Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal

Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal

You may also like

Sto-hk-holm
Sto-hk-holm

Vishuddha Vidyalaya (Established in 1954) is a leading educational institution in Yavatmal, Maharashtra, India.

The Institute conducts courses right from KG to Post Graduation, through its various affiliated Institutes.

Registration form for attending 27 January 2024 meeting of Ekvira Maji Vidyarthi Sanghatana, Yavatmal [ एकविरा माजी विद्यार्थी संघटना] - जे उपस्थित राहू इच्छित 17/12/2023

Please Register online for Ekvira Maji Vidyarthi Sammelan scheduled at Yavatmal on 27 January 2024 by clicking https://forms.gle/yU5XKjRWDPP7PHvi6 Ignore if already registered

Registration form for attending 27 January 2024 meeting of Ekvira Maji Vidyarthi Sanghatana, Yavatmal [ एकविरा माजी विद्यार्थी संघटना] - जे उपस्थित राहू इच्छित Vishuddha Vidyalaya, Shivaji Nagar, Yavatmal - 445 001 - email - [email protected] Website - vishuddha.org.in/alumni Mobile - 9823155883 Only past students intending to attend the meeting should fill this form.

Past student registration (Alumni) – विशुध्द विद्यालय, यवतमाळ 22/10/2023

एकविरा माजी विद्यार्थी संघटना [एकविरा म्हणजे एकत्रित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई]
Ekvira Maji Vidyarthi Sangathana
(Alumni of Vivekanand Vidyalaya, Rani Laxmibai Vidyalaya and Vyankatesh Vidyalaya)
विशुद्ध विद्यालय, शिवाजी नगर, यवतमाळ – 445001
वेबसाइट – vishuddha.org.in/alumni Email – [email protected]

विवेकानंद विद्यालय यवतमाळ, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ व व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी यांच्या माजी विद्यार्थ्यांची ‘एकविरा माजी विद्यार्थी संघटना’ [एकविरा म्हणजे एकत्रित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई] विजयादशमीच्या सुमुहूर्तावर स्थापन होत आहे (24 ऑक्टोबर 2023). विशुद्ध विद्यालयाच्या अंतर्गत संघटनेची हंगामी समिती गठित करण्यात येत आहे. कालांतराने स्वतंत्र पंजीकृत सोसायटी म्हणून गठित होईल.
विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय व व्यंकटेश विद्यालय यांच्या माजी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/ov7kF5syZBZFKNRS9 या लिंकवर कृपया ऑनलाइन नोंदणी करावी. नावाची नोंदणी निःशुल्क आहे. नोंदणीच्या अर्जाचा नमूना https://vishuddha.org.in/alumni या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे॰ ही नोंदणी फक्त संघटनेच्या सभासदत्वासाठी आहे.

माजी विद्यार्थ्यांचे 27 जानेवारी 2024 रोजी स्नेहसम्मेलन
विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय व व्यंकटेश विद्यालय यांच्या माजी विद्यार्थ्यांचे एक दिवसीय स्नेहसम्मेलन शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 या काळात आयोजित केले आहे. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी वेगळी लिंक देण्यात येईल.
या स्नेहसम्मेलनासंबंधी आपल्या काही सूचना व विचार असले तर ते कृपया लवकर कळवावे. आपणास यात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा असल्यास आपण अवश्य कळवावे॰ स्नेहसम्मेलनासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सूचना यथावकाश देण्यात येईल.
त्या सम्मेलनास आपण अवश्य उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच कळविण्यात येईल.

Past student registration (Alumni) – विशुध्द विद्यालय, यवतमाळ

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 12/10/2023

राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळच्या माजी मुख्याध्यापिका उषाताई दामले यांना वृद्धापकाळमुळे आज पहाटे देवाज्ञा झाली. त्यांच्या कर्तृत्वामुळे राणी लक्ष्मीबाई विद्यालय ही शाळा त्या काळात दामले बाईंची शाळा म्हणून प्रसिद्ध झाली होती. पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ त्या मुख्याध्यापक म्हणून शाळेमध्ये कार्यरत होत्या शाळेच्या उभारणीमध्ये त्यांचा वाटा हा सिंहाचा होता. शिस्तप्रिय, उत्तम शिक्षिका, कडक व मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्या उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी घडवलेल्या विद्यार्थिनी या आज विविध क्षेत्रांमध्ये उत्तम पदावर कार्यरत आहेत. विशुद्ध विद्यालय यवतमाळ या संस्थेच्या विकासामध्ये ही त्यांचा वाटा हा मोठा होता. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला शाळेकडून भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 21/08/2023

