Gor Samachar

gor news, events, interview, awareness, information sharing

08/03/2024

Cheers to the women who fearlessly pursue their dreams and defy limits. Happy Women's Day

26/01/2024
12/11/2023

Happy Diwali

24/10/2023

Wishing you a joyful and prosperous Dussehra!

19/09/2023

“Wishing you a blessed and joyful Ganesh Chaturthi!”

07/03/2023

हमेशा मुस्कुराते रहो, हमेशा गुनगुनाते रहो, होली के इस प्यारे त्यौहार पर मस्ती और धूम मचाते रहो। होली की शुभकामनाएं।

26/01/2023

फिर से खुद को जगाते हैं,

अनुशासन का डंडा फिर घुमाते हैं,

याद करें उन शूरवीरों की कुरबानी,

जिनके कारण हम गणतंत्र दिवस का आनंद उठाते हैं।

Happy Republic Day 2023

03/04/2022

जय सेवालाल दोस्तो आजका सवाल और जवाब दो

01/04/2022

बंजारा समजाच्या पोहरादेवी यात्रेला अखेर प्रशासनाची परवानगी

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी आज वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांची भेट घेतली.

या भेटीत सकारात्मक तोडगा निघाला आणि पोहरादेवीच्या यात्रेला परवानगी मिळाली. उद्यापासून (2 एप्रिल) प्रशासन, पोलीस बंदोबस्त, वीज-पाणी आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करुन ही यात्रा यशस्वी पार पाडणार असल्याचं महंतांनी माध्यमांना सांगितलं.

वाशिम जिल्हा प्रशासनाने 25 जानेवारी ते 11 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करुन रामनवमी निमित्त होणारी पोहरादेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही यात्रा होऊ शकली नाही. मात्र पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यात्रेला परवानगी देण्याची विनंती केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात फेरविचार करण्यासाठी 1 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला होता. त्यातच कोरोनामुळे घातलेले निर्बंध राज्य सरकारने हटवल्याने यात्रेला नेमका विरोध का प्रश्न विचारला जात होता. अखेर आज पोहरादेवीचे महंत, बंजारा धर्मगुरु आणि भाजप आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने मोठ्या तयारीने ही यात्रा होणार आहे.

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविक पोहरादेवी या ठिकाणी दाखल होत असतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात.

31/03/2022

#तुमचा_आवडता_नेता_कोण

24/03/2022

ओबीसी आरक्षणसाठी बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार हरिभाऊ राठोड यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण केले आणि सरकारचे लक्ष वेधले

18/03/2022

Happy holi...💐💐

06/03/2022

पुणे को मेट्रो तोहफा, पीएम मोदी ने टिकट खरीदकर ट्रेन में यात्रा की, बच्चों से बातचीत
pune : Highlights कुल 32.2 किलोमीटर लंबी परियोजना के 12 किलोमीटर के हिस्से का गरवारे मेट्रो स्टेशन पर उद्घाटन किया। करीब पांच किलोमीटर दूर स्थित आनंदनगर स्टेशन तक मेट्रो की यात्रा की।मेट्रो के डिब्बे में मौजूद दृष्टिहीन लोगों समेत दिव्यांगजनों से बातचीत की।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे मेट्रो में गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन से आनंद नगर मेट्रो स्टेशन की यात्रा के दौरान मेट्रो ट्रेन में बैठे स्कूली छात्रों से बातचीत की। पुणे में पीएम ने कहा कि इस समय देश 75वां आज़ादी का अमृत महोत्सव मना रहा है।
भारत की आज़ादी में पुणे का ऐतिहासिक योगदान रहा है। मैं इस धरती के सभी स्वतंत्र सेनानियों को आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मुझे आज छत्रपति शिवाजी महाराज जी की भव्य प्रतिमा का लोकार्पण करने का सौभाग्य मिला है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पुणे मेट्रो रेल परियोजना का रविवार को उद्घाटन किया और एक काउंटर से स्वयं टिकट खरीदकर ट्रेन में यात्रा की।

मोदी ने कुल 32.2 किलोमीटर लंबी परियोजना के 12 किलोमीटर के हिस्से का गरवारे मेट्रो स्टेशन पर उद्घाटन किया और इस स्टेशन से करीब पांच किलोमीटर दूर स्थित आनंदनगर स्टेशन तक मेट्रो की यात्रा की। मोदी ने 10 मिनट की इस यात्रा के दौरान मेट्रो के डिब्बे में मौजूद दृष्टिहीन लोगों समेत दिव्यांगजनों से बातचीत की।

