Adv Akhil Shakkya

शहर महासचिव,
वंचित बहुजन आघाडी, सोलाप?

10/05/2022
10/05/2022

Thank You...

13/04/2022

*PET परीक्षा पास होऊन सुद्धा सोलापूर विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीच्या करियरचे अतोनात नुकसान करण्याचा घाट, वंचित बहुजन आघाडी मोडणार!!*

सोलापूर दि.13/04: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोलापूर विद्यापीठाच्या मनुवादी मानसिकता जोपासणाऱ्या प्रशासनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराविरुद्ध निवेदन देण्यात आले. या निवेदनात सौ. मंगल नागमोडे या होतकरू अनुसूचित जातीच्या तरुणीचे मराठी विषयाच्या पीएचडीसाठी पेठ परीक्षेत पास होऊन सुद्धा सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि गलथान कारभारामुळे भविष्याचे नुकसान झाले आहे. पीएचडी करण्यासाठी पात्र असताना या विद्यार्थिनीच्या मुलाखतीचा घोळ विद्यापीठ प्रशासनाने जाणून बुजून घातलेला आहे. त्यामुळे एक अनुसूचित जातीतील विद्यार्थिनी पीएचडी करण्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापिका मृणालिनी फडणवीस यांना समक्ष भेटून या विद्यार्थीनीवर झालेल्या अन्यायाविषयी अवगत करण्यात आले. कुलगुरूंनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थिनीवर अन्याय होणार नाही याबद्दल आश्वासन दिले.
मनुवादी विद्यापीठ प्रशासन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अशाच पद्धतीने कोणत्या ना कोणत्या स्तरावर अन्याय करत असते. विद्यार्थ्यांनी जागरूक आणि संघटित होऊन अशा अन्यायावर वेळीच प्रहार करावा अन्यथा आपल्या बुद्धी कौशल्याचा विनाश केल्याशिवाय ते राहणार नाहीत.

जय भीम! जय शिवराय!

*ॲड. अखिल रामचंद्र शाक्य*
*शहर महासचिव*
*वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.*

Photos from Adv Akhil Shakkya's post 12/04/2022

आज रोजी एका रुग्णाला भेटण्याकरिता डॉ. व्ही. एम. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूर तथा सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे गेलो असता येथील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना तथा सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसलेल्या पिण्याच्या पाण्याची आणि प्रसाधनगृहांची अपुरी आणि असुविधाजनक परिस्थिती न पाहवंणारी आहे.अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे वरील परिस्थितीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महासचिव या नात्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल डॉ. व्ही. एम. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूर यांना आव्हान करतो की, सोलापूर सिविल हॉस्पिटल मधील प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि स्वच्छतागृहांची व प्रसाधनगृहांची डागडुजी करून ते वापरण्यायोग्य करून सर्वसामान्य नागरिकांची रुग्णांची आणि सार्वजनिक आरोग्याची तत्काळ काळजी घ्यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन उभे करून आपल्याला योग्य प्रकारे जाब विचारेल.. त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य आणि अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर हेच जबाबदार असतील.

ॲड अखिल रामचंद्र शाक्य
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी,सोलापूर.
08421518325
09822771567

29/03/2022

अबुल हसन खान यांच्या रुपाने मुंबईत वंचित बहुजन आघाडीला एक प्रामाणिक, मेहनती, जमिनीशी नाळ असलेले आणि खंबीर नेतृत्व मिळाले आहे.
कोणताही अभिनिवेश नसलेले, मनमिळाऊ आणि मृदु व्यक्तिमत्वामुळे कार्यकर्त्यांमधे लोकप्रिय आहेत. कामात कसूर खपत नाही त्यामुळेच कामकाजाच्या बाबतीत अतिशय काटेकोर परखड राहूनही कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे.
27 तारखेच्या महंमद पैगंबर बिलाच्या प्रचार प्रसारा साठी काढलेल्या यशस्वी रॅलीची मूळ संकल्पना अबुल भाईंची. अबुल भाईंना साथ देत कार्यक्रम यशस्वी करणार्‍या मुंबईतील कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

रेखा ठाकुर
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी

28/03/2022

असा असतो चळवळीत काम केल्याचा आत्मविश्वास.
२८/३/१९
सोलापुर आणि अकोला लोकसभे करिता साहेबांचा उमेदवारी अर्ज तयार करून ते दाखल करण्याची जबाबदारी माझ्या कड़े होती.२००४,२००९,२०१४ व आता २०१९ मध्ये सलग चौथ्यादा मीच उमेदवारी अर्ज भरला आणि दाखल करताना बाळासाहेबांचे सोबत होतो.पक्ष आदेशानुसार साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी आणि सचिन शिराले सोलापुर मध्ये दाखल झालो.सर्व प्रक्रिया करून साहेबांचा एकच परिपूर्ण उमेदवारी अर्ज मी तयार केल. ४ अर्ज दाखल करण्याची मुभा असते.त्यामुळे वेगवेगळे सूचक टाकून ४ उमेदवारी अर्ज दाखल केले जातात.सुशीलकुमार शिंदे आणि जयसीधेश्वर ह्यांनी प्रत्येकी ४ अर्ज केले होते.आपण मात्र एकच अर्ज दाखल केला होता.
काल जेव्हा छाननी झाली तेव्हां साहेबांचा उमेदवारी अर्ज कोणत्याही आक्षेपा शिवाय मंजूर झाला.सुशील कुमार शिंदे ह्यांचे नाव दगड़ू शंभु शिंदे असून ते सुशील कुमार शिंदे नाव लावतात ह्या वर अपक्ष उमेद्वाराने आक्षेप घेतला होता.जयसीधेश्वर ह्यांचे मुळ नाव नुरंदय्या गुरुबसप्पा हिरेमठ असून त्यांची जात बेड़ा जंगम नसून हिंदू लिंगायत असल्याचा आक्षेप अपक्ष उमेद्वाराने घेतला होता.दोन्ही आक्षेप फेटाळण्यात आले असले तरी शिंदे आणि जयसीधेश्वर ह्यांचे उमेदवारी क़ायम होण्यास बराच वेळ लागला.त्या करिता वकील देखील नेमावे लागले.
नांदेड़ मध्ये तर अशोक चव्हाण ह्यांचे उमेदवारी वर निर्णय व्हायला रात्रीचे अकरा वाजले. प्रितम मुंडे ह्यांचे उमेद्वारी वर देखील आक्षेप घेतला गेला.एवढे दिग्गज नेते देखील उमेदवारी अर्ज भरताना अडकतात आणि आपन मात्र एकच अर्ज दाखल करून तो कोणत्याही आक्षेपा शिवाय मंजूर करून घेतो, आपण कुठेही वकील लावत नाही.हा आत्मविश्वास साहेबांचे नेतृत्वाखाली काम केले की मिळतोच मिळतो

राजेंद्र पातोड़े
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101

22/03/2022
20/03/2022
डॉ. आंबेडकर : एक अप्रतिम विधिवेत्ता 19/03/2022

डॉ. आंबेडकर : एक अप्रतिम विधिवेत्ता जब आंबेडकर विधि महाविधालय के प्राचार्य थे तब खुशमिजाजी में कहा करते थे, “हम भी न्यायाधीश बनेंगे”। आंबेडकर के पास अ...

