SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus

SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus

SNDT Women’s University is the first Women’s university in India as well as in South-East Asia.

15/04/2024

संकल्प ज्ञानशक्तीचा….आजच्या @ दैनिक सकाळ च्या संपूर्ण विदर्भ आवृत्ती (नागपूर) मध्ये चैत्र नवरात्रनिमित्य “संकल्प ज्ञानशक्तीचा” या विशेष थीम अंतर्गत *माननीय कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम* यांच्या यशस्वी वाटचालीवर विशेष स्टोरी प्रसिद्ध झाली आहे….अवश्य वाचा! दैनिक सकाळचे विशेष धन्यवाद!

14/04/2024

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ चे महर्षी कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे संविधानाचे रचियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी :-

दि.१४ एप्रिल १८९१ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झाला होता.समतेचा बंधुतेचा, मार्ग दाखवणारे मागदर्शक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली.

देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा बाबासाहेबांनी जोपासली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृशता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. शिका! संघटित व्हा !संघर्ष करा ! असा संदेश दिला.संयमीत व समरसतेचे प्रतिक असलेले, शिक्षण,संघटन व संघर्षाचा संदेश कृतीत उतरवनारे अभुतपूर्व झंझावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मानवंदना दिली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या महान कार्य सदाचार आणि जिवणातून अनेक संदेश दिले.

या प्रसंगी बल्लारपुर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले तसेच सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड ,समन्वयक वेदानंद अलमस्त आणि उपस्थित प्राध्यापक वृंद प्रा. खुशबु जोसेफ , प्रा. श्रृतिका राऊत प्रा.
आणि ग्रंथपाल स्नेहा लोहे , मनोज अर्गेलवार उपस्थित होते यांनी ‌डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मानवंदना दिली.

Photos from SNDT Women's University Mumbai India's post 13/03/2024
14/02/2024

-2020


SNDT Women's University Mumbai India

स्कूल कनेक्ट संपर्क अभियानातून ‘एनईपी’ ची जनजागृती

चंद्रपूर जिल्ह्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाचा पुढाकार

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सर्वदूर सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने “स्कूल कनेक्ट” (एनईपी कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यासाठी शासनाने राज्यातील विद्यापीठांना सुचित केले आहे. याच अनुषंगाने हे अभियान राबविण्यासाठी व विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईने पुढाकार घेतला आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात “स्कूल कनेक्ट” (NEP कनेक्ट) संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारा तर्फे या माध्यमातून एनईपी विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानाला जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे अभियान चंद्रपूर जिल्हयातील शहरी भागासोबतच अतिशय दुर्गम तालुक्यातील यामध्ये गडचांदूर, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपींपरी, बल्लारपूर आणि चंद्रपूर मधील ३५ कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आले आहे. ज्यामध्ये ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व शिक्षक आणि प्राध्यापक यांनाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिनामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या प्रशिक्षित चमूने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला,सादरीकरण केले. यातून खऱ्या अर्थाने एनईपी मधील अनेक घटकांविषयी चर्चा झाली. यावेळी एनईपी संदर्भातील अनेक शंकांचे निरसन करण्याचे कामही केले गेले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भाने हे नाविन्यपूर्ण स्कूल कनेक्ट संपर्क अभियान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनात पार पडले असून यात बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या नेतृत्वात, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त, प्रा. खुशबू जोसेफ, नेहा गिरडकर, अश्विनी वाणी, श्रुतिका राऊत आणि शीतल बिल्लोरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी स्नेहा लोहे, ममता भेंडे, आशिष नुगुरवार, वैशाली बोमकंटीवार यांनी परिश्रम घेतले.
————————————————-
स्कूल कनेक्ट अभियानाची वैशिष्ट्ये

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे. विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देणे. मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे. शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त दूरस्थ शिक्षणाच्या संधींविषयी माहिती देणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देणे. विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींविषयी माहिती देणे.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 03/02/2024

*एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे बल्लारपुर आवारात “घर तिथे रांगोळी" या अभियानाअंतर्गत "बेटी बचाओ बेटी पढाओ" या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन.*

