SFMM NGO

Welcome Savitribai Phule Mahila Mandal

Our focus in clearly on development of oppressed women, child

Welcome Savitribai Fule Mahila Mandal

Our focus in clearly on development of oppressed women, children and neediest section of our community helping them to help themselves.

20/11/2023

बालदिन: मुलांविषयीची अस्वस्थ करणारी आकडेवारी

• भारतातील एकूण लोकसंख्येच्या ० ते १४ असलेली लोकसंख्या २५.३१ टक्के आहे

१० ते १४ वयोगटातील १ कोटी ३० लाख मुले तीव्र गरिबीत जगतात.

भारतात भीक मागणाऱ्या मुलांची संख्या अंदाजे ५ लाख आहे. एकूण भिकाऱ्यात ही संख्या १४ टक्के आहे.

६ ते १४ वयोगटातील १२५३०१९ विद्यार्थी शाळेत जात नाहीत.त्यात मुलींची संख्या ५,५५,८५४ आहे

भारतात मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण २३.३ टक्के आहे. पाच लग्नातील एक विवाह हा १८ वर्षाच्या आतील मुलीचा असतो

५ ते १४ वयोगटातील १ कोटी १० लाख बालकामगार आहेत.

एका सर्वेक्षणात भारतातील १० मोठ्या शहरात रस्त्यावर राहणारी मुलांची संख्या २ लाख आहे.

मुला -मुलींना पळवून नेवून विक्री करण्याचे २०२१ साली ८००० गुन्हे नोंदवले. यावरून या प्रश्नाची तीव्रता लक्षात यावी. दहा लाख लोकसंख्येत हे प्रमाण १.६ मानले जाते. तेलंगणा त हे प्रमाण सर्वात जास्त असून महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गाझा मध्ये सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४२३७ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

संकलन : हेरंब कुलकर्णी

#

05/11/2023

Ultimate triumph..........team India 👍👍👍👍👍

28/10/2023

The house sparrow that filled our childhood with beautiful memories, is a bird in danger because of no new plantations and cutting trees in our locality.

Let's pledge to plant more trees and make our societies a better and safer place for these lovely creatures to grow.

24/10/2023

बुद्धम शरणम गच्छमि......
धम्मम शरणम गच्छमि......
संघम शरणम गच्छमि......
14 ऑक्टोबर 1956 रोजी ,अशोक विजयादशमी च्या पर्वा वर,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह सुमारे पाच लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
हा भारता च्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे, आणि त्याचे साक्षीदार माझे सासरे श्री कृष्णराव वानखेड़े आहे त्यांनी धम्म दीक्षा चा सोहळा स्वतः तिथ अगदी स्टेज च्या बाजूला उभ राहुन प्रत्यक्षदर्शी अनुभवाला, त्यांच वय, 83 वर्ष आहे आणि अजुनही त्यांना तो जसाच्या तसा आठवतो,
धम्मचक्र प्रवर्तन दिनाची बाबासाहेबांप्रति आदरांजली वाहताना ते सगळ सांगताना त्यांच्या डोळ्यात हृदयात भाव दाटून येतो......

Photos from SFMM NGO's post 14/10/2023

Walk for Freedom......

It's a day of global awareness and local action in the fight against human trafficking.
On Saturday, October 14, 2023, Our nursing school girls hit the streets to walk in a single file line–holding posters and handing out flyers–to reach their city with information about human trafficking and how to end it.

09/10/2023

Smile has the ability to instantly put a person in a better mood and convey a positive message to everyone.