*राणी लक्ष्मीबाई विद्यालय हरित सेना यांचा नागपंचमी निमित्त आयोजित रॅलीमध्ये सहभाग* वनविभाग यवतमाळ जिल्हा व किंग कोब्रा ऍडव्हेंचर क्लब यांच्या वतीने नागपंचमीनिमित्त पर्यावरण संरक्षण निमित्ताने जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 14/08/2023

*राणी लक्ष्मीबाई विद्यालया मध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना*

शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे शिक्षक पालक संघाची सभा संपन्न झाली. प्रतिमा पूजन व दिपक प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सभेला अध्यक्ष म्हणून विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, सचिव श्री. विजय कासलिकर,संचालिका सौ. सुषमा दाते, संचालक श्री महेश जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. तांबेकर, यवतमाळ जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक श्री. अजित राठोड, पालक शिक्षक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. जयसिंगपुरे, माता पालक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. गुबे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक देवेंद्र भिसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पालक वृंद यांची उपस्थिती होती. या सभेचे प्रास्ताविक करताना शाळेचे पर्यवेक्षक श्री देवेंद्र भिसे यांनी मागील वर्षीच्या शालांत परीक्षेचा निकाल, क्रीडा स्पर्धा मधील विद्यार्थ्यांचे यश, विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले प्राविण्य तसेच शाळेत घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व या सभेचा हेतू कथन केला. त्यानंतर सत्र 2023 - 24 करिता पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व प्रतिनिधींचे वर्ग शिक्षकांनी पुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक श्री. अजित राठोड यांनी वाहतूक नियमां बद्दल माहिती देऊन पालकांमध्ये जागृती निर्माण केली. यानंतर पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व शिक्षक व संस्था सतत प्रयत्नशील आहे भविष्यातही प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. यानंतर संस्थेचे सचिव श्री. विजय कासलीकर यांनी मार्गदर्शन करताना पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली. शेवटी विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी संस्था नेहमीच विद्यार्थी व शाळा यांच्या विकासाकरिता कार्यरत आहे व विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवणे हे शाळेचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील शिक्षक श्री. साहेबराव चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. वंदना भगत यांनी केले.यानंतर पालक शिक्षक संघ कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. यामध्ये पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. भाकरे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. मेहता यांची निवड करण्यात आली.

02/08/2023

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून शाळेतील शिक्षिका कु. प्रतीक्षा महाजन यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. देवेंद्र भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा कार्यक्रमात सहभागी होते. शाळेतील विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे बद्दल माहितीपर भाषणे दिली. याप्रसंगी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंगांवर चित्र प्रदर्शनी व घोषवाक्य स्पर्धेचेआयोजन करण्यात आले.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 02/06/2023

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची मार्च 2023 च्या शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी.
स्थानिक विशुध्द विद्यालयाव्दारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा सत्र 2022 – 2023 चा दहावीचा निकाल 96.25 % लागला असून उत्तीर्ण विद्यार्थीनींपैकी 13 विद्यार्थीनींनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातील कु. निलीमा सुधाकर काकडे 94.40 % गुण प्राप्त करुन प्रथम आली, तर कु. श्रावणी मनोहर कपिले व कु. तन्वी किशोर कोंडेकर 94.20% गुण प्राप्त करून संयुक्तरित्या व्दितीय क्रमांक पटकवीला तर कु.निलीमा काकडे , कु.तन्वी कोंडेकर, कु.सई जोशी व कु कृतीका चौधरी यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. कु. खुशबु हिंगासपुरे हीने तृतीय क्रमांकावर असुन तीने 94.00% गुण प्राप्त केले. 90% पेक्षा जास्त गुण असणा-या 13 विद्यार्थिनी शाळेसाठी अभिमानास्पद ठरल्या. त्यांची नावे खालील प्रमाणे
कु. निलीमा काकडे 94.40% , कु.श्रावणी कपिले 94.20% , कु तन्वी कोंडेकर 94.20 % कु खुशबु हिंगासपुरे 94.00 % कु संचिता देशमुख 93.80% कु कृतीका चौधरी 93.60% कु श्रावणी मुळे 93.20 % , कु स्वाती खोडणकर 93.20 % कु सई जोशी 92.00 % कु मेघा फुपरे 90.60% कु अक्षदा जयसिंगपुरे 90.60% कु कोमल देउळकर 90.20% , कु गौरी भालेराव 90.00%
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्षा श्रीमती विद्याताई केळकर, सचिव विजय कासलीकर, सर्व विशुध्द विद्यालय संचालक मंडळ तथा शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी, पर्यवेक्षक देवेन्द्र भिसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

17/04/2023
New Era New Progress - Episode 8 (Last) 06/04/2023

https://youtu.be/nKsbF8KoLR4

भाग ८ - प्रगतीच्या मार्गावरची एकत्रित वाटचाल (शेवटचा भाग)

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committee) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 8 (Last) भाग ८ - प्रगतीच्या मार्गावरची एकत्रित वाटचाल (शेवटचा भाग) नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणि...