10/03/2022

आगामी काळात कल्पक लढे उभरावे लागतील..✊

- Balasaheb Ambedkar ❤️🔥

09/03/2022

सतीश वैजापूरकर
पत्रकार
राहाता-शिर्डी
ता.९।३।२२
सन्मा.बाळासाहेब आंबेडकरांनी सुनावले खडे बोल...

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे कायदा आणि घटनेचे जाणकार म्हणून ओळखले जातात.
काल शिर्डीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.
त्यावर आधारीत सविस्तर बातमी आज सकाळ ने प्रसिध्द केलीय.
त्यांची काही विधाने विचार करायला लावणारी आहेत.
ती पुढील प्रमाणे,
१) ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना करण्याचे आणि निवडणुकांच्या तारखा जाहिर करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्याबाबतचे विधेयक विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजुर झाले. हि कृती आणि हा कायदा बेकायदेशीर आहे. राज्य निवडणुक आयोगाला तो मानणे बंधनकारक नाही.
२) असे विधेयक म्हणजे घटनेचा भंग आहे. भाजप घटनेची पायमल्ली करतो, काॅग्रेसच्या काळात घटना निर्माण झाली. या विधेयकामुळे घटनेचा भंग झालाय काॅग्रेसला थोडी जरी लाज असेल तर त्यांनी सरकारातून बाहेर पडावे.
३) हे चोरांचे सरकार आहे,ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकून सरकारी निधीचा त्यांना गैरवापर करायचा आहे.
४) राज्यात सत्तेत असलेल्या, श्रीमंत मराठ्यांना गरिब मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटत नाही. त्यांनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. आता ते ओबीसी आरक्षणाचा बट्टाबोळ करायला निघाले आहेत.
५) धर्म, मंदिर आणि मुस्लीम विरोधी राजकारणामुळे काही काळ (भाजप) सत्ता मिळाली.
मात्र त्यातूनही चोरांचेच फावतेय हे जनतेच्या लक्षात आलेय. त्यामुळे कुणा एका पक्षाकडे सत्ता द्यायची नाही. मिली जुली सरकार ठेवायचे. म्हणजे हे चोर एकमेकांच्या भानगडी बाहेर काढतात. असे जनतेला वाटते.
६) घराणेशाहीने राजकारणाचा ताबा घेतला. पूर्वी कार्यकर्त्याला निवडून यायचे तर स्वतःला सिध्द करावे लागे. आता घराणेशाहीमुळे चित्र बदलले. त्याचा फटका कार्यकर्ते व लहान राजकीय पक्षांना बसला.
७) केंद्रीय मंत्री नारायण राणे असोत की खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे न्यायालयात सादर करावेत. ते असे करीत नाहीत तोपर्यत निव्वळ आरोपांना काही अर्थ नाही.
८ ) एमआयए आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपला मदत करण्याचा आरोप कुणी करत असेल तर मग उत्तर प्रदेशात भाजप विरूध्द समाजवादी पक्ष अशी सरळ लढत असताना काॅग्रेसने उमेदवार का उभे केले. आम्हाला आता त्यांच्यावर असाच आरोप करता येणार नाही का.
९) सध्या तत्वशुन्य राजकारण सुरू आहे.
सन्मा.बाळासाहेबांचे हे प्रत्येक विधान विचार करायला भाग पाडते हे मात्र खरे.

स्नेहांकीत
सतीश वैजापूरकर

Photos from वंचित बहुजन आघाडी - Adv.Prakash Ambedkar's post 09/03/2022
Photos from Siddharth Mokle's post 09/03/2022
Photos from Adv Akhil Shakkya's post 08/03/2022

08-03-2022

लेखांक 8: जागतिक महिला दिन

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2022

स्त्रीदास्यमुक्ती : जागतिक महिला दिन

1) स्त्री: निसर्गाच्या कालचक्रात अस्तित्वाचा शोध घेताना विश्वातील अखिल सजीव सृष्टीची जननी, जन्म देणारी, जीवन देणारी, सजीवोत्पत्तीच्या संवर्धनाचे जोखड कायम वाहणारी, जन्म घेण्यासाठी नसून सृष्टीला जीवन देण्यासाठी जगणारी... स्त्री... होय फक्त मनुष्य जातीतील स्त्रीच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक सजीव जातीतील स्त्री कायमस्वरूपी कृतज्ञतेस पात्र आहे. अशा या निसर्गाच्या अनमोल स्त्रीधनास शिरसाष्टांग दंडवत आणि पुरुष असल्याचा खोटा माज जमीनदोस्त करत अत्यंत प्रामाणिकपणे जीवनदात्या मातृत्वाच्या असिमतेला मानाचा मुजरा.

2) दास्य: स्त्री नसेल तर सृष्टी कशी असेल? कल्पना करवत नाही. जन्म झाला तर जीवन घडेल, जन्मच होणार नसेल तर जीवन कसे असू शकेल? सजीव सृष्टीच्या इतिहासात कायमस्वरूपी उपेक्षित उदासीनत्व पांघरून काळ्याकुट्ट अंधार खोलीच्या व्यथाशय्येवर मानवी पिढ्यांच्या पिढ्या प्रसविलेल्या स्त्रीला दस्यत्वाचे आभूषण घालून पुरुषी इतिहासाने आजतागायत सतावले आहे. कारण ती आई आहे म्हणून. माजलेल्या पुरुषी अहंकाराने स्त्रीच्या शारिरीक तथा मानसिक मर्यादा ओळखून आपल्या अधिपत्याखाली गुलाम म्हणून वागणूक देणे चालू केले आणि हजारो वर्षांचा गुलामीचा कालखंड दस्यत्वाच्या शृंखलेत बंदिस्त झाला.