Photos from SFMM NGO's post 02/10/2023

गांधी हा विचार आहे अहिंसेचा, शांतीचा आणि सत्य जोपासण्याचा.
"साधी राहणी उच्च विचार", हे शाळेत महात्मा गांधी जयंती निमित्त सांगितल होत, तेव्हा एवढ समजत नव्हत, की प्रत्येक वाक्यत, प्रत्येक प्रतीक मध्ये काहीतरी गूढ दडलेल असत. साधी राहणी उच्च विचार हे गांधीजींनी त्यांच्या जीवनात ओथंबून टाकल होत, साधी राहणी असेल कदाचित पण विचार ची उदात्तता जोपासण तेवढ कठिणच जात म्हणजे आजच्या घडीला physical appearance करण फार सोप आहे आणि त्याच्या जोडीला उच्च विचार तेवढ च कठीण आहे.
आज सेवाग्राम आश्रम इथ, श्री योगेन्द्र यादव, यानी गांधी ना संबोधताना तीन 'च' त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले, च, चष्मा; च, चरखा; च, चंपारण, गांधी जी चा चश्मा सर्वत्र माहीत आहे, अगदी लहान मुलाला पण गांधीजी ची ओळख करून द्यायची असेल तर ती चष्मा च्या माध्यमातून केली की त्यांना लवकर ओळख होते, exactly आज प्रत्येक माध्यम हे जाहिराती करिता, चष्मा चा वापर करतात, चष्मा draw केला की गांधीजी तिथ हाजिर, मग त्या चष्म्यातून ज्याला जस दिसत तसा बघायच.......स्वच्छता परिसराची, पण मनाच्या स्वच्छतेच काय,मन स्वच्छ तर परिसर न चुकता स्वच्छ होईल. त्यासाठी आपल्याला एक दिवसाची, एक आठवड्याची स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज भासणार नाही.
च, चरखा बघितल तर वाटत न सोप्प, नेमक तेच होत सोप्प किंवा कठीण वाटणारी गोष्ट आपण सहजपणे करू शकलो पाहिजे, आणि त्यासाठी धीर, एकाग्रता महत्त्वाची. चरख्यावर सूत काढताना ते लक्षात येत.
च, चंपारण्य, म्हणजे अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद, पण तीही अहिंसेच्या, सत्याच्या आणि शांतीच्या मार्गाने.
या गोष्टी आत्मसात करायला आणि जश्या च्या तश्या वापर करायला मनाच आणि बुद्धी च संयंत्र लागत......
अस त्यांनी साध्या भाषेत गांधी ला मांडल.
सर्व महान विभूति, गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग.........
ह्या विचार आहे आणि त्यांनी दाखवलेला मार्ग हाच अमृत पथ आहे.

महात्मा गांधी अमर राहो......
🙏🌹 कोटी कोटी नमन महात्मा 🌹🙏

27/09/2023

आपा.......
आपा ची मुलगी बुकाआपा चे वय वाढत चालले होते साधारण 24 वर्षा ची असेल ती, 1986 मध्ये लग्नाचे वय 24 आणि ते ही मुस्लिम वर्गातील ही फार चिंताजनक परिस्थिती होती आपाची, पण काय करणार..... बुकाआपा , तिला तिच्या लठ्ठपणा मुळे कोणी पसंतच करीत नव्हते, आपाची काळजी वाढत होती तशातच त्यांच्याकडे मोहम्मद अब्बा चा रिश्ता आला, त्या दिवशी आम्ही म्हणजे मी आणि सुनीता बाहेर च खेळत होतो, रिक्षा थांबली...तेव्हा कॉलोनी मध्ये एखादी रिक्षा आली तरी सगळेच पहायचे, ती तिच्या डेस्टिनेशन वर पोहोचे पर्यंत, त्या रिक्षातील लोकांनी आम्हांला विचारले, ए बेटा अब्दुल शेख चा घर कुठाय?
मी म्हंटले, "इथ च आहे चल सुनीता", आपा कडे
सुनीता आणि मी रिक्षा समोर धावत होतो. आणि थांबलो. रिक्षा पण थांबली,हेच आपा चे घर
आम्ही तिथच थांबलो, तेवढ्यात आपा रागवून म्हणाली, अभी क्या है, चल जाओ घर.......
आम्ही पण नाक मुरडून निघालो......
आणि परत खेळण सुरू केल, काही वेळानी रिक्षा परत जाताना दिसली ( त्यांनी रिक्षा तिथच थांबवली होती), रिक्षा जाईस्तोवर आम्ही दोघीही रिक्षा कडे पाहातच होतो....
आपा च्या हातात काहीतरी होते, आणि ती आमच्याच कडे येत होती आमची पुरती च घाबरली. ती आली आणि तिने आम्हाला दोन गुळाच्या पापड्या दिल्या,
ह्या घ्या आणि खा मस्त पैकी, माझ्या बुकाआपा लग्न जुळल....आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले, मी तिच्या कडे पाहताच होती, लहान असल्यामुळे तिची खुशी मला जाणवली नव्हती, पण गुळाच्या पापडी मुळे मी खुश होती......आपा च वागणे जसे कठोर होते, तसेच प्रेमळ ही........जगण्यातील आनंद असा च असायला हवा.