New Era New Progress - Episode 7 05/04/2023

https://youtu.be/NUgRR5QUh1Q

भाग ७ - आर्थिक कारभारातील पारदर्शकता

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committee) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 7 भाग ७ - आर्थिक कारभारातील पारदर्शकता नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्र.....

New Era New Progress - Episode 6 04/04/2023

https://youtu.be/B80Ybdl9t_E

भाग ६ - प्रगतीचा आढावा

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committee) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 6 भाग ६ - प्रगतीचा आढावा नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागी...

New Era New Progress - Episode 5 03/04/2023

https://youtu.be/A_f6ef91sMo

भाग ५ - मूलभूत सुविधा

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committe) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 5 भाग ५ - मूलभूत सुविधा नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील...

New Era New Progress - Episode 4 02/04/2023

https://youtu.be/oburVoZNtkM

भाग ४ - क्रीडा सुविधा

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committe) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 4 भाग ४ - क्रीडा सुविधा नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील...

New Era New Progress - Episode 3 01/04/2023

https://youtu.be/GBiJ7-XvISA

भाग ३ - शैक्षणिक सुधारणा

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committe) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 3 भाग ३ - शैक्षणिक सुधारणा नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मा...

New Era New Progress - Episode 2 31/03/2023

https://youtu.be/Mgb_JRIW_iQ

भाग २ - NAAC मानांकन

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committe) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 2 भाग २ - NAAC मानांकन नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर...

New Era New Progress - Episode 1 30/03/2023

https://youtu.be/0FqbRgVRHTY

भाग १ - प्रस्तावना

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

यवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ वर्षात कार्यकारिणी (Management committe) ने केलेल्या प्रगती वर आधारलेली माहितीपूर्ण ८ भागांची मालिका.

New Era New Progress - Episode 1 भाग १ - प्रस्तावना नवीन युग नवीन प्रगतीNew Era New Progressयवतमाळ मधील विशुद्ध आणि वाणिज्य या संस्थेचं प्रगती पुस्तक; मागील ६ .....

29/03/2023

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

८ भागांची छोटी मालिका

उद्या पासून (गुरुवार, ३० मार्च २०२३) - रोज सकाळी १० वाजता

आपल्या Youtube Channel वर (-N-Vanijya)
https://www.youtube.com/channel/UCVNPamG3xVgV0gMO10MH5ew

Vishudha-N-Vanijya - YouTube 22/03/2023

नवीन युग नवीन प्रगती
New Era New Progress

८ भागांची माहितीपूर्ण मालिका

Coming Soon...

on our Youtube Channel (-N-Vanijya)
Subscribe:

Vishudha-N-Vanijya - YouTube Share your videos with friends, family, and the world

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 06/02/2023

आज सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाद्वारा कुष्ठरोग आजार , लक्षणे, व उपचार तसेच कुष्ठरोग निर्मूलन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुळकर्णी तसेच पर्यवेक्षक श्री देवेंद्र भिसे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 24/01/2023

राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. कुळसंगे सर व श्री. देशपांडे सर यांनी विद्यार्थीनिंना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुळकर्णी सर व पर्यवेक्षक श्री. भिसे सर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 22/01/2023

राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाचा समारोप आनंद मेळाव्याने झाला. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते यांचे हस्ते झाले याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. विजयराव कासलीकर सर, संचालक मा. सुषमाताई दाते, श्री. मोरेश्वर चरेगावकर, श्री. लक्ष्मणराव खत्री, सौ. कासलीकर मॅडम, सौ. चरेगावकर मॅडम,कमला विद्यामंदीरचे मुख्याध्यापक श्री. सरबरे सर, बाबाजी दाते इंग्लीश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता पळसोकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुळकर्णी, पर्यवेक्षक श्री. देवेंद्र भिसे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष कुळसंगे यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. श्री. मडावी व श्री. देशपांडे यांनी चालता चालता बोलता बोलता या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थीनिंना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले व बक्षिसे दिली. सर्व विद्यार्थीनिंचा या आनंद मेळाव्यात उस्फूर्त सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 09/01/2023

