Captain Ashish Damle Videos

Videos by Captain Ashish Damle. कॅप्टन आशिष दामले...

मागावे काय आम्ही सदगुरूंना,सर्व ठावे ते माझ्या शंकराला ।गुरुभक्तांचा गुरुचरणी भार,बाबा घेतील त्यांचा कैवार ।।पुण्यातील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. दिवाळीच्या निमित्ताने बाबांचे दर्शन घेतले. सर्वांना उत्तम आरोग्यासह सुख, समाधान आणि शांती लाभो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.जय शंकरबाबा !

Other Captain Ashish Damle videos

मागावे काय आम्ही सदगुरूंना,सर्व ठावे ते माझ्या शंकराला ।गुरुभक्तांचा गुरुचरणी भार,बाबा घेतील त्यांचा कैवार ।।पुण्यातील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. दिवाळीच्या निमित्ताने बाबांचे दर्शन घेतले. सर्वांना उत्तम आरोग्यासह सुख, समाधान आणि शांती लाभो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.जय शंकरबाबा !

आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. आपल्या गोधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. यानिमित्ताने आज आमच्या गाई-वासरांची पूजा केली. आपले गोधन हीच आपली संपत्ती आहे. तिची जपणूक करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहूया. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!

शारदीय नवरात्रौत्सवाची आजपासून सुरूवात होत आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस. शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचे क्षण आणोत हिच सदिच्छा. #नवरात्र

सृजन्तं पालयन्तं च संहरन्तं निजेच्छया। सर्वविध्नहरं देवं मयूरेशं नमाम्यहम् ॥ सर्वशक्तिमान, बुद्धिदाता श्री गणेश आपल्या जीवनात आनंद घेऊन येवो याच सदिच्छा! #गणेशोत्सव #गणेश_चतुर्थी

चांद्रयान २ मध्ये आलेल्या सर्व अडथळ्यांचा, चुकांचा अभ्यास करून पुरेसा वेळ घेऊन अत्यंत संयमाने चांद्रयान ३ ची कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांनी पार पडली आहे. गेल्या एक - दिड महिन्यांपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करणारे चांद्रयान आज यशस्वीपणे चंद्रावर दाखल झाले आहे. जगभरात या कामगिरीने भारताने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन. #Chandrayaan3 #ISRO #isroindia

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या रिल मेकिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या स्पर्धेत आलेले रिल बघतांना थक्क व्हायला होते. आपल्या बदलापुरातील रहिवासी श्री. ऋषिकेश गायकवाड यांनी बदलापूर मध्ये माझ्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या सुंदर रील साठी मनःपूर्वक आभार..!

युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी, भविष्य घडविण्यासाठी युवांच्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखून, सशक्त समाज घडवण्यासाठी त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा निश्चय करूया.आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा! #InternationalYouthDay

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वतंत्र भारताची एकता, अखंडता, सार्वभौमत्व जपण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याची प्रतिज्ञा आज घेऊया. जय हिंद 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #IndependenceDayIndia