Shiku.in

E learning platform for rural education in Marathi

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण 11/04/2022

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण - https://mailchi.mp/b47e6af43b71/5dzd51iw7a-9007429

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण 05/04/2022

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण - https://mailchi.mp/f1afae3cce25/5dzd51iw7a-9004209

निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण

निर्यात व्यवसाय 09/03/2022

*निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण*

शेती माल किंवा शेती मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणे व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर तर आहे व तसेच सर्वसामान्यालाही सहज शक्य आहे. परंतु यासाठी निर्यात व्यवसायाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त मराठी तरुणांना निर्यात व्यवसाय सुरु करता यावा हा या हेतूने विनामूल्य व्हॉट्सॲप कोर्स तयार केला आहे. व्यवसायाबाबत माहिती ५ दिवसात टप्प्याटप्पयाने दिली जाईल.

*कोर्स जॉईन करण्याची अंतिम तारीख २३ मार्च*

आपल्याला निर्यात विषयक प्राथमिक माहिती हवी असल्यास खालील लिंक वरून ग्रुप जॉईन करा:

https://chat.whatsapp.com/IGVKzGvwEyrFIEHlsUPGIl

निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite

28/02/2022

https://shiku-elearning.blogspot.com/2022/01/shikuin.html

'निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण' कोर्सचे shiku.in वर प्रक्षेपण शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक व्यावहारिक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण....

निर्यात व्यवसाय 15/02/2022

शेतीमाल निर्यात याबाबत माहिती

https://chat.whatsapp.com/IGVKzGvwEyrFIEHlsUPGIl

निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite

वर्ष 2020-21 मध्ये कृषी निर्यातीत भारताने नोंदवली लक्षणीय वाढ 14/02/2022

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1725984

वर्ष 2020-21 मध्ये कृषी निर्यातीत भारताने नोंदवली लक्षणीय वाढ नवी दिल्‍ली, 10 जून 2021 देशाच्या कृषी निर्यात क्षेत्राने वर्ष 2020-21 मध्ये उत्तम कामगिरी क

14/02/2022

*निर्यातीसाठी समूह सक्रीयीकरण:*
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने(DoC) समूहांच्या सक्रीयतेसाठी APEDA च्या माध्यमातून अन्न उत्पादन संघटना आणि निर्यातदार यांना जोडण्याकरिता हस्तक्षेप केला. या जोडणीनंतर मालवाहतूक किंवा माल पाठविण्याच्या प्रक्रियेतील समस्या सोडविण्यात आल्या आणि भूबद्ध (land locked) समूहांकडून निर्यातीला प्रारंभ झाला.
या काही यशोगाथा :

*नागपूर क्लस्टर (संत्री ):*
115 मेट्रिक टन नागपूर संत्री आणि अंबियाबहार हंगामातील 45 मेट्रीक टन संत्री ((प्रथमच) समुद्रमार्गे मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात करण्यात आली आणि मोठी सुपरमार्केट्स म्हणजेच लुलू सुपर मार्ट, सफारी मॉल, नेस्टो इत्यादी मध्ये पुरविण्यात आली.

*डाळिंब क्लस्टर, महाराष्ट्र*
- वर्ष 2020-21.मध्ये सोलापूर क्लस्टरमधून 32,315 मेट्रिक टन डाळिंबाची निर्यात करण्यात आली.

*केळी क्लस्टर, महाराष्ट्र* - वर्ष 2020-21. दरम्यान केळीचे सोलापूरहुन 3278 , जळगावहून 280 आणि कोल्हापूर येथून 90 कंटेनर निर्यात करण्यात आले आहेत.

*कांदा क्लस्टर,*
महाराष्ट्र - जानेवारी ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व देश, बांगलादेशमधील विविध ठिकाणी 10,697 मेट्रिक टन ताज्या कांद्याची निर्यात करण्यात आली.

*द्राक्षे क्लस्टर* ,
महाराष्ट्र - वर्ष 2020-21. दरम्यान आतापर्यंत 91,762 मेट्रिक टन ताज्या द्राक्षांचे 6797 कंटेनर्स नाशिक क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियनला निर्यात करण्यात आले आहेत. सांगली क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये 13,884 मेट्रिक टन द्राक्षाचे 1013 कंटेनर आणि मनुकांचा एक कंटेनर निर्यात करण्यात आला आहे.