Photos from SFMM NGO's post 24/09/2023

आज दिनांक 24 सप्टेंबरला 23 स्नेहल नगर येथून प्रभात फेरी काढण्यात आली. सामाजिक सौहारद /सलोखा निर्माण व्हावे यासाठी स्नेहल नगरातील लोकांनी व भारतीय लोकशाही अभियानच्या कार्यकर्त्यांनी मिळूनही प्रभात फेरी काढली. त्यामध्ये प्रामुख्या ने मुलींचा आणि महिलांचा विशेष सहभाग होता, याशिवाय भारतीय लोकशाही अभियान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Photos from SFMM NGO's post 23/09/2023

भारतीय लोकशाही अभियान अंतर्गत सर्व धर्म समभाव प्रार्थना सावित्री बाई फुले महिला मंडळ, कार्यालय, स्नेहल नगर, येथे घेण्यात आली आणि त्याची सांगता ही संविधान उद्देशीका नी झाली......

Photos from SFMM NGO's post 23/09/2023

लोकमत कार्यालय, वर्धा, येथे, collector sir. श्री राहुल कर्डिले, तसेच उपजिल्हाधिकारी सौ.कर्डिले यांच्या हस्ते गणपतीची आरती पार पडली.........

Photos from SFMM NGO's post 17/09/2023

आज दिनांक 17 सप्टेंबरला 23 लक्ष्मीनगर येथून प्रभात फेरी काढण्यात आली. सामाजिक सौहारद /सलोखा निर्माण व्हावे यासाठी लक्ष्मी नगरातील लोकांनी व भारतीय लोकशाही अभियानच्या कार्यकर्त्यांनी मिळूनही प्रभात फेरी काढली. त्यामध्ये प्रामुख्याने मा. तेलंग साहेब जिल्हा परिषद सदस्य,
राष्ट्रवादी
कानगाव सर्कल ,मा. शीला गुजर ,माजी नगरपरिषद सदस्य काँग्रेस,काँग्रेस शहराध्यक्ष मा.सुधीर पांगुळ ,मा. प्रकाश गोटे, निवृत्त आयुक्त , एस आर रक्षे, निवृत्त पोलीस अधिकारी ,डॉ.अशोक चोपडे, सत्यशोधक समाज अध्यक्ष ,मा. अनुराधा देशमुख भाग्यश्री वानखेडे ,डॉ.विद्या उमाटे यांचा विशेष सहभाग होता, याशिवाय भारतीय लोकशाही अभियान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

16/09/2023

सोपे रस्ते चालायला सोपे असले तरी ते तुम्हाला जिथे जायचे असेल तेथे पोहोचवतीलच असे नाही. म्हणून रोबर्ट फोर्स्त याच्या चार ओळी "woods are lovely, dark and deep but I have promise to keep, miles to go before I sleep, miles to go before I sleep". या मार्ग दर्शक ठरतात.