15/02/2022

कोटी कोटी प्रणाम ...💐💐

14/02/2022

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजार रूपये वरुन १ लाख रूपये पर्यंत वाढवली :- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि.१४: इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेची कर्जमर्यादा २५ हजार रूपये वरून १ लाख रूपये वाढविण्यात आली आहे गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणा-या घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने २५ हजार रूपये पर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.मात्र सध्याच्या परिस्थितीत लघु उद्योगांकरीता लागणा-या भांडवली व पायाभूत गुंतवणूकीमध्ये झालेली वाढ, कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली दरवाढ व सतत होणारी महागाई निर्देशांकातील वाढ या बाबी विचारात घेता २५ हजार रूपये इतकी थेट कर्जाची मर्यादा अल्प असल्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा २५ हजार रूपये वरुन १ लाख रूपये करण्यात आली आहे. महामंडळाच्या २९ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या झालेल्या संचालक मंडळाच्या ११९ व्या बैठकीत या विषयाला मंजूरी दिली आहे या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुषांगाने १४ फेब्रुवारी २०२२ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेली थेट कर्ज योजनेमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.

या योजनांसाठी लघु व्यवसाय उदा. मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर,हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्र

24/08/2021

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधणार

मुंबई ; वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना देण्यात येणारा निधी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित देण्यात येणार आहे. बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा बंजाराबहुल 11 जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजातील व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा समावेश करण्यात आला आहे. या सभागृह बांधकामासाठी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित निधी देण्यात येणार आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार म्हणाले, तांडा वस्ती सुधार योजनेसाठी यापूर्वी दिला जाणारा निधी मर्यादित आहे. तांडा वस्तींची लोकंसख्या हा मुद्दा लक्षात घेतला जात नसल्यामुळे विकासकामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या समाजातील प्रतिनिधींनी तांडावस्ती सुधार योजनेमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत आता 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला 15 लाख रूपये, 100 ते 150 लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला 20 लाख रूपये तर 150 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला 25 लाख रूपये निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. मात्र बंजाराबहुल लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालकमंत्री यांच्याऐवजी त्या समाजातील व्यक्तीची नियुक्ती व्हावी, अशी बंजारा समाजाची मागणी होती. बंजाराबहुल समाज असलेले बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, सोलापूर, संभाजीनगर, लातूर, हिंगोली, वाशिम हे अकरा जिल्हे आहेत.या जिल्ह्यात बंजारा समाजाची जिल्हास्तरीय समिती करून बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत.

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये लोकसंख्येवर आधारित कामांमध्ये संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित सभागृह बांधण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला 15 लाख रूपये,

22/08/2021

ये है

19/08/2021

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

17/08/2021

बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संजय राठोडांचं कमबॅक?

मुंबई : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळवापसीची मध्यंतरी चर्चा रंगली होती. पण, एकापाठोपाठ होत असलेल्या आरोपांमुळे ही चर्चा तुर्तास थांबली होती. पण, आता पुन्हा एकदा राठोड यांच्या मंत्रिमंडळवापसीची चर्चेला सुरुवात झाली आहे. बंजारा समाजातले धर्मगुरू आणि पोहोरादेवीचे (poharadevi) मुख्य पिठाधीश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (cm uddhav thackery) भेटीला पोहोचले आहे. बंजारा समाजातचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश बाबूसिंग महाराज सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे. संजय राठोड यांच्यावर एकापाठोपाठ आरोप प्रकरण सुरू असताना बाबूसिंग महाराज सह्याद्रीवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेटण्यासाठी आलो, असल्याचं संस्थानच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.
एकीकडे खुद्द शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत भाष्य करत आहे. तर दुसरीकडे आता बंजारा समाजाकडूनही मुख्यमंत्र्यांना विनंती केली जात असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळवापसीच्या चर्चेंना पुन्हा वेग आला आहे. सुवर्णसंधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे होणार पदभरती मध्यंतरीच्या काळात पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे संजय राठोड हे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

10/08/2021

बंजारा तांडा वस्तीच्या विकासासाठी निधी वाढविणार - मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यातील बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध विकास योजनांच्या तरतूदीमध्ये वाढ करावी,ज्या दहा जिल्हयात बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय समिती करून त्या समितीवर बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात तांडा वस्ती सुधार योजना निधी वाटपाबाबत बैठक इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले,तांडा वस्ती सुधार योजनेसाठी दिला जाणारा निधी हा अत्यंत मर्यादीत आहे. या समाजाच्या विकासासाठी देण्यात येणा-या निधीची तरतूद विभागाने वाढवावी. यवतमाळ,नांदेड,जालना,परभणी, बीड, सोलापूर,औरंगाबाद, लातुर, हिंगोली, वाशिम या दहा ज्या जिल्हयात बंजारा समाज जास्त अशा जिल्हयात बंजारा समाजाची जिल्हास्तरीय समिती करून बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत.