हे क्लस्टर्स कमी किंवा कोणत्याही अतिरिक्त गुंतवणूकीशिवाय विद्यमान स्रोतांचा वापर करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्लस्टर्सकडून नियमितपणे निर्यात होत आहे.

प्रभाकर फाउंडेशन – shiku.in 13/02/2022

प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला : प्रक्रियाकृत फळे व भाजीपाला निर्यातीत प्रामुख्याने वाळवलेल्या व आंबवलेल्या भाज्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वाळवलेले आले, कांदा, मश्रुम, लसूण, बटाटे इत्यादी. मिठाच्या अथवा साखरेच्या पाण्यातील किंवा व्हिनीगर यामध्ये टिकलेल्या भाज्या, फळांचे पल्प व ज्युसेस, वेगवेगळ्या डाळी इत्यादी. शेतीमालाच्या निर्यातीत प्रक्रियाकृत फळे व भाज्या यांचा हिस्सा ७.४% इतका आहे. यांची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, रशिया, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UAE, चीन इत्यादी देशांना होते. प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यातून होते.

www.shiku.in

प्रभाकर फाउंडेशन – shiku.in आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न पहा. स्वप्न पहाल तर साध्य कराल. तुमच्या आत्मविश्वाला शिक्षणाची जोड मिळाली तर तुमचं .....

12/02/2022

फुलशेती : फुलशेतीत मुख्यत्वेकरून गुलाब, एन्थुरिअम, जर्बेरा, कार्नेशन, शेवंती यासारखी फुले, कुंडीतील फुलझाडे, ग्रीनहाऊस मधील फुलशेती, इत्यादींचा समावेश होतो. भारताच्या शेतीमाल निर्यातीत फुलशेतीचा वाटा लहान आहे. शेतीमालाच्या केवळ ०.९% निर्यात ही फुलशेतीची आहे. परंतु भारत सरकारने फुलशेती उदयोन्मुख उत्पादन घोषित केले आहे व त्याच्या निर्यातीस प्राधान्य दिले आहे. फुलशेती निर्यात प्रामुख्याने अमेरिका, नेदरलँड, UAE, UK आणि जर्मनी या देशांना केली जाते. फुलशेतीची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यातून होते.

महाराष्ट्रातून जास्तीतजास्त शेती मालाची निर्यात व्हावी हा प्रमुख उद्देश.

निर्यात व्यवसाय 12/02/2022

शेती व शेती संलग्न मालाची निर्यात कशी करावी याबाबत माहिती या ग्रुप मध्ये दिली जाईल. व्यवसायाच्या वेगवेगळया भागांवर माहिती टप्या टप्याने दिली जाईल...

महाराष्ट्रातून जास्तीतजास्त निर्यात व्हावा हा प्रमुख उद्देश...

https://chat.whatsapp.com/IGVKzGvwEyrFIEHlsUPGIl

निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite

12/02/2022

ताजी फळे व भाजीपाला निर्यात:
भारताच्या ताज्या फळांच्या निर्यातीत प्रामुख्याने द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब, आंबे, पेरू, इत्यादींचा समावेश होतो. तर ताज्या भाज्यांत आलं, बटाटा, कांदा, वांगी, कोबी, इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. शेती मालाच्या निर्यातीत ताजे फळ व भाजीपाल्याचा ६.५% हिस्सा आहे. ताजी फळे व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने बंगला देश, UAE, नेदरलँड, नेपाळ, मलेशिया, UK, श्रीलंका, ओमान, कतार इत्यादी देशांना होते. ताजे फळ व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात, बिहार, पंजाब इत्यादी राज्यातून होतो

शेती व शेती माल कसा निर्यात करावा याबाबत सविस्तर माहिती घ्या...

www.shiku.in

28/01/2022

शिकू.इन, साचेबंद शिक्षण पद्धती पासून वेगळ्या या उपक्रमात लाभार्थी आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार आवश्यक ते ज्ञान घेऊ शकतो. याला ना शिक्षणाची अट ना वेळेचे बंधन. सर्व विषय अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून सादर केले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक विषयरील तज्ञ आपल्या शंकांचे तत्परतेने निराकरण करतील व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींत योग्य सल्ला देतील

