Captain Ashish Damle

Captain Ashish Damle

कॅप्टन आशिष दामले...

17/11/2023

मराठी माणसाच्या हितासाठी लढणारे, मराठी माणसांचे प्रश्न प्रामुख्याने मांडणारे लढवय्ये नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#बाळासाहेब_ठाकरे

15/11/2023

शानदार, जबरदस्त, विक्रमी विराट..!

विराट कोहली ने शानदार शतक झळकावत एकदिवसीय सामन्यात ५० शतकांचा विक्रम प्रस्थापित केला. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला. विराट चे मनःपूर्वक अभिनंदन..!

Virat Kohli

15/11/2023

बदलापूर येथील विजय राठोड, तारू राठोड व सहकाऱ्यांनी आज माझी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भेटून आनंद झाला.

#दिवाळी_२०२३

15/11/2023

आदिवासींच्या उत्थानासाठी लढा देणारे, स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान देऊन संघर्ष करणारे जननायक बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन.

15/11/2023

मा भ्राता भ्रातरं द्विक्षन्, मा स्वसारमुत स्वसा।:

भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, गोडवा आणि आपुलकी वाढवणारा सण म्हणजे भाऊबीज... बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा भाऊ आणि भावाच्या सुखदुःखात सोबत करणारी बहीण हे नातेच विलक्षण सुंदर आहे. सर्व भगिनींना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!

#दिवाळी_२०२३
#भाऊबीज

14/11/2023

बदलापूर येथील सृष्टी प्रारंभ सोसायटी मधील रहिवाशांनी दिवाळीनिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. लोक आवर्जून भेटून शुभेच्छा देत आहेत याचा खूप आनंद होतो आहे. माणसांची ही संपत्ती खूप मोलाची आहे. धन्यवाद सर्वांचे आणि शुभेच्छा!

#दिवाळी२०२३

14/11/2023

लक्ष्मण गायकवाड, दत्ता राठोड व सहकाऱ्यांनी दिवाळीनिमित्त भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

#दिवाळी२०२३

14/11/2023

आधुनिक मूल्ये आणि विज्ञाननिष्ठेची कास धरत विज्ञान व शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देत देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! बालदिनाच्या शुभेच्छा.

14/11/2023

केवल म्हसे यांनी आज दिवाळीनिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. धन्यवाद... दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

#दिवाळी२०२३
#दिवाळी_पाडवा

14/11/2023

आपुलकी, प्रेम अन स्नेहाचा गोडवा..
घेऊन येई दिवाळी पाडवा..

बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. क्षमाशीलतेचे, दातृत्वाचे प्रतीक असलेल्या बळीराजाचे स्मरण करून हा दिवस साजरा केला जातो. 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. जगाचा पोषणकर्ता बळीराजाला सुखाचे दिवस येवो या सदिच्छेसह सर्वांना पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा!!

13/11/2023

बदलापूर येथील नीळकंठ धारा सोसायटीच्या रहिवाशांनी आज माझी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लोक आपुलकीने जे प्रेम दाखवतात याचा वेगळाच आनंद आहे. सर्वांना खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या पुनश्च एकदा शुभेच्छा!

#दिवाळी२०२३

12/11/2023

बदलापूर येथील 'लिज्जत पापड'च्या शाखेतील लक्ष्मीपूजन आज माझ्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहो याच सदिच्छा!

याठिकाणी ४०० महिला काम करतात. या सर्वांच्या आयुष्यात भरभराट होवो. दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.

#दिवाळी२०२३
#लक्ष्मीपूजन

Photos from Captain Ashish Damle's post 12/11/2023

बदलापूर येथील 'रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया' यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. स्वरगंधार हा गाण्यांचा सुरेल कार्यक्रम अनुभवता आला. यानिमित्त भेटीगाठीही झाल्या. सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा तेजोमय शुभेच्छा!

#दिवाळी
#दिवाळी_पहाट

12/11/2023

Let the Aura be as powerful as sun’s energy!

12/11/2023

समृद्धी यावी सोनपावली, उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा, वर्षा व्हावी हर्षाची
ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात मंगल, चैतन्य आणि समृद्धी घेऊन येवो ही प्रार्थना. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.