विशुद्ध संस्थेतील घटक संस्थांचा संयुक्त शारीरिक शिक्षण दिन उत्साहात साजरा
* २१०० विद्यार्थ्यांनी सादर केली शारीरिक प्रात्यक्षिके
* विविध कवायतींनी वेधले प्रेक्षकांचे लक्ष
शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय अंतर्गत विविध घटक संस्थांचा संयुक्त शारीरिक शिक्षण दिन शनिवार, दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी यवतमाळ, विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणावर २१०० विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायतींद्वारे संपन्न झाला.
राणी लक्ष्मीबाई विद्यालय, विवेकानंद विद्यालय, ध्रुव प्राथमिक शाळा, व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय, दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय, रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मिडियम स्कूल आणि बाबाजी दाते इंग्लिश मिडियम स्कूलच्या २१०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी चित्तवेधक शारीरिक कवायती सादर केल्या.
विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, सीमा पापळकर, ग्वाल्हेर येथील माजी प्रभारी कुलगुरू प्रो. अरविंदसिंग साजवान, विशुद्ध संस्थेच्या उपाध्यक्ष विद्याताई केळकर, सचिव विजय कासलीकर, उद्योजक चंद्रकांत रानडे, पालक प्रतिनिधी पुंडलिक उमाटे, संस्थेच्या सहसचिव मीरा केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, सदस्य महेश जोशी व शालेय समिती सदस्य मोहन देव प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
स्वागत प्रणामाने अतिथींना मानवंदना दिल्यानंतर संस्थेच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. शालेय प्रार्थना प्रास्ताविका व ध्यानयोगानंतर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. यावेळी संगीता जाधव, गुणवंत पुनवटकर व पूर्णाजी खानोदे या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शारदा स्तवन व सामूहिक गीत सादर केले.
संस्थेचे सचिव विजय कासलीकर यांनी प्रास्ताविकात संस्था शारीरिक शिक्षणाप्रती कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता संस्थेच्या सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये खेळ व क्रीडेकरिता प्रोत्साहन दिले जाते असे सांगितले. याप्रसंगी कश्मीर ते कन्याकुमारी सहा तासात सायकलप्रवास करणाऱ्या व गिनीज बुकात नोंद झालेल्या विश्वविक्रमी सायकलपटू डॉ. महेश मनवर, डॉ. आशिष गवरशेट्टीवार, डॉ. हर्षल झोपाटे, डॉ. जया मनवर, अभियंता सुरेश भुसंगे व अभिजीत राऊत यांचा शाल रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेला वेळोवेळी सहकार्य करत आलेले ज्येष्ठ संगीततज्ज्ञ देवराव भालेराव, माजी मुख्याध्यापक ताराचंद चव्हाण व मुकुंद बावणे व प्रयोगशाळा परिचर लक्ष्मण वानखडे यांचाही शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थी खेळाडूंना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
त्यानंतर श्रीकांत देशपांडे, प्रफुल्ल गावंडे, हामंद, मन्साराम सावलकर व दिनेश गहरवार या क्रीडाशिक्षकांच्या मार्गदर्शनात झालेल्या सादरीकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना संचलन सलामी दिली. यानंतर बैठी कवायत, खडी कवायत, जम्पिंग पिटी, मिश्र कवायत, स्टिक ड्रिल, प्लॉवर ड्रिल, डंबेल्स, मल्लखांब, क्लॅप ड्रिल, लेझीम, ताली योग, मानवी मनोरे, लाठीकाठी, दंड बैठक व बनेटी यासारखी डोळ्यांचे पारणे फेडणारी शारीरिक प्रात्यक्षिके सादर झाली. गोंडी नृत्य, टिपरी नृत्य, देशभक्तीपर नृत्य तसेच टेंभा नृत्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. 'अनेकता मे ऐक्य मंत्र का' हे संचलनगीत सर्व विद्यार्थ्यांनी सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, आपल्या ३३ वर्षांच्या सेवेत इतका शिस्तबद्ध कार्यक्रम पहिल्यांदाच पहायला मिळाला. प्रेक्षकांना एकाही मिनिटांची उसंत न देता २१०० विद्यार्थ्यांनी हा महाचित्रपटच सादर केला. देशप्रेमाने ओतप्रोत कार्यक्रमाने अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले.
आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांनीही मुलांचे टीमवर्क तथा शिस्तीचे कौतुक करून उच्च ध्येय ठेवण्यास सुचविले तर अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी मुलांचे कौतुक करून असा कार्यक्रम दरवर्षी घेण्याचे बोलून दाखविले.
कार्यक्रमाचे संचालन विवेक कवठेकर, राजेश चव्हाण, देवेंद्र भिसे व विवेक अलोणी यांनी केले. व्यंकटेश विद्यालय घोडखिंडीच्या मुख्याध्यापक स्वाती जोशी यांनी आभार मानले. दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बलवंत सहस्रबुद्धे, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, बाबाजी दाते इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य अस्मिता पळसोकर, रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य किरण देशकर, डाॅ. सुभाष डोंगरे, अविनाश जोशी व हेरंब पुंड यांनी अतिथींचे स्वागत केले. सामूहिक वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळेस विविध शाळांचे पालक प्रतिनिधी, क्रीडाशिक्षक, पत्रकार, निमंत्रित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 23/12/2022