बेटी बचाओ बेटी पढाओ ही राष्ट्रव्यापी चळवळ, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी मुलींच्या उत्थानासाठी सुरू केली आहे. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे बल्लारपुर आवारात 'बेटी बचाव बेटी पढाओ' या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत राबविण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थीनींनी उस्फुर्तपणे यात सहभाग घेतला कार्यक्रमाला परिक्षक म्हणून प्रा. विभावरी नखाते आणि प्राजक्ता पाटील यांनी परिक्षण केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालक डॉ. राजेश इंगोले तसेच समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कोमल आगलावे ; मीना राऊत यांनी प्रथम पारितोषिक तर पुनम शर्मा ; प्रतिक्षा कुंभारे यांना दुत्तिय पारितोषिक मिळावीले. उपस्थित प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले..

धन्यवाद!
SNDT Women's University Mumbai India

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 02/01/2024

कॉफी विथ सकाळ

SNDT Women's University Mumbai India
प्रत्येक मुलीला शिक्षणप्रवाहात आणणार.... मा. कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 26/12/2023

महिला आधीच सक्षम आहेत, फक्त त्यांना सक्षमतेची जाणीव करून देणे आवश्यक : कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव

ग्रामायण सेवा प्रदर्शनात रंगली महिलांची मैफिल

महिलांसाठी स्वयंस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

नागपूर, 24 डिसेंबर 2023: शहरासह ग्रामीण भागातील महिला सक्षम आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या सक्षमतेची जाणीव करून देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले.

ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने तसेच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 रामनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. आज याठिकाणी खास महिलांसाठी स्वयंस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला. प्रदर्शनात असलेल्या सर्व महिलावर्गांसाठी खुली लेखन स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी झालेल्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

स्पर्धा रंगत आल्यानंतर रचना साठे यांनी एकपात्री अभिनय करुन सर्व प्रेक्षकवर्गांना मंत्रमुग्ध केलं.
यामुळे उपस्थित सर्व महीलांमध्ये उत्साह निर्माण झाला.
स्पर्धेला प्रमुख पाहूणे व परीक्षक म्हणून स्वाती सुरांगळीकर,आदिती देशमुख,सना पंडित उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनंदा जकाददार,कांचन चुटके यांनी केले.

महिला सत्कार सोहळा
अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा ग्रामायान प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गुणगौरव ग्रामायन सेवा प्रदर्शनात करण्यात आले . सोहळ्याप्रसंगी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या सोहळ्याप्रसंगी अनुराधाताई सांबरे, माधुरीताई साकूळकर, , वर्षाताई तत्त्ववादी , वंदनाताई मुजुमदार ,अनुसयाताई काळे, नूतनताई कांबळे या पाच हिरकण्यांचा कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कुलकर्णी, स्मिता होटे, प्रज्ञाताई बागलकोटे यांनी केले.
SNDT Women's University Mumbai India

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 16/12/2023
Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 15/12/2023

SNDT Women's University Mumbai India Pranjal Bogawar Rajesh Ingole Neha G. Giradkar

भविष्यात "डेटा स्ट्रक्चर" सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या अनेक पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. - डॉ. प्रांजल बोगावार

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे "डेटा स्ट्रक्चर" या विषयावर व्याख्यान संपन्न.