3) मुक्ति: स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. सद्भावनेचा खैराती दानात सहजासहजी स्वातंत्र्य कोणी बहाल करेल हा भ्रम आहे. मुळात मीच याची उत्पत्ती, मीच या संसाराची संवर्धक, मीच याची शास्ती, हा भाव जोपर्यंत इथल्या प्रत्येक स्त्रीमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेला, अहंकाराला छेद देता येणार नाही. मला मान्य की स्त्री, मुलाची आई, नवऱ्याची बायको, भावाची बहीण, वडिलांची मुलगी, मित्राची मैत्रिण अशा नानाविध नात्यांच्या बंधनात स्वतःच्या दास्य मुक्तीची अपेक्षा बाळगेल तरी कशी? पण ती मुक्त झाली पाहिजे मनाने, विचाराने, आचाराने. तेव्हाच खरे तिच्या स्त्रीदास्यमुक्तीचे सोहळे जगभर साजरे होतील.

4) पुरुषसत्ताक ब्राह्मण्यवादी, मनुवादी, वर्चस्ववादी, विघटनवादी, जातीयवादी, भांडवली, सरंजामी वृत्तीने जगभरातील बहुसंख्यांक लोकांना प्रत्येक वेळी मानवी नैसर्गिक हक्कांपासून दूर ठेवण्याचा, वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना कायम यशही मिळाले आहे. अशा बहुसंख्यांक वंचित राहिलेल्या सर्व समाजातील लोकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण हे कायम अग्रेसर असेच आहे. वंचित राहिलेल्या सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पंथीय, सर्व वर्णीय सकल मानव जातीत स्त्रिया कायम उपेक्षितच आहेत. सदासर्वकाळ पुरुषी अहंकाराच्या गुलामीत आयुष्य कंठीत आहेत.

5) आधुनिक भारत वर्षाच्या जडणघडणीत शूद्रातिशूद्र गुलाम आणि मागासलेपणाचे जीवन जगत असल्याचे ठळकपणे जरी दिसत असले तरी त्यांच्याहीपेक्षा कठीण असा प्रवास सर्वच धर्मातील शुद्र गणल्या गेलेल्या स्त्रीच्या आयुष्यात आलेला आहे. अनेक चालीरीती रूढी परंपरानी ग्रस्त असलेल्या भारतीय समाजात आज जो स्त्रीचा थोडासा बहुमान होत आहे त्याचे श्रेय भगवान गौतम बुद्ध आणि त्या विचारावर चालणाऱ्या वागणाऱ्या जगणाऱ्या ब्राह्मण्य संस्कृती विरुद्ध स्त्रीमुक्तीचे सारथ्य करणाऱ्या श्रमन संस्कृतीच्या वाहकांना जाते. त्याच परंपरेत संत तुकाराम, संत रविदास, संत कबीर या संताना जिजाऊ, सावित्रीमाई, भिमाई, रमाई, फातिमादी, आहील्यामाई आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, छत्रपती शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे रचनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्यकर्तृत्वावर आजची स्त्रीमुक्तीची आधुनिक फळे स्त्री उपभोगत आहे. तरीही वंचितांच्या यादीत स्त्रिया ह्या अग्रभागीच आहेत.

6) परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेतून राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या दुबळ्या समाजातील तसेच सर्व जातीय धर्मीय वंचितांचे आशास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितांना त्यांचे नैसर्गिक हक्क मिळवून देण्यासाठी त्यांच्या अस्तित्वाचा ठसा सर्व स्तरावर मग तो राजकीय, सामाजिक, आर्थिक असो, अशा सर्व ठिकाणी सर्वहारा समाजातील वंचितांना स्त्रियांना स्वतःच असे स्वतंत्र व्यासपीठ वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मिळवून दिले आहे. आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा या मानाच्या पदावर माननीय रेखाताई ठाकूर याना एक स्वतंत्र स्त्री म्हणून, पुरुषसत्ताक अहांकराग्रस्त समाजमनाला परिवर्तनवादी विचार म्हणून बसविले आहे. वंचितांच्या वाचेला आता तिचा हक्काचा आवाज मिळाला आहे. सकल समाजातील सर्व स्त्रियांनी आणि वांचीतानी आपल्या नैसर्गिक न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी ची कास धरून आपला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार करू.

पुरुषसत्ताक अहंकाराला जाळू !
चला स्त्रीदास्यमुक्तीचे सोहळे करू!
वंचित बहुजन आघाडीला निवडुन देऊ!
चला स्त्रीदास्यमुक्तीचे सोहळे करू!

जय जिजाऊ, जय अहिल्या,
जय साऊ, जय फातिमा,
जय भीमाई, जय रमाई
जय भीम जय शिवराय
जय हिंद जय भारत

ॲड. अखिल रामचंद्र शाक्य
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी सोलापूर
9822771567
8421518325

Photos from Adv Akhil Shakkya's post 04/03/2022

झुंड..... अमिताभ नागराजे...

इथल्या बहुसंख्यांक वर्गात प्रतिनिधीत्व करणाऱ्या लाखो-करोडो कथा गाव मोहल्ला च्या पत्र्याआड अशाच जळून गेल्या, खपून गेल्या, नामशेष झाल्या इथल्या विखारी व्यवस्थेने त्याचा एक आह देखील ऐकू दिला नाही. आज त्याच व्यवस्थेच्या छाताडावर बसून अँग्री यंग मॅन महानायकाच्या अभिनयात नागराज यांनी सर्वोत्तम भूमिका ही सर्वमान्य, सर्वसमावेशक आणि सर्वांच प्रतिनिधत्व करणारी कशी असू शकते हे आपल्या दिग्दर्शनातून दाखवून दिले. झुंडची प्रत्येक फ्रेम इथल्या वंचितांचा रंग घेऊन प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत होती. प्रश्न विचारत होती. स्वतःचं अस्तित्व दाखवत होती.

भारतीय समाज विश्‍वात अशाच प्रकारची एक झुंड कायमस्वरूपी इथल्या प्रस्थापीत व्यवस्थेने कायमची वंचित ठेवले आहे मग ती व्यवस्था कोणत्याही स्वरूपाची का असेना. इथल्या वंचित समूहाला राजकीय परिपेक्षात आणण्यासाठी वंचितांची झुंड कामाला लागली आहे आपलं अस्तित्व दाखवने टिकवने आणि या व्यवस्थेच्या छाताडावर आपल्या पाऊलखुणा उमटवणं हाच आमचा धर्म आमची जात आमचा पंथ हाच आमचा श्वास हाच आमचा ध्यास.

नागराज आणि टीम मनःपूर्वक अभिनंदन
झुंड काल होती आज आहे आणि उद्या राहील

ओबीसी कसा गाळला गेला आहे हे सर्वश्रुत आहे.
वंचितांच्या झुंडीने ओबीसींचा हक्क आता सत्तेत गेल्याशिवाय मिळणार नाही.