Photos from SFMM NGO's post 07/09/2023

National Nutrition Week is observed every year in India from 1st September to 7 th September It is celebrated by Parvatibai Nursing School Students to raise awareness about the importance of nutrition in maintaining a healthy lifestyle and preventing diseases.

25/08/2023
Photos from SFMM NGO's post 25/08/2023
08/07/2023

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात.

डेंग्यू ताप हा भारतातील सर्वात सामान्य विषाणूजन्य संसर्गांपैकी एक मानला जातो.

डेंग्यू ताप (DENG-gey) हा डासांमुळे होणारा आजार आहे जो बहुतेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांमध्ये प्रभावित करतो. उच्च तापमान आणि फ्लूसारखी लक्षणे ही डेंग्यू तापाची सामान्य लक्षणे आहेत.

Hash tag #

04/07/2023

ग्रामीण भागातील महिलांसाठी चे व्यवसाय

जेव्हा केव्हा एखाद्या गावात जाण्याचा प्रसंग येतो, तेथील परिस्थिती बघत अस वाटत की खरच आपल्या ग्रामीण महिला होतकरू, कष्टाळू असतात त्यांना जर व्यावसायिक मार्गदर्शन मिळाल तर त्या निश्चित च त्या चांगला व्यवसाय करू शकतात.

वेशभूषा, केशभूषा, फॅशन डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, ब्युटी पार्लर, आरोमा थेरपी सेंटर, बेकरी युनिट, ग्रामीण हस्तकला, स्वेटर तयार करणे, सॉप्ट टॉइज तयार करणे, गृहउद्योग यांसारखे अनेक व्यवसाय ग्रामीण युवती सुरू करू शकतात. त्यातून चांगले व्यवसाय गावातल्या गावात सुरू होऊ शकतात. काही वस्तू ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये विकू शकतात.

Hash # women's empowerment

03/07/2023

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ नावाच्या ठिकाणी पहिला उपदेश दिला होता.

29/06/2023

ताराबाई सगळ्यानाच माहीत आहे, लहानपणी पाहिलेला ताराबाई चा खेळ.....खरच किती जोखिम घेवून दोरी वरून चालणे, सुई अगदी डोळ्यासमोर टोचून घेणे,
डोंबारी समाज आपल्या रस्त्यावरील खेळल्या जाणाऱ्या, तोल सांभाळत दोरखंडावरून चालणे आणि डोके खाली करून उडी मारणे अशा सर्कशीप्रमाणे खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतभरात डोंबारी विखुरलेले आहेत. त्यांना कोकणात भोरपी, सातारा, सांगली जिल्ह्यांत गोपाळ तर पश्चिम महाराष्ट्रात डोंबारी नावाने ओळखले जाते.अशी ही जमात यातील मुले त्यांचे शिक्षण होत नाही आणि मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना सतत च्या भटकंती मुळे शिकता येत नाही, शिवाय पोटाचा प्रश्न ऐरणीवर असतो, हे ही एक कारण असते शाळा न शिकण्याचे.मुलांना एकदा अस करुन पैसा मिळाला की, त्यातून त्यांना गुटखा, तंबाखू या सारख्या सवयी जडतात हे सुध्दा शाळेत न जाण्याच कारण ठरते, देशात बाल मजुरी कायदा इतका सक्तीचा आहे, तरी आपल्या आजूबाजूला कितीतरी मुल नुसत मजुरी करताना दिसतात, परिस्थिती त्यांना तस करायला भाग पाडते. यात मोठ्या लोकांचा समावेश जास्त असतो,कमी पैशात आपले काम होतात याचा जास्त विचार होतो. मग शिक्षण कस घेणार?समोर येवून त्यांना शिक्षणासाठी मदत करणे आणि त्यांना पण प्रवाहात आणणे, हाच उद्देश्य आमच्या संस्थे चा आहे.दोन आठवड्यांपूर्वी च अश्याच एका छोट्या मुली चा ताराबाई चा खेळ महिलाश्रम, सेवाग्राम रोड,( आमच्या घरा जवळ ) येथे सुरू होता मी आणि माझी नणंद, राणी दोघी activa वरून येत होतो, तेव्हा ती मुलगी दोरी वरुन काडी balance करत चालत होती. आम्ही थांबलो आणि खूप कौतुकाने तिच्याकड पाहू लागलो, ती इतकी confidant, अजिबात भीती नसणारी होती. अगदी सहजच ती चालत होती, तिचे बाबा ना लोक येता जाता 10 रुपये, 20 रुपये असे देत होते. आणि बढ़िया म्हणून जात होते, कोणी तिचे फोटो, कोणी वीडियो काढत होते. स्टेटस ला टाकायला. आम्ही पण पैसे दिले तेवढ्यात ती खाली उतरली, अतिशय लोभस, असणारी ती आठ वर्षाची चुणचुणीत मुलगी, माझ्यासमोर उभी राहिली आणि मी तिच्याकड पाहताच राहिली, मला काहीच सुचत नव्हत, अस वाटत होतं एवढ स्किल असणारे हे मुल किती सहज असतात, आपल्या मुलाने थोडस काही केल की लगेच कितीतरी वाह!वा! मिळवायला आपण पटापट मोबाइल वर करतो.या मुलांन मध्ये किती तरी talent आहे, तर अश्या मुलाना शिक्षण हे न्याय आहे.