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी बीसीए च्या विद्यार्थिनी करिता "डेटा स्ट्रक्चर" या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आकार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट फॉर वुमन, नागपूर च्या प्रभारी प्राचार्य तसेच एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई च्या मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर डॉ. प्रांजल बोगावार विशेषत्वाने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले तसेच प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रांजल बोगावार यांनी डेटा स्ट्रक्चर यावर आपले मत मांडले, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम हे कॉम्प्युटर सायन्सचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. डेटा स्ट्रक्चर्स आम्हाला डेटा व्यवस्थित आणि संग्रहित करण्याची परवानगी देतात, तर अल्गोरिदम आम्हाला त्या डेटावर अर्थपूर्ण पद्धतीने प्रक्रिया करण्याची परवानगी देतात. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम शिकणे तुम्हाला एक चांगला प्रोग्रामर बनण्यास मदत करेल. तुम्ही कोड लिहिण्यास सक्षम असाल जो अधिक कार्यक्षम आणि अधिक विश्वासार्ह आहे. आपण समस्या अधिक जलद आणि अधिक प्रभावीपणे सोडविण्यास सक्षम असाल.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले, डेटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे प्रक्रिया गती, डेटा शोधणे, एकाधिक विनंत्या हाताळणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. डेटा रचना कार्यक्षमतेने डेटा व्यवस्थापित, व्यवस्थापित आणि संचयित करण्याचा एक मार्ग प्रदान करते. डेटा स्ट्रक्चरच्या मदतीने, डेटा आयटम सहजपणे पार केले जाऊ शकतात. तसेच भविष्यात पुन्हा असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शीतल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी केले.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 07/12/2023

SNDT Women's University Mumbai India
Santosh Prakash Shinde
"संगणक कौशल्य” ही काळाची गरज- प्रा. संतोष शिंदे
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे "सी- प्रोग्रामिंग" या विषयावर व्याख्यान संपन्न.

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे ६ डिसेंबर रोजी बीसीए च्या विद्यार्थ्यांकरिता "सी- प्रोग्रामिंग" या विषयावर सेमिनार आयोजित आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवरचे संचालक डॉ. राजेश इंगोले तसेच प्रमुख वक्ता म्हणून स्वर्गवासीय डॉक्टर सचिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर येथील प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक संतोष प्रकाश शिंदे, समन्वयक वेदानंद अलमस्त आणि संगणक विभागाचे प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका नेहा गंगाधर गिरडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले, सोबतच विद्यार्थिनिना संगणक कौशल्य याबाबत महत्व पटवून दिले. प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले प्राध्यापक संतोष शिंदे यांनी संगणक कौशल्यासोबतच सी –प्रोग्रामिंग याबाबत विद्यार्थिनिना मार्गदर्शन केले. यात प्रमुखाने सी –प्रोग्रामिंग ची गरज आणि आधुनिक काळात होणारे बदल यावर यावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले तसेच भविष्यात संगणक कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले आणि भविष्यात असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्राध्यापिका शितल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गंगाधर गिरडकर यांनी केले.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 06/12/2023

SNDT Women's University Mumbai India

SNDT Women's University येथे संविधानाचे रचियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना:

दि.६ डिसेंबर २०२३ समतेचा बंधुतेचा, मार्ग दाखवणारे मागदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी SNDTWU मुंबई, च्या महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपुर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली.

देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी जोपासली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृशता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. शिका! संघटित व्हा !संघर्ष करा !असा संदेश देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ दिसंबर १९५६ दिल्ली येथील त्यांच्या निवास स्थानी झाले. डॉ. आंबेडकर आपल्या महान कार्य सदाचार आणि जिवणातून निर्वान प्राप्त केले होते आणि म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून मानली जाते.

या प्रसंगी SNDTWU बल्लारपुर आवरचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले तसेच समन्वयक वेदानंद अलमस्त आणि उपस्थित प्राध्यापक वृंद प्रा. नेहा गिरडकर प्रा. खुशबु जोसेफ ,प्रा. अश्विनी वाणी, प्रा. शित‌ल बिल्लोरे, प्रा. श्रृतिका राऊत आणि ममता भेंडे, वैशाली बोमकंटीवार, स्नेहा लोहे ,आशिष नुगुरूवार उपस्थित यांनी ‌भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 01/12/2023

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे बल्लारपुर आवारात NSS unit द्वारे संविधान प्रास्ताविकाचे वाचन..