चला वंचितांची झुंड होऊ
आणि सत्ता आपल्या हातात घेऊ

जय अहिल्या जय जिजाऊ
जय भीम जय शिवराय
जय हिंद जय भारत

ॲड अखिल रामचंद्र शाक्य
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी, सोलापुर.
8421518325
9822771567

01/03/2022

लेखांक 7: 01/03/2022

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022

मानवतेची चळवळ धर हाती
तारुण्याच्या संदर्भांना तारुण्याची याचना
अस्पष्ट आभाळ कर मोकळे
वंचितांच्या संवेदना तारुण्याची साधना

1) भारत हा तरुणांचा देश आहे हे आपण सर्रास ऐकतो वाचतो. 18 ते 40 वयोगटातील भारतीयांची सरासरी लोकसंख्या ही जगातील सर्व देशातील लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा अधिक आहे, म्हणजेच खरोखर भारत हा तरुणांचा देश आहे. "तरुण असणे म्हणजे काय?" मानवी जीवनाचा उत्साहवर्धक असा काळ की जो मानवाला जोमाने, जिद्दीने हे विश्व घडविण्यासाठी, स्वतःला सिद्ध करून स्वतःचं अस्तित्व या जगावर बिंबवण्यासाठी स्वतःची अशी छाप सोडण्यासाठी धमन्यांमध्ये सळसळणाऱ्या रक्ताला नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणारा काळ होय.

2) तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सिद्धांतानुसार 'बदल (change)' हा विश्वाचा अलिखित,अविनाशी आणि कायमस्वरूपी राहणारा नियम आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट ती वस्तू असो सजीव, प्राणी, पक्षी, वनस्पती, हवा, माती असो, सतत बदलत आहे. माणूस म्हणून आपणही उत्क्रांतीच्या सिद्धांताला पहात आलोय. आपणही रोज बदल जगत आहोत. मानवी आयुष्य हे अपार अनिश्चितेने नटलेले आहे. जगात शाश्वत अशी कोणतीही गोष्ट नाही. प्रत्येक क्षण आपण बदलत आहोत. आपल्या सभोवती असलेली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक, भौतिक परिस्थिती सतत बदलत आहे. या बदलाला या बदलत्या परिस्थितीला मनुष्य म्हणून आपण सर्वांनी स्वीकारणे हे काळाच्या सोबत राहणे ठरेल. अन्यथा विनाश म्हणजेच बदल ठरलेलाच आहे.

3) ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल इंवेंशन आणि डेव्हलपमेंट मुळे भौतिक जगाच्या सीमांना आजच्या काळात महत्त्व उरलेले नाही. माहिती आणि तंत्रज्ञान बोटावर मिळणाऱ्या आणि त्याचा वापर आपल्या उद्धारासाठी, विकासासाठी करणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सजग आणि जागृत होत आहे. मनुष्य म्हणून माझे हक्क, माझे अधिकार माझे कर्तव्य, माझी निष्ठा, माझे नैतिकता या सर्वांची जाणीव असलेली स्वतंत्र मनाची, स्वतंत्र मताची स्वतंत्र तरुण आज आपल्या आजूबाजूला वावरताना दिसत आहेत. न्यायहक्कासाठी लढताना दिसत आहेत. हा जो बदल आधुनिकतेमुळे आपल्या जीवनावर झाला आहे त्याला सर्वस्वी भारताचे संविधान आणि त्याद्वारे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आहे.

4) साडेसहा हजार जाती, शेकडो पंथ, हजारो भाषा, विविध परंपरा इत्यादींनी नटलेला स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र भारताचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आवश्यक आचारसंहितेचा आधुनिक राजधर्म हा सर्व स्तरातील जनसामान्यांच्या कल्याणाचा उद्धाराचा असावा असे मानणे यात ते गैर काय. भारतीय तरूण या आधुनिक काळात कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जाणार आहे याचे उत्तर त्यालाच शोधायचे आहे.

5) एकीकडे क्षणोक्षणी उत्क्रांत होत असलेली टेक्नॉलॉजी तर दुसरीकडे हजारो वर्षांचा अंधार भोगत असलेले जिवंत माणसे. एकीकडे प्रस्थापित असलेल्या मूठभर आधुनिक सरंजामदारांची सत्ताकेंद्रे तर दुसरीकडे स्वतःचं मत विकून मटन दारूच्या नशेत भविष्यपिढ्यांचे मारेकरी हत्यारे. होय हत्यारेच आहेत. व्यवस्था परिवर्तनाच्या या आधुनिक लढ्यात मतदान हे सर्वश्रेष्ठ आयुध स्वतःकडे असताना स्वतःच्या हाताने स्वतःचे सरण रचून स्वतः पेटवून घेणारी ही मतविकी मंडळी स्वतःतर मरणारच आहेत पण येणार्‍या पिढ्यांसाठी गुलामांची फौज सुद्धा निर्माण करणार आहेत.

6) अरे एक "शिवाजी" जिजाऊंच्या पोटी जन्म घेतो आणि करोडो लोकांना स्वराज्य म्हणजे काय, रयत म्हणजे काय, रयतेचं राज्य म्हणजे काय याची जाणीव करून देतो.
अरे एक "आंबेडकर" तयार होतो आणि करोडो लोकांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद नवी आशा निर्माण करतो.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे समतामूलक समाजशास्त्रज्ञांचे वारस म्हणविणारे आपण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून किती दिवस जगणार आहोत.

7) परिवर्तनाच्या लढ्याचे रणशिंग फुंकणारे छातीचे भाते इतक्या लवकर शांत कसे झाले? चला उठा मर्दांनो, मावळ्यांनो, भीमसैनिकांनो, वंचितांनो, शोषितांनो, बहुजनांनो आता मागे फिरणे नाही! या लढ्यात सर्व तरुणांना शौर्य दाखवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. मानवी संवेदनांना जागृत करा, खरं काय ते समजून येईल. तरुणांनो हा एकात्मतेने नांदणारा भारत एकसंघ ठेवण्यासाठी सर्वसमावेशक असे, सर्वांचे कल्याण होईल असे विचार सांगणारा, जगणारा, वागणारा नेता निवडणे हे आजच्या काळाची गरज आहे.