24/06/2023

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते.

22/06/2023

आज थोडा पाऊस आला आणि आणखीनच गर्मी वाढली जून महिना चा शेवटचा आठवडा तरी पावसाचा पत्ता च नाही सर्वजण पावसाची चातका सारखी वाट बघत आहे.
ग्लोबल वॉर्मिंग वर सध्या जोरात चर्चा सुरू आहे, जो तो खूप जास्ती होणार्‍या सीमेंटीकरन,पाणी वाचवा, झाडे लावा यावर बोलताना दिसून येतात, पण खरी गरज आहे झाडे लावण्याची.1 जुलै वृक्षारोपण दिवस आहे, त्या दिवशी आपण सर्व मिळून जास्तीत जास्त
झाडे लावू
आणि झाडे जगवू
🌴🌴🌴🌿🪴🪴🍀🍀🍀🌳🌲🌳🌲🌳🌳🌳🌳

21/06/2023

Yoga is the gateway to happiness and the secret to a healthy mind. Wishing you a Happy International Yoga Day.

Hash #

20/06/2023

"बाबा मला खावू घेवून द्या नाजी", अस मला ऐकु आल, मी क्षणभर थांबली, एक छोटी मुलगी तिच्या बाबाच्या सायकल च्या मागच्या carrier वर बसुन होती साधारणतः सहा ते सात वर्षाची असेल, केस नीट बांधलेले पँट आणि लाल रंगाचे t-shirt आणि पायात स्लीपर घालून होती, बाबानी पांढरा सदरा, डार्क निळ्या रंगाचा पँट घातलं होत.
आज ची तारीख 18 जून होती सकाळपासून चे " Happy Father's Day" चे शेकडो मैसेज मोबाइल मध्ये जमा झाले होते वाचायला आवडेल असे काही होते.
रविवार असल्याकारणाने बाजारात भाजी घ्यायला आली होती तितक्यातच माझ्या कानावर या बाप लेकीचे शब्द पडले, आणि लेकीचा गोड आवाज ऐकुन मी थांबले.
बाबा नी सायकल स्टँड वर लावली.
आणि तिला पोटाशी घेत खाली उतरविले, व म्हणाले, काय पाहिजे बोल, जिलेबी खाशील का व?
हाव, अस म्हणत तिने मान डोलावली,
बाबा भजे पण पाहिजे घ्या न थोडास, घरी दादा साठी नेवू,
बरं, बरं नेवू, तू पहिल संपव इथ, जिलेबी.
ती आनंदून गेली. आणि जिलेबी भजे मस्त खात होती, मला तिचा निरागस पण पहावत च रहावा अस वाटत होत,
तिचा बाबा तिला पाहत होता आणि मनोमनी खुश होत होता, त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हत की, आज पूर्ण जग जिथ FATHER'S DAY साजरा करीत आहे, मोबाइल स्टेटस वर, Facebook, सोशल मीडिया वर, अश्या वेळेला या बाप लेकीच प्रेम किती निरागस, निस्वार्थ भावना असलेले,याची तुलना कुठल्याही सोशल मीडिया वर पाहिलेल्या वीडियो,फोटो वरुन होऊच शकत नाही.