दिनांक 22 डिसेंबर हा दिवस थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्य राणी लक्ष्मीबाई विद्यालयामध्ये गुरुवार दि.22 डिसेंबर रोजी "गणिताची वाढविण्या गोडी खेळांची मांदियाळी " या उक्ती प्रमाणे गणित विषयात रुची निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त व 'निपुण भारत' या उपक्रमांतर्गत शाळेत *भास्काराचार्य अंक बगीचा
* आर्यभट्ट चित्रकला प्रदर्शनी
*रामानुजन खेळ कक्ष
*भौमितिक उपहारगृह चे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनास केंद्रप्रमुख माननिय श्री. मेनकुदळे सर, शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित शिक्षिका महाजन मॅडम व पेटेवार सर यांनी विशेष प्रयत्न केले.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 21/12/2022

राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील वर्ग 5 क च्या विद्यार्थीनिंनी परिसर अभ्यास भाग 1 या विषया अंतर्गत येणाऱ्या प्रकरण 17 "वस्त्र आपली गरज" या घटका अंतर्गत "वस्त्रांचे प्रकार" या उपक्रमाचे आयोजन केले. वर्गातील सर्व विद्यार्थीनिंनी या मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व विविध प्रकारच्या कापड प्रकारातून वस्त्र निर्मितीचा अनुभव घेतला. या उपक्रमा करता वर्ग 5 क च्या वर्गशिक्षिका कु. उमप मॅडम यांनी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

Photos from Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal's post 21/12/2022

मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालयामध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुलकर्णी यांनी याप्रसंगी विद्यार्थीनिंना मार्गदर्शन करताना संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री चा उल्लेख केला. यामध्ये भुकेलेल्यांना अन्न द्या. तहानलेल्यांना पाणी द्या. कपडे नसणाऱ्यांना वस्त्र द्या. बेघरांना आसरा द्या. अंध अपंग यांना मदत करा. बेकरांना रोजगार मिळवून देण्याकरता मदत करा. पशुपक्षी मुख्य प्राण्यांना अभय द्या. गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या. दुःखी व निराश लोकांना हिम्मत द्या व गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करा. याचा उल्लेख केला यानंतर गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता संदेश विद्यार्थिनीं पर्यंत पोहोचवला व त्यानिमित्ताने शाळेच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियानाची आयोजन केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबांनी दिलेल्या संदेशाचे पालन केले.

Want your organization to be the top-listed Government Service in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित...
Rani Laxmibai Vidyalaya Yavatmal

Telephone

Address


Tilakwadi
Yavatmal

Other Public & Government Services in Yavatmal (show all)
Gst Support Center, datta chowk Gst Support Center, datta chowk
Shree Financial Services, Nagar Paishad Building, 1st Floor, Bhaji Market, Datta Chowk, Yavatmal
Yavatmal, 445001

GST| PAN CARD|AADHAR|MSME|ITR|MONEY TRANSFER AND 250+ SERVICES CALL- 9552155571

YAVATMAL-Cotton City YAVATMAL-Cotton City
Yavatmal, 445001

https://en.wikipedia.org/wiki/Yavatmal

Sai xerox internet lic sq yavatmal Sai xerox internet lic sq yavatmal
Lic Square, Bajoriya Complex
Yavatmal, 445001

ALL TYPES OF ONLINE FORM SUBMITED

Shri Vasantrao Naik Govt Medical College, Yavatmal. Shri Vasantrao Naik Govt Medical College, Yavatmal.
Govt Medical College
Yavatmal, 445001

In Vidarbha region of the Maharashtra state of India that provides medical education at undergraduat

Thakare Construction And Infrastructure Company Thakare Construction And Infrastructure Company
Rajani Park Pimpalgaon Road Near Balaji Mangalam
Yavatmal, 445001

The construction company which work on government and semi government project along with private projects also & specifications in terrace interior garden