10/11/2023

ओंकार यादव यांनी बदलापूर शहरात सीएट टायर ची नवीन फ्रांचाईजी असलेले 'साईराज सीएट टायर' हे दुकान सुरू केले आहे. आज त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. नव्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मनापासून सदिच्छा!

Photos from Captain Ashish Damle's post 10/11/2023

दुर्वांकुर वारंग याला आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बदलापूर शहरच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसचे शहराध्यक्ष निखिल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज संघटनेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

दूर्वांकुर व निखिल यांना खूप शुभेच्छा! आपल्याकडून चांगले काम होवो याच सदिच्छा.

#सदिच्छा
#बदलापूर
#अजितपर्व

10/11/2023

आज धनत्रयोदशी... कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

#दिवाळी
#धनत्रयोदशी

09/11/2023

स्वराज सेना आयोजित आधाराची भिंत या उपक्रमाला भेट दिली. या उपक्रमाअंतर्गत कपडे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू गोळा केल्या जात आहेत. बदलापूर येथील स्कायवॉक स्टेशनवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी आवर्जून इथे भेट देऊन आपल्याकडे असणाऱ्या वस्तू आपण इथे द्या. एखाद्या गरिबाला त्याचा नक्की फायदा होईल.

#आधाराची_भिंत
#बदलापूर

09/11/2023

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस तसेच दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

#दिवाळी_२०२३
#वसुबारस

08/11/2023

Wish you a very happy birthday khade kaka…

08/11/2023

Start of a vibrant day on the tune of coffee!

08/11/2023

'समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.'

असे अगदी सहज वाटणारे विचार मांडत वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक, चित्रपट, संगीत, नाट्य अशा सर्व कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पू. ल. देशपांडे अर्थातच भाईंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#पुलदेशपांडे

05/11/2023

समर्थ कृपा या दातांच्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो होतो. बदलापूर येथील गणेश चौकात पाटील परिवाराने या नवीन दवाखान्याची सुरुवात केली आहे. त्यांना शुभेच्छा! अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो याच सदिच्छा.

#शुभेच्छा

05/11/2023

Great Milestone for Virat Kohli on his 35th birthday, as he matches Master blaster Sachin Tendulkar's record of centuries in ODI’s with a stunning hundred today! 🙌 Congratulations

05/11/2023

१८४३ साली सुरुवात झालेली मराठी रंगभूमी आजतागायत आपला समृद्ध वारसा जपून आहे. रंगभूमीवर नव्याने घडणारे प्रयोगदेखील जास्तीत जास्त प्रेक्षकांना जोडत आहेत. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आता जगभर ती गाजते आहे. याचे श्रेय अर्थातच रंगभूमी जपणारे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, संगीतकार यांना आहेच पण रंगभूमीला वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक रसिकाचे देखील आहे. सर्वांना रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

#मराठी_रंगभूमी_दिवस

04/11/2023

Wish you a very happy birthday laxman gaikwad!

04/11/2023

Photos from Captain Ashish Damle's post 03/11/2023

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व महिला सक्षमीकरण मंत्रालय व सामाजिक बदल अभ्यास केंद्र यांच्या वतीने ५ दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वृद्धांची प्राथमिक काळजी या विषयावर ही कार्यशाळा संपन्न झाली. माझ्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र वितरित केले गेले. या कार्यशाळेचा एक भाग झाल्याचा आनंद आहे. असे विषय सध्याच्या काळात महत्त्वपूर्ण आहेत. त्याबाबत जागृती होते आहे हे कौतुकास्पद आहे.

#वृद्धांची_काळजी
#सामाजिक_न्याय
#सामाजिक_बदल

02/11/2023

विश्वचषक स्पर्धेच्या भारत व श्रीलंकेच्या आजच्या सामन्यात भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा करत श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले. ३०२ धावांनी त्यांच्यावर मात करत ऐतिहासिक विजयही मिळवला. संघ विश्वचषकाच्या जवळ आला आहे. संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

02/11/2023

'व्हॉइस ऑफ मीडिया' या संघटनेच्या वतीने १८ व १९ नोव्हेंबर रोजी बारामती येथे पत्रकारांचे अधिवेशन आयोजित केले आहे. आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून याचे आमंत्रण दिले. अधिवेशनात होणाऱ्या चर्चा तसेच कार्यक्रमांबाबत माहितीही दिली.