8) विधायक कामांना गती देऊन आपल्या नैतिकतेने जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करणाऱ्या नेत्याचा गौरव झाला पाहिजे आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून आपणही आपले आयुष्य निर्मळ स्वच्छ आणि स्वाभिमानी बनवले पाहिजे. तर चला मित्रांनो इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या लीडरशिप विषयी सारासार विचार करून आपणही वंचित बहुजन आघाडीचाच पर्याय निवडाल कारण निष्कलंक चारित्र्य संपन्न अशा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नेता आज आपल्या सोबत आहे आणि सर्वसमावेशक असा वंचितांच्या विकासाचा अजेंडा समोर ठेवून सकल समाजातील वंचितांना लीडर बनविणारी चालती बोलती नैतिकतेची जिवंत प्रयोगशाळा म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आपल्यासमोर घेऊन येत आहेत. चला तरुणांनो वंचितांचे सारथ्य करा. वंचितांचे लीडर व्हा. वंचितांना विकासाच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी इथल्या प्रस्थापितांच्या छाताडावर वंचितांची निशाण पताका रोऊन स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव करून द्या.

जय जिजाऊ जय अहिल्या !
जय भीम जय शिवराय !!
जय हिंद जय भारत !!!

ॲड. अखिल रामचंद्र शाक्य,
शहर महासचिव,
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.
8421518325
9822771567

28/02/2022

उत्तराखंड मधून आलेल्या माणसाने आम्हाला छत्रपतींचा इतिहास उगायुन पाजू नये ..तो आमच्या रक्तात आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल कोषारी यांनी काल अत्यंत चुकीचे आणि संघी मानसिकतेचे विधान केले ..
याचा मी निषेध करतो
त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की तो स्वामी रामदास नसता तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला भेटले नसते ......लाज वाटायला पाहिजे असे वक्तव्य करताना ..एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाने
छत्रपती हे आमचे दैवत आहे ???

“रामदास गोसावी हा आदिलशहाचा हेर होता” हे प्रा.मा.म.देशमुख यांनी १९६९ साली “रामदास आणि पेशवाई” पुस्तकात मांडले. प्र.के.अत्रे यांनी या लिखाणाला आव्हान देत आपल्या दैनिकात लेखमाला लिहली. त्यानंतर तत्कालीन सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली. प्रकरण कोर्टात गेले.

माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी मा.म.देशमुखांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने सर्व पुरावे अभ्यासले. प्रकरणाचा निकाल देताना कोर्टाने रामदासाचा शिवरायांशी संबंध नसल्याचे मान्य करत त्या पुस्तकावरील बंदी उठवली. पुराव्यानिशी न्यायालयात ही बाब सिद्ध झाली आहे.

इतिहासाचे संशोधन झाले नव्हते तेव्हापर्यंत रामदास शिवरायांचे गुरु असल्याचे निर्देश करणारी अनेक पुस्तके, कथा, चित्रे, शिल्पे तयार झाली. आता इतिहासाच्या संशोधनंतर आपले पूर्वीचे मत चुकीचे होते हे मान्य करणे अनेकांना जड जाईल, पण खऱ्या इतिहासाची चाड असणाऱ्यांनी ते स्वीकारले पाहिजे.

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर बसलेले भगतसिंग कोश्यारी हे हाडाचे संघी आहेत. संघाने शिकवलेला ब्राह्मणवर्चस्वाचा इतिहास ते मांडत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे सिद्ध झाले आहे. रामदास हा विषय जेव्हजेव्हा चर्चेला येईल, त्या त्या वेळी रामदास शिवरायांचे गुरु नव्हते, किंबहुना त्यांचा संबंधच नव्हता ही गोष्ट नव्या पिढीला अधिक ठामपणे समजत जाईल यात शंका नाही. खोट्या इतिहासाची बांधलेली तिरपी भिंत बांधणाऱ्यांवरच कोसळायला सुरुवात झाली आहे...

Mobile uploads 23/02/2022
Photos from Rekha Thakur's post 23/02/2022
22/02/2022

लेखांक 6: 22-02-2022

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022.

सोलापूर महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमी

लोकसंख्या निहाय बेसिक नंबर गेम : आराखडा

1) निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेचा लोकसंख्या निहाय अभ्यास केला असता वंचित बहुजन आघाडी समोर सोलापूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बहुसंख्यांक गरीब, वंचित मराठा आणि लिंगायत समूहांनी आपल्या नागरी हक्कांसाठी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने कौल दिला तर सत्ता स्थापनेला कोणताही अडथळा येणार नाही.

2) भारतीय राजकारण हे मुळातच वेगळे करा आणि राज्य करा या एक कलमी धोरणांवर चालते. यात सर्वच राजकीय पक्षांची सत्तालालसा एकवटली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील राज्य पातळीवरील स्थानिक पातळीवरील सर्वच राजकीय पक्ष भारतीय समाजामध्ये दूही निर्माण करण्यासाठी निवडणुकांच्या आधी किंवा नंतरही मतदारांचे ध्रुवीकरण किंवा विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेचे वाद निर्माण करत असतात. सोलापूर महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जाताना मतांच्या ध्रुवीकरण करण्यासाठी वापरण्यात येतील असे काही वाद आणि मुद्दे खालील प्रमाणे:

हिजाब प्रकरण : असुरक्षित अल्पसंख्यांक
निवडणुकातील ओबीसी आरक्षण : गाफील ओबीसी
संविधान बदल : अग्रेसिव अनुसूचित जाती-जमाती
गोमाता संवर्धन : प्रखर देशभक्ती
वंदे मातरम : राष्ट्रभक्तीची लिटमस टेस्ट,
इत्यादी

3) सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाताना सोलापुरातील सुजाण नागरिकांनी वरील काही वाद आणि मुद्द्यांवर पोपटपंची करत मतांची भीक मागण्यासाठी आलेल्या प्रस्थापित सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना नेत्यांना कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना जमिनीवर उतरवून आपल्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये, हवेत पसरलेल्या धुळीमध्ये, वर्षानुवर्ष तुंबलेल्या गटारामध्ये, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांमध्ये, बेरोजगार तरुणांमध्ये, वैद्यकीय असुविधांमुळे त्रासलेल्या रुग्णांमध्ये, सार्वजनिक शौचालयाची प्रसाधनगृहाची दुरवस्था किंवा वानव्यामुळे असुरक्षिततेचा अनुभव घेतलेल्या प्रत्येक नागरिकांमध्ये घेऊन जा आणि आपल्याला होत असलेल्या समस्यांचे प्रश्न विचारा. मागच्या साठ वर्षात आम्ही आधुनिक गुलामगिरी भोगत आहोत. माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आपल्याकडून हिरावून घेतले जात आहेत. आपल्या नागिरी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी निवडून आलेला नगरसेवक पाच वर्षात प्रभागातील सर्वात श्रीमंत प्राणी कसा होतो. डोके लढवा, विचार करा त्याच्या श्रीमंतीच कारण तुम्हाला मिळत असलेली असुविधा आहे!