दि. २६ नोव्हेंबर २०२३ ला एस. एन. डी. टी महिला विद्यापीठ येथे महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे संविधान दिनानिमीत्य राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे संविधान प्रास्तविकाची प्रतिज्ञा घेण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना यातील स्वंयसेविकांनी यात सहभाग घेतला. नागरिकांमध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,चे बल्लारपूर आवार येथे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला गेला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. खुशबु जोसेफ व सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रृतिका राऊत यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन‌ केले, तसेच या प्रतिज्ञेला संचालक डॉ. राजेश इंगोले, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड समन्वयक वेदानंद अलमस्त, प्रा. अश्विनी वाणी, प्रा. नेहा गिरडकर, प्रा. सलोनी परिमल, प्रा. शित‌ल बिल्लोरे भाणि ममता भेंडे, वैशाली बोमकंटीवार, स्नेहा लोहे ,आशिष नुगुरूवार उपस्थित होते

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 01/12/2023

क्रीडा व युवक कल्याण संचालनालय, महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींचा उस्फुर्त सहभाग

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा युवा महोत्सव दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी बल्लारपूर येथील नाट्य गृहात पार पडले....यावेळी जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

यावेळी बल्लारपूर येथे नव्याने सुरू झालेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींचा बल्लारपूर येथील नाट्यगृहात आयोजित "जिल्हा युवा महोत्सवातील समूह नृत्य, एकल नृत्य, पोस्टर स्पर्धा, गायन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कलेचे सादरीकरण केले.

सर्व विद्यार्थिनींचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 02/11/2023

SSNDT Women's University Mumbai India
"एआय फ्युचर स्किल्स" मुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील - डॉ. गजेंद्र आसुटकर

एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे "आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)" या विषयावर व्याख्यान संपन्न.
----------------------------------------

"आर्टिफिशियल इंटेलिजन्स" हे भविष्यातील प्रत्येकाचे स्किल्स राहणार आहे आणि हे स्किल्स भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. एआय हे तंत्रज्ञान जग काबीज करेल सोबतच तरुणांना आकर्षित करेल असे मत डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी व्यक्त केले. ते
एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आयोजित "आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर येथे फ्युचर स्किल्स - आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानाला मुख्य वक्ता म्हणून डॉ. गजेंद्र आसुटकर, उपप्राचार्य, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानसंकुलचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख उपस्थिती सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले सोबतच आधुनिक काळात मानव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त कामगिरीने भारत जगात आपले नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून लाभलेले डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी एआय बद्दल सर्व विद्यार्थिनींना अवगत केले सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे आहे असे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले. भविष्यात असे नव-नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अश्विनी वाणी, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. श्रुतिका राऊत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 01/11/2023

SNDT Women's University Mumbai India
एस एन. डी. टी महिला विद्यापिठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकूल बल्लारपूर येथे मधुमक्षिका पालन' प्रशिक्षणचे प्रमाणपत्र वितरण सोहळा:-

एस. एन. डी. टी. महिला विद्यापिठ हे नेहमीच शिक्षणा सोबतच सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा दुष्टीने कार्य करत असते. अशाच एका सामाजिक कर्तव्याची जाण राखत एस. एन. डी. टी महिला विद्यापिठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकूल, बल्लारपूर, चंद्रपूर येथे दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२३ ते ०५ ऑक्टोंबर 2023 मधुमक्षिका पालन प्रशिक्षण घेण्यात आले. खादी आणि ग्रामीण उद्योग आयोग, नागपूर विभाग आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापिठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकूल, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच चंद्रपूर जिह्यातील जूनोना या गावात सुध्दा हे प्रशिक्षण पार पडल्याने या कार्यक्राअंतर्गत एस. एन. डी. टी. चे प्रशिक्षणार्थी आणि जूनोना या गावातील प्रशिक्षणार्थी यांना एकत्रित करून प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून एस. एन. डी. टी . महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाचे, विभागीय संचालक श्री. राघवेंद्र महेंद्रकर उपस्थित होते. विभागीय समन्वयक श्री. विजय ठाकरे, मास्टर ट्रेनर श्री. प्रशांत सावंत, आणि बल्लारपूर आवराचे समन्वयक वेदांनद अलमस्त उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रशांत सावंत यांनी केले तसेच ते तीन दिवस प्रशिक्षनाचे प्रशिक्षक म्हणून विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिले आहे. प्रास्ताविकात त्यांनी आपल्याला अजून आगामी काळात काय उपक्रम राबविता येतील याबद्दल थोडक्यात माहिती दिली.

