जानेवारी २०२२
राजमाता जिजाऊ यांची तिथीप्रमाणे जयंती.
एक महान व्यक्तिमत्व आणि आदर्श आई म्हणून त्यांची ओळख.
मराठा साम्राज्य स्थापना करण्यासाठी जिजाऊ यांचा एक महत्त्वाचा वाटा होता.
जिजाऊ माता मुळेच मराठा साम्राज्याचा इतिहास 🚩 घडला त्यांच्यामुळेच स्वराज्याचे तोरण बांधलं गेलं .
संघटन व पराक्रम अश्या सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺🌺🌺
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
मा. खा. सुप्रिया ताई सुळे Supriya Sule यांच्या पुढाकाराने व नगरसेवक सचिन भाऊ दोडके Sachin Shivajirao Dodke, नगरसेवक गणेशआबा ढोरे Ganesh Dhore - गणेश ढोरे यांच्या प्रयत्नातून शिवणे ते कोंढवा गेट कॅनल रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
याच रस्त्याचा भूमिपूजन समारंभास मा. सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या.
हा भूमिपूजन समारंभ सुप्रिया ताई सुळे यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी नगरसेवक सचिन भाऊ दोडके, नगरसेवक गणेशआबा ढोरे यांचे मी अभिनंदन केले आणि मा. खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली.
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान.
कर्तृत्व आणि पराक्रम यांचा वारसा त्यांना रक्तातून मिळालेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या निधनानंतर रयत पुन्हा एकदा बिथरली असताना स्वराज्याचे धाकले मालक संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून आजच्याच दिवशी राज्याभिषेक झाला होता.
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन. 🙏🙏🙏
#राज्याभिषेक #छावा #ऐतिहासिक #छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
आज १५ जानेवारी
भारतीय सैन्य दिवस 🇮🇳
देशात दरवर्षी आजच्या दिवशी सैन्य दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1949 साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती.
सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्कराचे साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचे स्मरण करूया.
ज्या वीर जवानांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना आदरांजली वाहूया.
राष्ट्राची शान आणि गर्वाचे प्रतीक असणाऱ्या आपल्या वीर लष्करांना भारतीय सेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सैनिकहो... तुम्हाला आमचा सलाम!
Indianarmy.adgpi
#आपलं_वारजे #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
आज १४ जानेवारी
मकरसंक्रांती 🪁
गोडव्याचा, नाती जपण्याचा आणि आनंदाचा सण.
स्नेहाचा, प्रेमाचा, मराठी परंपरेचा मराठी सण.
भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे या सणाचे महत्त्व .
म्हणूनच मकर संक्रांतीला म्हणतात.. ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’.
आपणा सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
पुण्यात मेट्रोचे 🚇 काम प्रचंड वेगाने सुरु आहे. काही ठिकाणी चाचणी सुद्धा झालेली आहे.
हिच मेट्रो आपल्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, धावडे या गावांमधून धावावी जेणेकरून इथल्याही नागरिकांना मेट्रोचा लाभ व्हावा यासाठी मी AtulDangatपुणे महा मेट्रो आणि संबधितांकडे पाठपुरावा करीत होतो.
त्या मागणीला आज यश आले.
आज पुणे महा मेट्रोच्या Pune Metro Rail Project वतीने वारजे हायवे चौक ते कोंढवे, धावडे पर्यंत सर्वेक्षण व मातीपरीक्षण करून सादर जागेची पूजा करून
महामेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मा. श्री. शेखर दांगट पाटील ( मा. उपसभापती), मा. श्री नितीनभाऊ दांगट पाटील (मा. उपसभापती) , मा. श्री महेंद्र दांगट Mahendra Dangat , मा.श्री राजुशेठ मुनोत , मा. श्री. विकास दांगट ( उपसरपंच, शिवणे) Vikas Dangat , मा. श्री. संजय देशमुख, मा. श्री कुणालशेठ दांगट ,मा. श्री. सचिनदादा देशमुख , मा. श्री आर. आर. रत्नपारखी, मा. श्री शरद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Ajit Pawar #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
आज पुत्रदा एकादशी
पुत्रदा एकादशीला पुत्रा एकादशी असेही म्हणतात.
पुत्रदा एकादशीबाबत पुराणात सांगितले आहे की,
जो भक्त प्रामाणिक भक्ती आणि नियमांनी या एकादशीचे पालन करतो, त्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि वैकुंठ धाम प्राप्त होते.
यासोबतच व्यक्तीला संतती आणि संपत्तीचा आनंद मिळतो.
ही पुत्रदा एकादशी आपणा सर्वांसाठी सुख, समाधान, संपत्ती घेऊन यावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.
आपणा सर्वाना पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺🌺
#माऊलीपरिवारआळंदिदेवाची #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
आज १३ जानेवारी २०२२
राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांचा जन्मदिवस. डॉ. विश्वजीत कदम Vishwajeet Kadam
हे माजी मंत्री आणि ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव.
राज्यातील तरुण मंत्री असलेल्या विश्वजीत यांनी एक राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर आहे.
डॉ विश्वजीत कदम हे सहकार, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय असून या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
डॉ विश्वजीत कदम यांना जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐💐
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
राज्यात दोन्ही डोस 💉 घेतलेले फ्रंटलाईन वर्कर, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी 👨⚕️ तसेच साठ वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक 👴 यांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे.
दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असतील तर बूस्टर डोस घेता येईल. ही सुविधा ऑनलाइन व थेट नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल.
दुसरा डोस झाल्यानंतर साधारणतः बूस्टर डोस कुठल्या तारखेला येईल याचे उदाहरण देण्यासाठी पुढील माहिती शेयर करतोय.
आपल्या प्रभागातील फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षे व त्यावरील सह्व्याधी असलेल्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावा असे माझे AtulDangat सर्व जनतेला आवाहन आहे. 🙏
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज १२ जानेवारी
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय युवक दिन.
युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश 🇮🇳 प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. अशा संकल्पनेची आठवण म्हणून आणि प्रत्येक युवक देशाप्रती अभिमानाने देश सेवा करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ
प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य म्हणजे एक प्रकारचे तपच म्हणता येईल. त्यांचे आयुष्य युवकांसाठी अतिशय प्रेरणादायक होते. आपणा सर्वांना राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐आणि स्वामी विवेकानंद यांना जन्मदिवसानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙏🙏
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज ११ जानेवारी २०२२
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेश टोपे Rajesh Tope यांचा जन्मदिवस 💐💐💐.
कोरोनाच्या कितीही लाटा आल्या तरी समर्थपणे त्याला तोंड देत उभे असलेले आपले आरोग्यमंत्री.
सदैव जनतेत वावरणारे एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
कोरोनाच्या काळात योग्य निर्णय घेऊन त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातल्या जनतेला धीर दिला.
आदरणीय राजेश टोपे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
आज ११ जानेवारी २०२२,
भारताचे 🇮🇳 दुसरे पंतप्रधान आणि थोर स्वातंत्र्यसैनिक लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी.
शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ च्या मंत्रानं सारा देश भारावून गेला होता. त्यांचा साधेपणा आणि मानवतावादी दृष्टिकोनानं त्यांनी जनतेची मने जिंकली होती.
पंतप्रधानपदी असतानाही शास्त्री यांचे पाय जमिनीवर होते.मूर्ती लहान पण कीर्ती महान असं थोडक्यात त्यांचं वर्णन केलं जायचं.
हरित क्रांतीचे जनक अशी त्यांची आणखी एक ओळख.
साधेपणाचं मूर्तिमंत उदाहरण असलेलं लालबहादूर शास्त्री जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते.
अश्या थोर लालबहादूर शास्त्रींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ #वारजे
पुणे मनपा हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली.
कोरोना पासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना कायम मास्क वापरा आणि इतरांना ही वापरण्यास सांगा. 🙏
#मास्क_वापरा #शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ Lokmat Pune
पुणेकरांसाठी खुशखबर!
मिळकतकर थकबाकीदारांसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे PMC Pune 'मिळकतकर अभय योजना' सुरु करण्यात आली आहे.
सदर योजनेमध्ये थकबाकीकरांना एकूण दंडाच्या रक्कमेवर ७५% सूट मिळणार असून या योजनेची मुदत २६ जानेवारी २०२२ पर्यंत निर्धारित केलेली आहे.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ☎️१८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
कोरोना व्हायरसने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. अशा वेळी १००% लसीकरण 💉 हा एकमेव उपाय आपल्या समोर उभा दिसतोय. सरकारने नुकतेच वय वर्ष १५ ते १८ या वयोगटातील मुला मुलींच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे.
हाच मुद्दा लक्षात घेऊन याच वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नवभारत हायस्कुल शिवणे, प्रेस्टिज पब्लिक स्कुल शिवणे Prestige Public School व उत्तमनगर जिल्हा परिषद Pune Zilla Parishad शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात यावी असे निवेदन आज मी AtulDangat आणि विकास दांगट Vikas Dangat यांनी सहायक आरोग्य अधिकारी PMC Pune डॉ. देवकर सर यांना दिले.
डॉ. देवकर सरांनी लवकर याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल असा विश्वास दिला.
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
आज ६ जानेवारी २०२२
पत्रकार दिन.
'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या 📰 माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची
मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
समाजात राजकीय भान निर्माण करणारे, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारे पत्रकार, पेन ✍️ ते कॉम्प्युटर , खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं,
टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स,
प्रत्येक युगाप्रमाणे अपडेट होत जाणारे समाजाचे मुख्य स्तंभ म्हणजे आपले पत्रकार.
उन्ह, वारा, वादळात आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावणाऱ्या समस्त
पत्रकार बांधवाना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
शिवणे येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे माझ्या AtulDangatवाढदिवसानिमित्त योगिराज तायक्वोंदो चॅम्पियनशिप २०२१ 🤼♂️ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा
माझ्या हस्ते पार पडला.
स्पर्धेतील विजेत्यांचे 🥇 हार्दिक अभिनंदन 💐💐💐
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, हजारो लेकरांची माय असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ Dr. Sindhutai Sapkal यांचं काल दु:खद निधन झालं.
पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली.
अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली.
त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणाऱ्या या मातृदेवतेला भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏
#शिवणे #अतुलदिगंबरदांगट #खडकवासलामतदारसंघ
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the organization
Website
Address
SNO. 5, Datta Narmada Complex, Near Talati Office, Navbharat High School, Shivane
Pune
411023
Pune, 411051
We provide various services like Online Leave and License (Rent) Agreement, PAN Card Application, In
Ba
Pune, 411045
Amol Balwadkar Quick Response Team, (AB QRT) concept was launched for the benefit of citizens of Ban