4) सोलापूर महानगरपालिका निवडणूक 38 प्रभागांमधून 114 नगरसेवक निवडून आणण्यासाठी होणार आहे. प्रत्येक प्रभाग हा सरासरी 25041 मतदारांनी बनला आहे. प्रभाग निहाय तीन नगरसेवकांचे पॅनल या निवडणुकीत निवडून येणार आहे. 951558 मतदार आपला मतदानाचा हक्क यावेळी सोलापूर महानगर पालिका निवडणुकीत बजावणार आहेत. एकूण मतदारांपैकी 136718 इतके मतदार हे अनुसूचित जातीचे आणि 17682 इतके मतदार हे अनुसूचित जमातींची आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीची एकूण मतदार संख्या 154400 इतकी आहे. म्हणजेच अनुसुचित जाती आणि जमाती यांच्या एकूण मतदारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 16.22% इतकी आहे. प्रभाग निहाय आरक्षण जाहीर होण्यासाठी वेळ लागणार आहे तरी 114 जागांपैकी 16.22% इतक्या जागा म्हणजेच 18.49 म्हणजेच 18 ते 19 अनुसूचित जाती जमातीचे नगरसेवक यावेळेस सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत निवडून येणे अपेक्षित आहे. 18 ते 19 अनुसूचित जाती जमाती नगरसेवकांपैकी 16 ते 17 नगरसेवक अनुसूचित जाती आणि 2 नगरसेवक अनुसूचित जमातीचे असणे अपेक्षित आहे.

5) प्रभाग क्रमांक 1, 8, 21 या तीन प्रभागात अनुसूचित जाती जमाती यांची संख्या 9000 पेक्षा जास्त आहे. या तीनही प्रभागात पॅनलचे तीनही नगरसेवक अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून येतील. प्रभाग क्रमांक 10, 12, 22, 23, 24, 26, 27, 28, 33, 36 या 10 प्रभागात अनुसूचित जाती जमाती मतदारांची संख्या किमान 5000 ते कमाल 7000 इतकी आहे म्हणजेच या 10 प्रभागात ही अनुसूचित जाती जमाती मतदार संख्या ही उमेदवराला निवडून आणण्याच्या संख्या कक्षेत आहेत.
प्रभाग क्रमांक 2, 5, 7, 9, 11, 25, 32, 35, 37 या 9 प्रभागात अनुसूचित जाती जमाती मतदारांची संख्या किमान 2500 ते कमाल 5000 इतकी म्हणजेच उमेदवार निवडून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये फरक पाडणारी आहे.

6) वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कार्यकर्त्यांनी वरील संदर्भांचा अभ्यास करून येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग निहाय शाखा बांधणी करून अनुसूचित जाती जमाती यांच्या संख्येचा वापर हा त्या त्या प्रभागातील वंचिताचा, शोषितांचा, उपेक्षितांचा, अल्पसंख्यांकांचा, अठरापगड जाती मधील विभागलेल्याचा, लिंगायत आणि मराठा समाजातील गरीब होतकरू आर्थिक दृष्ट्या मागास मतदारांचा कल वंचित बहुजन आघाडी कडे वळविण्याचा प्रयत्न करावा. एकूण बावीस प्रभागात अनुसूचित जाती जमाती आणि तमाम उपेक्षित, वंचित, अल्पसंख्यांक, आर्थिक दृष्ट्या मागास मतदार एकत्र आले तर वंचित बहुजन आघाडी शिवाय सोलापूर महानगरपालिकेची सत्ता कोणालाही मिळणार नाही हा ठाम विश्वास व्यक्त करून पुढील कामाचे नियोजन बद्ध कृतिकार्यक्रम आखूया.

चला वंचितांची सत्ता आणुया.

जय जिजाऊ जय अहिल्या !
जय भिम जय शिवराय !!
जय हिंद जय भारत !!!

ॲड. अखिल शाक्य
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.
8421518325
9822771567

21/02/2022

लेखांक 5: 21-02-2022

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2022.

आव्हानांची ना पर्वा आता, ना तमा संपण्याची!
प्रकाशपर्व आले चला, निवडू सत्ता वंचितांची !!

1) नवी उमेद, नवी चेतना घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारणी प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर आणि मा. गोविंद दळवी राज्य उपाध्यक्ष यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांची निवड काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. आज राज्य कार्यकारिणीने सोलापूर जिल्हा पदाधिकार्‍यांची निवड करून वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण असे कार्य केले आहे.

2) सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच कलाटणी देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्हा शहराच्या एकंदर भौगोलिक परिस्थितीचा, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला असता आपणास असे आढळून येते की, सत्ता संघर्षाची मोठी पार्श्वभूमी असलेला परंतु प्रस्थापितांच्या, जात दांडग्यांच्या प्रभुत्वा खाली उपेक्षित, वंचित राहिलेल्या सर्व समाजातील लोकांना आज आपल्या मताची खरी किंमत कळत आहे. देश विध्वंसक लाटेवर स्वार होऊन इथल्या प्रस्थापितांनी जातीय समीकरणांची नवी बेरीज मतदारांपुढे सादर करून वंचितांचे शिलेदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजयाचा महामेरू रोखण्यात यश मिळविले. परंतु आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर वंचित उपेक्षित घटकांना आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची सुवर्णसंधी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशावरून आणि मा. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या कल्पक नेतृत्वामधून आलेली आहे.

3)त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक, आलुतेदार बलुतेदार, अठरापगड जाती जमातीमधील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी एकसंघ होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार राजाच्या समोर वंचितांच्या सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा ठेऊन सज्ज व्हावे. राजकीय परिपेक्षातून पाहता वंचित बहुजन आघाडी च्या सर्व सदस्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना सर्वसामान्यांच्या हिताच्या विकासाच्या लोककल्याणाच्या महामार्गावर अडथळे ठरू पाहणाऱ्या जात वर्चस्वाला, उच्चनीचतेला, धर्मांधतेला, भांडवली व्यवस्थेला बाजूला ठेवून सर्वसमावेशक एकोप्याचे राजकारण करून तमाम वंचितांचे आदर्श व्हावे.

4) भारतीय संविधानाला शिरसावंद्य मानून प्रकाश पर्वाच्या उजेडात सर्व वंचितांच्या उपेक्षितांच्या घराघरात वर्षानुवर्षे पडलेला गरिबीचा, अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा विटाळ जाळू आणि भारतीयत्वाचा खऱ्या ओळखीला पाहू.