उपक्रम आवडल्यास लाईक करा

25/01/2022

www.shiku.in

25/01/2022

www.shiku.in

शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक व्यावहारिक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण्यात आली आहे. कोर्स शृंखलेची विभागणी कशी केली आहे व या विभागांमध्ये आपल्याला काय शिकला मिळेल हे आता आपण पाहू. कोर्स पुढील अध्यायात विभागाला आहे :

( १ ) परिचय
( २ ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व संधी
( ३ ) निर्यात मार्केटिंग
( ४ ) निर्यात - कार्यप्रणाली व प्रलेखन
( ५ ) निर्यात - हाताळणी व वाहतूक
( ६ ) निर्यात - आर्थिक व्यवहार

कोर्सची मांडणी :
कोर्स, व्हिडिओच्या माध्यमातून सादर केला आहे. विषय फोटो, चित्रण इत्यादींच्या स्वरूपात मांडून सहज समजावा या स्वरूपात मांडला आहे. पाच ते पंधरा मिनिटाच्या विषयवार व्हिडीओमध्ये कोर्सचे वर्गीकरण केले आहे. यामुळे विद्यार्थ्याला आपल्या सवडीनुसार व एकाग्रतेने कोर्स पूर्ण करता येईल. व्हिडिओशिवाय कोर्स, पुस्तकी स्वरूपात देखील जोडला आहे. त्याचबरोबर आवश्यक तक्ते, संदर्भ व इतर वाचन कोर्स मध्ये जोडले आहे. आपल्याला कोर्सची माहिती किती झाली आहे या साठी कोर्सच्या प्रत्येक भागात प्रश्नमंजुषा जोडण्यात आली आहे. कोर्स केवळ डिजिटल माध्यमातूनच नसून, कोर्स करताना आलेल्या शंका आपण संचालकांना कळवू शकता. आपल्या शंकांना विषयातील तज्ज्ञ वेळोवेळी उत्तरे देतील व शंका निरसन करतील. इतकेच नव्हे तर निर्यात व्यवसाय स्थापना आणि व्यवस्थापन यात आपल्याला व्यवहारात येणाऱ्या अडचणीत मदत करण्याचा प्रयत्न करतील.

कोर्सचे सूत्र संचालक :
कोर्सचा आराखडा आणि अभ्यासक्रमाची मांडणी श्री. गिरीश घाटे यांनी केली आहे. श्री गिरीश घाटे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे येथून BE ( धातुशास्त्र ) यात पदवी घेतली व त्यानंतर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून MSc ( धातुशास्त्र ) यात उच्च पदवी संपादन केली. गेले ३५ वर्ष श्री. गिरीश घाटे आंतरराष्ट्रीय व्यापारात कार्यरत आहेत. श्री. गिरीश घाटे यानां इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज, दिल्ली या संस्थेने ‘उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्री. गिरीश घाटे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. श्री. घाटे यांनी प्रभाकर फौंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे व ते प्रामुख्याने शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात गेले १५ वर्ष कार्यरत आहेत. २०१९ साली श्री. घाटे यांना तत्कालीन आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी; श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कोर्स कोणी करावा :
शेती व शेतीसंलग्न मालाची निर्यात या विषयात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व करू इच्छित असणाऱ्या मराठी तरुण वर्गाला समोर ठेऊन हा कोर्स तयार केला आहे. आपला शेतीमाल निर्यात करणे किंवा स्थानिक बाजारातून माल खरेदी करून निर्यात करणे यात स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्यांना हा कोर्स अतिशय उपयोगी ठरेल. तसेच निर्यात कंपनीत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना देखील हा कोर्स अतिशय उपयोगी ठरेल. तसेच, निर्यात उद्योजक व वरिष्ठ व्यवस्थापक, शेती व्यवस्थापन शिक्षक, इत्यादीना देखील व्यवहाराची परिपूर्णता समजावून घेण्यास हा कोर्स उपयुक्त ठरेल.

पात्रता :
हा कोर्स करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही. परंतु विषयाचा आवाका पाहता कमीतकमी उच्च माध्यमिक शालेय शिक्षण झालेले असल्यास योग्य ठरेल. अथवा या विषयातील दहा ते बारा वर्ष व्यावहारिक अनुभव असल्यास देखील हा कोर्स करणे सहज होईल.