#पत्रकार_अधिवेशन

31/10/2023

जेव्हा जनता एकत्र येते तेव्हा त्यांच्यासमोर कोणतेही शासन टिकू शकत नाही. असे म्हणत देशबांधणीत महत्त्वाचे योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! देशाच्या एकतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.

#सरदार_वल्लभ_भाई_पटेल

31/10/2023

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, विकासाभिमुख, कर्तव्यकठोर आणि दूरदृष्टीने परिपूर्ण नेतृत्व, आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

30/10/2023

सिमरन गुप्ता व श्वेता गुप्ता या युवा उद्योजिकांनी मिळून बेलवली येथे 'आयकॉनिक ब्युटी पार्लर' सुरु केले आहे. आज या पार्लरचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले. सिमरन व श्वेता या दोघींना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा!

#नवा_व्यवसाय
#शुभेच्छा

Photos from Captain Ashish Damle's post 30/10/2023

बदलापूर शहरातील कात्रप येथील गायत्री गार्डन जवळील रिक्षा थांब्याचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी कराळे, सागर सावंत, रिक्षा संघटनेचे भांडे, राठोड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


#बदलापूर

Photos from Captain Ashish Damle's post 29/10/2023

बदलापुरातील बिनधास्त बोला कट्टा यांच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. गांधी चौक येथील मारुती मंदिर देवस्थान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. आयोजकांनी हा उपक्रम घेऊन मला त्यात सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..!

गणपती बाप्पा मोरया.

#बदलापूर
#कॅप्टनआशिषदामले

29/10/2023

किरण म्हात्रे यांनी माझी नावाचा सुंदर अर्थ आपल्या कलेतून मांडला. मला आज ही कलाकृती त्यांनी भेट दिली. किरण यांचे खूप खूप धन्यवाद. लोक विविध मार्गांनी त्यांचे प्रेम व्यक्त करतात याचे खूप बरे वाटते.

#पेंटिंग
#प्रेम

29/10/2023

निखिल भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. निखिल व सर्वांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

#पक्ष_प्रवेश
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
#अजितपर्व

Photos from Captain Ashish Damle's post 29/10/2023

वेटलिफ्टिंग असोसिएशन, ठाणे आणि AB's फिटनेस सेंटर बदलापूर आयोजित वेटलिफ्टिंग स्पर्धेला उपस्थित राहिलो. स्पर्धेत 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ॲड. अजय पवार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न झाली. मुलांमध्ये विविध क्रिडाप्रकारात रस निर्माण व्हावा, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन खूप महत्त्वाचे आहे.

#वेटलिफ्टिंग
#बदलापूर_शहर_राष्ट्रवादी_पार्टी
#अजितपर्व

Photos from Captain Ashish Damle's post 29/10/2023

खरवई येथे आयोजित रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराला उपस्थित राहिलो होतो. बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री दिनेश धुमाळ यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ते सातत्याने अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!

#रक्तदान
#नेत्रतपासणी
#अजितपर्व

Videos (show all)

मागावे काय आम्ही सदगुरूंना,सर्व ठावे ते माझ्या शंकराला ।गुरुभक्तांचा गुरुचरणी भार,बाबा घेतील त्यांचा कैवार ।।पुण्यातील ध...
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. आपल्या गोधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. यानिमित्ताने आज आमच्या गाई-वासरांच...
शारदीय नवरात्रौत्सवाची आजपासून सुरूवात होत आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस. शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे ...
सृजन्तं पालयन्तं च संहरन्तं निजेच्छया।सर्वविध्नहरं देवं मयूरेशं नमाम्यहम् ॥सर्वशक्तिमान, बुद्धिदाता श्री गणेश आपल्या जीव...
चांद्रयान २ मध्ये आलेल्या सर्व अडथळ्यांचा, चुकांचा अभ्यास करून पुरेसा वेळ घेऊन अत्यंत संयमाने चांद्रयान ३ ची कामगिरी आपल...
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या रिल मेकिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या स्पर्धेत आलेले रिल बघतां...
युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी, भविष्य घडविण्यासाठी युवांच्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखून, सशक्त...
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वतंत्र भारताची एकता, अखंडता, सार्वभौमत्व जपण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर ...

Telephone

Website