5) पद, प्रतिष्ठा, प्रलोभन, प्रतारणा या सर्वांच्या कितीतरी वर आपण आपला संविधाननिष्ठ प्रामाणिकपणा, चळवळीशी असलेला एकनिष्ठपणा आणि श्रद्धेय बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून घेण्यात आपण आजतागायत मानलेली धन्यता, येणाऱ्या भविष्यात वंचितांचा विजयी रथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात घोडदौड माजवेल यात शंका नाही.

सोलापूर जिल्हा शहर सर्व नूतन कार्यकारणीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!

जय जिजाऊ जय अहिल्या !
जय भीम जय शिवराय !!
जय हिंद जय भारत !!!

ॲड. अखिल शाक्य,
शहर महासचिव,
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.
8421518325
9822771567

21/02/2022

वंचित बहुजन आघाडी

21/02/2022

लेखांक 4. 21/02/2022

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2022

सोलापूर शहर-जिल्हा भौगलिक परिस्थिती

औद्योगिक शहर सोलापूर : तीर्थक्षेत्री सोलापूर :
उजाड अन् भकास सोलापूर : स्मार्ट सिटी सोलापूर :

1) प्रस्थापित चारही पक्षांकडून सोलापूर शहर आणि जिल्हा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत आमच्या मुळेच अंतर्भूत झाला आहे आणि करोडो रुपयेची विकासाची कामे आमच्या मुळेच मार्गी लागले आहेत असा खोटा भ्रम आणि समज नागरिकांमध्ये वेळोवेळी पसरविला जातो आहे. हा किती खोटा आणि खोडसळ आहे हे खालील तथ्यावरून स्पष्ट होते.

2) वास्तविक पाहता सोलापूर शहर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा थोडासा अभ्यास केल्यानंतर आपण सहज सांगू शकतो की सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले तुळजाभवानी मातेचे तुळजापूर, श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट, गुरुक्षेत्र गाणगापूर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पंढरपूर आणि सोलापूरचे प्रसिद्ध रामेश्वराचे मंदिर इत्यादी देवस्थाने, तीर्थक्षेत्रे जी सोलापूर शहराच्या कनेक्टिव्हिटीने जोडलेली आहेत त्यामुळे महाराष्ट्रातून भारतातून जगभरातून वरील तीर्थक्षेत्रावर येणारे भाविक सोलापूर शहराला आल्याशिवाय राहत नाही. याच तीर्थ क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी चार सोलापूर शहराला जिल्ह्याला स्मार्ट सिटी बनविण्यात मोलाचा वाटा आहे.

3) तसेच सोलापूर शहर जिल्हा हा मुंबई-पुणे-सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय मार्गावरील दळणवळणासाठी तथा इंडस्ट्रियल स्टोरेज साठी भविष्यात वापरात येऊ शकतो. सोलापूर शहर जिल्ह्यात प्रामुख्याने शेती उद्योगावर आधारित शेतकऱ्यांची/नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या कच्च्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग स्थापन करून मुंबई-पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेता येऊ शकतो. अशाप्रकारे औद्योगिक दृष्ट्या सोलापूर शहर जिल्हा किती महत्वाचा आहे हे स्पष्ट होते.

4) कल्पक आधुनिक आणि दूरदृष्टी असलेला दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व सोलापूरला कधी लाभलेच नाही. सोलापूरचा सर्वांगीण विकास करेल अशा सक्षम दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची वानवा सोलापूरला आहे. घराणेशाहीच्या वनव्यात सोलापूर शहर जिल्हा होरपळून निघाला आहे. विकासाला प्रचाराचा मुद्दा करून, सर्वसमावेशक असे राजकारण करून येथल्या वंचितांना पीडितांना सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आपल्याला करावा लागेल.

5) चालण्यासाठी तथा वाहतुकीसाठी सुलभ आणि स्वच्छ रस्ते रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक सुरक्षितता, सार्वजनिक शौचालय आणि सुलभ प्रसाधनगृहे, रस्त्यांच्या दुतर्फा लवकर वाढ होणारी झाडे, रस्ता दुभाजकाच्या मधोमध वाहतुकीस अडथळा न निर्माण करणारी आणि पर्यावरण समतोल राखण्यास मदत करणारी झाडे.... अशी महत्वाची विकास कामे आपल्या प्रभागातील पूर्वीच्या नगरसेवकांनी केली आहेत का? तपास करा आणि पुन्हा मत मागण्यासाठी आले की प्रतिप्रश्न करा कारण प्रश्न विचारणाऱ्यालाच उत्तर मिळते. आम्ही प्रश्न विचारणार.. तुमचा आवाज होऊन.

जय जिजाऊ जय अहिल्या
जय भीम जय शिवराय
जय हिंद जय भारत

ॲड. अखिल शाक्य
शहर महासचिव,
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.
8421518325
9822771567

19/02/2022

लेखांक 1: 18/02/2022

*स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर*
*सुशिक्षित सोलापूर सुरक्षित सोलापूर*
*सजग सोलापूर सक्षम सोलापूर*

1) सोलापूर महानगरपालिका आपल्या विविध विभागांच्या समित्यांच्या माध्यमातून आपणा सर्व सोलापूरकरांना मागील सहा दशकांपासून सेवा देत आहे त्याबद्दल मी सर्व सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका देत असलेल्या सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

2) सोलापूर महानगरपालिकेवर आज पर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या पंचवार्षिक सत्ता बदलात वर्चस्व राहिले आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे यावर आपला प्रचंड विश्वास आहे. आपण सोलापूरकर नेहमीच या निसर्ग नियमांशी साधर्म्य असे वर्तन करतो. जो पक्ष आपल्या नागरी गरजांची, सामाजिक सलोख्याची, आर्थिक तथा राजकीय रणनीतीची चांगल्या पद्धतीने मोट बांधतो त्याला आपण आपल्या शहराचे प्रतिनिधित्व बहाल करतो. त्यामुळे मागील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर अशा सर्व राजकीय पक्षांना आपापले प्रतिनिधी सोलापूर शहरातून निवडून आणता आले. पण पुणे-मुंबई सारखा विकासाचा आलेख गाठता आला नाही. इतिहासात गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरला आज बेरोजारांसाठी प्रसिद्ध झालेलं पाहणे अत्यंत वेदनादायी तथा दू:खद आहे. गिरणगाव असल्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यात इथले तमाम राजकीय लोकप्रतिनिधींची अनास्था, ढोंगीपणा, कामचुकारपणा कारणीभूत आहे.
ही अनास्था, ढोंगीपणा आणि कामचुकारपणा कुठेतरी थांबायला हवा. इथला तरुण शैक्षणिक पदव्या मिळवून बेरोजगारीचे जीवन कंठत आहे. रिकाम्या हाताला काम देणं हे इथल्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य असताना, असलेले उद्योग बंद करून नव्या उद्योगांना प्राधान्य देण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला भूलथापांना शिवाय काहीच दीले नाही. स्वार्थी नेत्यांनी, पुढाऱ्यांनी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. म्हणूनच अशा बेजबाबदार नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आता बदलण्याची वेळ आलेली आहे. आता राजाच्या घरी राजा नाही तर कष्टकऱ्यांच्या घामाची, कामाची, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, महिलांच्या सुरक्षिततेची, नागरि समस्यांवर काम करणाऱ्यांची, आस्थेने चौकशी करणारा, त्यावर उपाय शोधून नियोजनात्मक काम करणारा लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून लोकांच्या मधला सोलापूरकर आपण निवडायला हवा.हीच परिवर्तनाच्या सुरुवात असेल.