जेणेकरून या समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तांडा वस्तींचा विकास करताना पाणी,रस्ते व समाजमंदिर या कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देशही मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

08/08/2021

15 ऑगस्ट पासून सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा

#मुंबईलोकल

15/06/2021

वाशिम जिल्ह्यातील यशवंतनगर ते पोहरा देवी-आमकिन्ही रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आश्वासनपूर्ती

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील यशवंतनगर –कारखेडा-सोयजना-पंचाळा राज्य मार्ग 273 ते पोहरा देवी-आमकिन्ही रस्त्याचा विशेष दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत दुरुस्तीचा 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासन पूर्ती केली.

श्री क्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यासह देशातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात येत असतो. भाविकांना येथे विनासायास जाता यावे, यासाठी पोहरादेवीला जाणारे रस्ते सुस्थितीत असावेत, अशी भाविकांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा मतदारसंघातील यशवंतनगर ते पोहरा देवी -आमकिन्ही (इजिमा 68) रस्ता या 22.70 किमी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आला होता. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

06/06/2021

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे बंजारा समाजच्यावतीने ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

02/04/2021

संवाद

26/03/2021

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना

Gor Samachar Send a message to learn more

19/03/2021

वाडी, चितापूर, कर्नाटक

09/03/2021

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

आमदार राजेश राठोड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मुंबई :-राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते.

औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 5 वाडी/तांड्याना महसुली गावांचा दर्जा देण्याचे प्रस्ताव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील आगरगाव व येरणगाव या महसुली गावाच्या बाहेर असलेल्या तांड्याना तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेल्हारा व दहेगाव या 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील डोंगराळ भागात ज्या धनगरवाड्या आहेत त्यांना सुविधा देण्यासाठी लोकसंख्येचे निकष बदलण्याबाबत विचार केला जाईल अशी माहितीही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सुरेश धस, रामदास कदम, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

Want your business to be the top-listed Media Company in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

ओबीसी आरक्षणसाठी बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार हरिभाऊ राठोड यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण केले आणि सरकारचे लक...
गोर सुरेखा पवार
गोर समाचार की ओर से सभी भाई बहन को होली की शुभकामनाये

Address

Manorama Nagar Road
Thane
400607

Other News & Media Websites in Thane (show all)
Tiranga Newz Tiranga Newz
Thane
Thane, 400615

Authentic and Breaking Newz Round the clock!!

Viral24Taas Viral24Taas
Thane
Thane, 400604

viral24taas is an Indian viral news channel that was launched on 1 may 2021. Which is to get out of the world of tension and have some fun. Which really happens in everyday life wi...

Megacitylive.com Megacitylive.com
Pokhran Road No 1
Thane, 400601

तुमच्या शहरातील प्रत्येक घटना आता सत?

Apla Maharashtra live Apla Maharashtra live
Thane, 400601

Maharashtra (India)State news

Salaam Thane Salaam Thane
Thane
Thane

Indian Citizentv Indian Citizentv
GCC CLUB Road, NEAR VEDANTA INTERNATIONAL SCHOOL, MIRA ROAD (EAST) THANE :-
Thane, 401107

Welcome to Indian Citizen TV News on YouTube - for the latest News from Politics, Entertainment, Bol

JantaDarbar JantaDarbar
Thane, 400605

यहां आपको राजनीति से जुड़ी ख़बरें,प्र?

Hindu_dharm Hindu_dharm
Bhiwandi
Thane, 421302

hello everyone ��.

IbmNews.in IbmNews.in
IBM NEWS
Thane, 400612

Indian Broadcast Media News ( IBM NEWS )

Daily Khabre Daily Khabre
Kausa
Thane, 400612

DailyKhabre is a professional news platform where you will get updated news of all catergories which

महाराष्ट्र माझा Maharashtra Majha महाराष्ट्र माझा Maharashtra Majha
Thane
Thane

सुपर फास्ट बातम्या चा वेगवान आढावा

News 27 Digital News 27 Digital
305 Ashar Sanjeev Near D Mart, Dhokali Kolshet Rood Thane West.
Thane, 400607

News 27 is an Local News Marathi Channel of Thane ,provides the hard core News to Thane