Photos from SFMM NGO's post 19/06/2023

आज आमच्या पार्वती बाई नर्सिंग इंस्टिट्यूट, वर्धा च्या विद्यार्थिनींनी कुष्ठधाम, दत्तपूर ला भेट दिली......तिथ त्यांनी कुष्ठरोग बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घेतली.

कुष्ठरोगाचे मुख्य कारण काय आहे?
हॅन्सन रोग (कुष्ठरोग म्हणूनही ओळखला जातो) हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या हळूहळू वाढणाऱ्या जीवाणूंमुळे होणारा संसर्ग आहे.

एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग कसा होतो?
शास्त्रज्ञांना सध्या असे वाटते की जेव्हा हॅन्सन रोगाने ग्रस्त व्यक्ती खोकते किंवा शिंकते आणि निरोगी व्यक्ती बॅक्टेरिया असलेल्या थेंबांमध्ये श्वास घेते . हा रोग पकडण्यासाठी अनेक महिन्यांपासून उपचार न केलेल्या कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीशी दीर्घकाळ, जवळचा संपर्क आवश्यक असतो.

कुष्ठरोग कसा सुरू झाला?

हा रोग पूर्व आफ्रिका किंवा जवळच्या पूर्वेकडील भागात उद्भवला आहे आणि मानवी स्थलांतरामुळे पसरला आहे . युरोपीय किंवा उत्तर आफ्रिकेने गेल्या ५०० वर्षांत पश्चिम आफ्रिका आणि अमेरिकेत कुष्ठरोगाची सुरुवात केली.

आज काही कुष्ठरोग्यांच्या वसाहती आहेत का?
अशा सुमारे 750 वसाहती आजही भारतात अस्तित्वात आहेत , ज्यात अंदाजे 200,000 लोक राहतात. राजधानी श्रीनगरच्या बाहेरील काश्मीरची कुष्ठरोगी वसाहत 60 एकरांमध्ये पसरलेली आहे आणि एकूण 64 खोल्या आहेत ज्यात 200 लोक राहू शकतात.