3) पारंपरिक पद्धतीने विभागवार नागरिकांनी आपापले लोकप्रतिनिधी निवडून देऊन आपल्या आजच्या सोलापूरला घडविले आहे. त्या सर्व सुजान नागरिकांना, त्यांच्या कार्य प्रतिभेला आणि दूरदृष्टीला सलाम! पण बंडखोराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सोलापूर शहरात प्रत्येक नागरिक हा "बंडखोर" वृत्ती असलेला आहे. जो परिवर्तनाच्या चळवळीत आग्रेसर राहणार आहे. अशा विविध अंगभूत गुणांनी ओतप्रोत भरलेला सोलापूरकर केवळ मुठभर सत्ता शौकीन पारंपारिक लोकप्रतिनिधींच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, मौखिक, अनैतिक आणि पारिवारिक भुलभुलय्येत आकंठ बुडाला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकलेल्या चारही हुतात्मे महापुरुष आपले बलिदान दिले ते इथल्या शेवटच्या घटकातला माणूस स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळेल या अपेक्षेने. पण वस्तूतिथी खूपच भयावह आहे. आपण विचार कराल.

4) लोकांनी लोकांसाठी लोकांना निवडून देणे ही साधी लोकशाहीची व्याख्या असताना व्यवस्थेच्या बांडगुळांनी सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ दिले नाही. त्यामुळे एकाच घरातील लोकांनी किंवा एकाच वर्गाचे प्रतनिधित्व करणाऱ्या धनदांडग्यानी वेगवेगळ्या प्रभागात पैश्याच्या कधी जात वर्चस्वाच्या मस्तीत मागच्या तीन पिढ्यांपासून सत्ता उपभोगली आहे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. इथला चाकरमानी उपेक्षित, वंचित, बहुजन समाजातील घटक आजतागायत या लोकशाहीच्या उत्सवात बघ्याची भुमिका बजावत आला आहे. आता बघ्याची भूमिका बदलून लोकशाहीच्या या उत्सवात मतदार या नात्याने मुख्य भूमिकेत येऊन आपल्या प्रभागात आपल्या परिचयाचा, आपल्या ओळखीचा, आपल्या समस्यांवर तोडगा काढणारा, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये मार्गदर्शन करणारा, रोजगारावर बोलणारा, तुमच्या सुखा दुखात सहभागी होणारा, तुमच्या नागरी समस्यांवर वेळोवेळी आंदोलन करणारा, तुमच्यासाठी भांडणारा, तुमच्यासाठी रोडवर उतरणारा, लढणारा, लढवय्या वंचितांचा सोबती, उपेक्षितांचा सखा, उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी शोधावा आणि निवडावा लागेल.

5) मागील पाच वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या शोषित वंचित उपेक्षित वर्गाला मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र करून लोक्रतिनिधीत्वाचे सत्ता स्वप्न सत्यात उतरवण्याची वाट दाखवली आहे. अंगजात बंडखोर वृत्ती असलेला सोलापूरकर यंदाच्या निवडणुकीत वांचितांची विजयी पताका प्रत्येक प्रभागात फडकावेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय होईल इतकं नक्की.

जय जिजाऊ! जय अहिल्या!
जय भीम! जय शिवराय!
जय हिंद! जय भारत!

Adv. अखिल शाक्य
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर
08421518325
09822771567

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address

Solapur
413003

Other Politicians in Solapur (show all)
Sharad dada Koli Sharad dada Koli
Solapur

�युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक� �धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष�

Amar pawar Amar pawar
Tembhurni
Solapur, 413211

महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्ष, रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्ष

Vinayak Pawar Vinayak Pawar
Solapur

Social Activist, Politician and Entrepreneur. Live Life as The Sun.

ShrikanchanaTai Ramesh Yannam ShrikanchanaTai Ramesh Yannam
Solapur

निवडणुक प्रमुख, सोलापूर शहर मध्य विधानसभा. माजी महापौर, सोलापूर महानगरपालिका.

Rajabhau Sarawade Rajabhau Sarawade
महाराष्ट्र
Solapur, 413004

प्रदेश अध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यवस्थापन परिषद सदस्य - पु.अ.हो.विद्यापीठ सोलापूर

Khadir Bagwan KB AIMIM YOUTH Khadir Bagwan KB AIMIM YOUTH
SOLAPUR
Solapur

AIMIM YOUTH SECRETARY SOLAPUR

Gurushant Dhuttargaonkar Gurushant Dhuttargaonkar
33, Jyoti Nagar, Near Aakashwani Kendra
Solapur, 413006

शिवसेना शहरप्रमुख, सोलापूर नगरसेवक, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

Vikram Deshmukh Vikram Deshmukh
Solapur, 413002

अध्यक्ष - भाजपा सोलापूर शहर जिल्हा

Amol Gaikwad Amol Gaikwad
VIP Road
Solapur, 413001

युवा प्रदेशाध्यक्ष भाजपा भटक्या-विमु

Yusuf Shaikh Yusuf Shaikh
Solapur

politician

Abhishek Pawar Abhishek Pawar
Gulawanchi
Solapur, 413222

#शिवसैनिक...💪❣ जगातील सर्वात मोठे पद म्हणजे #साहेबांचा_शिवसैनिक 📿🚩 ❤️🅰️🅿️❤️👑

Rajesh Kale Rajesh Kale
Galaxy Apartment, Veershaiv Nagar, VIjaypur Road, Jule Solapur
Solapur, 413008

am Rajesh Kale BJP karyakarta. Dy.Mayor of my Solapur Smart City.