कालावधी :
हा कोर्स मुक्त शिक्षण पद्धतीने तयार केलेला असल्यामुळे याला वेळेचे बंधन नाही. आपल्या सवडीनुसार व गरजेनुसार हा कोर्स पूर्ण करता येईल. आपला चालू व्यवसाय अथवा नौकरी सांभाळून हा कोर्स करणे अपेक्षित आहे. रोज एक तास या कोर्स साठी दिल्यास हा कोर्स ४५ दिवसात पूर्ण करता येईल.

24/01/2022

प्रभाकर फौंडेशनने शिकू.इन ( www.shiku.in ) या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची नुकतीच स्थापना केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवून सर्वांगीण ग्रामविकास घडवून आणण्याचा हा प्रभाकर फौंडेशनचा एक प्रयत्न. ग्रामीण तरुणांना आर्थिक विकासात मार्गदर्शन करणे, शिक्षण, आरोग्य व समाज कल्याण विषयी जागरूकता निर्माण करणे या उद्दिष्टांनी या मुक्त व आभासी शिक्षण प्रणाली ची निर्मिती करण्यात आली आहे. साचेबंद शिक्षण पद्धती पासून वेगळ्या या उपक्रमात लाभार्थी आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार आवश्यक ते ज्ञान घेऊ शकतो. याला ना शिक्षणाची अट ना वेळेचे बंधन. सर्व विषय अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून सादर केले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक विषयारील तज्ञ आपल्या शंकांचे तत्परतेने निराकरण करतील व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींत योग्य सल्ला देतील.

प्रभाकर फौंडेशन एक स्वयंसेवी संस्था असून कंपनी अधिनियम २५ (१) अंतर्गत संस्थेची औपचारिक स्थापना २००६ साली ठाणे येथे करण्यात आली. शिक्षण व ग्रामीण विकास हे उद्देश समोर ठेऊन या संस्थेची स्थापना केली आहे. ठाणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक समविचारी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामीण शाळांसोबत संस्था काम करत आहे.

Want your school to be the top-listed School/college in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

www.shiku.in : शिका, शेती माल निर्यात कसा करावा

Telephone

Address

Thane
400601

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 1:30pm
Other Education Websites in Thane (show all)
Hitesh_221 Hitesh_221
Mumbra
Thane, 400612

hello guys I'm a hitesh follow share

EarningDesk EarningDesk
Thane
Thane

This page is about digital earning, earn from home, and affiliate market, Product review and knowled

Bhaktivedanta Gaur Shiksha Gurukulam Bhaktivedanta Gaur Shiksha Gurukulam
Ghodmal, Vasuri Bk, Wada
Thane, 421312

Hare Krishna!! Gurukul being epicentre of VARNASRAMA dharma initiative towards completing 50% of SP

A zer A zer
Thane, 400612

UCMAS Abacus Rustomjee Urbania UCMAS Abacus Rustomjee Urbania
I Wing, Above Wellness Forever, Rustomjee Urbania, Majiwade
Thane, 400601

UCMAS Abacus is a proven and tested Whole Brain Development Program for kids 4 to 13 yrs.

Supriya's Phonics Class Supriya's Phonics Class
Bhaskar Colony
Thane

Phonics Class, English grammar,Summer Camp

Sunil Ingole school Sunil Ingole school
Khewara Circle Road
Thane, 400601

ऑनलाईन गणित शिका Online Math Solution

DLB College DLB College
Balkum
Thane, 400607

Vidya Prasarak Sanstha’s & Sankalp Seva Mandal’s - DEVRAM LAXMAN BHOIR DEGREE COLLEGE OF ARTS, COMMERCE AND SCIENCE. Courses offered F. Y. B.Sc F. Y. BAF F. Y. BCom F. Y. BMS F.Y....

RCT Private Tuition RCT Private Tuition
Rm No 9 & 10, Jay Guru Dev Chawl, Nr Ambedkar Chauk, Baneli, Titwala (East)
Thane, 421102

Hi-Fi Techs Hi-Fi Techs
Thane, 400604

This is the official page of the youtube channel "Hi-Fi Techs" See Something New With Us.. #SeeSomet

jbc BAMMC marathi jbc BAMMC marathi
Naupada Thane West
Thane, 400602

जोशी बेडेकर महाविद्यालय मधील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचा (BAMMC MARATHI) हे अधिकृत अकाउंट आहे या