18/06/2023

मागच्या वर्षी Lockdown सुरू व्हायच्या पूर्वी जेव्हा मी शाळेतून घरी यायची, तेव्हा सेवाग्राम रस्त्याचे बांधकाम सुरू होणार होते. आणि रस्ता रुंदी वाढणार त्या साठी कडेला असलेले मोठ मोठ्या झाडांची कत्तल केली गेली गांधीजींनी लावलेले झाडे अक्षरशः कापून जमिनीवर पडत होती. एक भल मोठ कडूनिंबा चे झाड माझ्यासमोर कापून पडत होते, मनात खूप कासावीस झाली, डोळ्यात पाणी आले, पण मी काहीच करू शकले नाही ही गोष्ट सातत्याने बोचत राहते, काही पर्यावरण संरक्षण वाल्यांनी विरोध केला होता त्याला त्यांच्या मीटिंग पण झाल्या गीताई मंदिरात मी पण उपस्थित होते पण जसा पाहिजे होता तसा विरोध झालाच नाही आणि रस्ता बांधकाम सुरू झाले.
नाशिक ला डॉ झाकीर हुसैन दवाखान्यातील ऑक्सिजन गळती मुळे, आपल्या लोकांसमोर लोकानी जीव गमावला, इकडे गळती झाली तरी ऑक्सिजन च्या कमी मुळे लगेच पुरवठा शक्य झाला नाही, त्यामुळे कितीतरी निर्दोष व्यक्ती या संकटाला बळी पडले, देशात सर्वत्र ऑक्सिजन साठी चा हा:हा:कार पाहता, या सर्व system ला मी कुठ तरी जवाबदार असल्याचे वाटते.
एक नागरिक म्हणून आपण काहीच करू शकलो नाही, कदाचित नव्हे तर अश्या वृक्ष कत्तल मुळेच आज ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली आणि ऑक्सिजन कमी मुळे, पैसे देऊनही ऑक्सिजन विकत घेता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता तरी तुकारामांच्या विचारांची परखड मांडू या
आणि वृक्ष वल्ली आम्हा सोयरे करू या
तेव्हाच निसर्ग व माणसाचा समतोल साधेल.
कोरोना सारखी महामारी पळेल.
🌲🌴🌳🌳🌿☘️🌱🌾🌱🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

environment

05/06/2023

आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकांत मानवी जीवन व निसर्ग अस्थव्यस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती होण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिवस साजरा केला जातो.
पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा 🌳🌱☘️🌿🌴🌻🌼🍀🪴🌈🏞🏝🌏

05/06/2023

आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकांत मानवी जीवन व निसर्ग अस्थव्यस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती होण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो.
सर्वाना पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा 🌴🌿🌿🌿☘️🌱🌳🌲🌼🌻🍀🪴🌈🏞🏝🌏

Want your public figure to be the top-listed Public Figure in Wardha?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ...
आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकांत मानवी जीवन व निसर्ग...
आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकांत मानवी जीवन व निसर्ग...

Category

Telephone

Address


Wardha
442001

Other Public Figures in Wardha (show all)
Mkw Edits Mkw Edits
Wardha

Hello Friends, Welcome To Mkw Edits. Guys Daily Dose Of Motivational & Life Changing Videos. Keep Support To Your Brother Please Follow, Like & Share

universaleye9 universaleye9
Wardha

Follow

mahadeo _event_007 mahadeo _event_007
Ganesh Nagar Borgoan Meghe Wardha
Wardha, 442001

mahadeo _event_007

AnNuuuu Gaming AnNuuuu Gaming
Sewagram
Wardha, 442102

Kind lost, no one to blame. Last night met an old foe, directing me the right way not sure if it’s life or a video game.

विदर्भ संदेश विदर्भ संदेश
Wardha

विदर्भ संदेश हे डिजिटल न्यूज पोर्टल अ?

trending mirch masala trending mirch masala
Wardha
Wardha, 442001

HI GUYS HOPE YOU ENJOYING hamre page me aap ko trending chije dekhne ko hi melengi or entertainment ❤

Bless of God is with me Bless of God is with me
Subhash Chowk Gond Plot Wardha
Wardha, 1552230

kunal_wankhede_007 kunal_wankhede_007
Arvi
Wardha

https://www.instagram.com/reel/CR6aAQdojlQ/?utm_medium=copy_link

Kriti creator Kriti creator
At Moi T. Ashti Dist . Wardha
Wardha

♥️♥️ study and gaming ♥️♥️♥️

____sahil_st ____sahil_st
Wardha

shubham_masra shubham_masra
Ngapuar Rod
Wardha

Saurabh Dongare - सौरभ डोंगरे Saurabh Dongare - सौरभ डोंगरे
Wardha

सर्व हिंदू बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत! धर्माचे पालन करणे पाखंड खंडन।🚩💪