विभागीय संचालक श्री. राघवेंद्र महेंद्रकर सरांनी चित्रफीत च्या आधारे निर्माण सेवा आणि सेवा क्षेत्र यामध्ये किती कर्जाची मर्यादा आहे आणि विविध उदयोगासाठी जसे कुंभारकाम, मधुमक्षीका यासाठी शासनाच्या विविध योजना सांगितल्या. प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराच्या नवीन संधीविषयी सुद्धा माहिती देण्यात आली. सोबतच व्यवसायात खूप मोठी संधी उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायात सुध्दा आपले नशीब आजमवण्यासाठी तयार राहावे असे आव्हान सुध्दा केले.

अध्यक्ष म्हणून लाभलेले एस. एन. डी. टी . महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी मधुमक्षिका पालन या व्यवसायातून महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन मेहनत करणे गरजेचे आहे तसेच भविष्यात अशे उपक्रम पुन्हा पुन्हा घेत राहू असे मत व्यक्त केले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणातून बरेच शिकायला मिळाले असे मनोगत काही प्रशिक्षणार्थीनी सांगितले.
सरतेशेवटी सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रा.नेहा गिरडकर यांनी केले.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 27/10/2023

SNDT Women's University Mumbai India
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवार येथे 'कचरा व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान आयोजित ..

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून
महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल चे संचालक डॉ. राजेश इंगोले, विषयावर बोलणारे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बी. डी. पालीवाल आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना समन्वयक मा. वेदानंद अलमस्त यांनी केली तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना पटवून सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बी.डी. पालीवाल यांनी विविध क्षेत्रातील कच-यापासून काय उपयोगी साहित्य निर्माण करता येईल यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर कचऱ्या पासून टाईल्स, कवेलू, बाक, खुर्ची कसे बनेल हे सांगितले आणि नारळाच्या बुच्च्यापासून शिट आणि केसापासून शिट तयार कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी इलेक्ट्रानिक कचरा, प्लास्टिक कचरा, काचेचा कचरा, हॉस्पिटल मधील कचरा यांचे व्यवस्थापन कसे करता येईल या विषयावर आपले मत नोंदविले.

कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण ज्ञानसंकुल चे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी केले सोबतच कचऱ्यापासून होणाऱ्या विविध रोगांबाबत सर्वांना माहिती दिली तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्याचे सुध्दा आव्हान दिले.

कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनीनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अश्विनी वाणी यांनी केले.

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 21/10/2023

SNDT महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपूर आवारात सांस्कृतिक विभागातर्फे गरबा महोत्सव साजरा..

SNDT महिला विद्यापीठ मुंबई, चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर, जि. चंदरपूर येथे प्रवेशित विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या कला गुणांचा विकास व्हावा यादृष्टीने ज्ञानसंकुलात नवंनवीन उपक्रम राबविण्यात येते याचाच एक भाग म्हणून मा. कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल येते नवरात्र निमित्ताने गरबा-दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. संचालक डॉ. राजेश इंगोले आणि परिक्षक म्हणून श्री. भरत भुतडा व सौ. निशा भुतड़ा तसेच या आवराचे समन्वयक श्री. वेदानंद किशोर अलमस्त उपस्थित होते.

या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनीनी उत्स्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य कलेचे प्रदर्शन केले.

पर्वप्रथम स्पर्धेत सर्व विद्यार्थिनींना ३ गटात विभागणी केली गेली आणि गट प्रमुख म्हणून प्रत्येकी गटाला एक प्रमुख नेमून देण्यात आले. यामध्ये दिया पटेल, हरशिल पटेल आणि भक्ती पटेल ह्या विद्यार्थीनींनी गट प्रमुख म्हणून भूमिका पार पाडली.

सहभागी झालेल्या गटामधून दिया पटेल गट विजेता ठरला आणि मान्यवरांनी पारितोषीक आणि सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांचे सत्कार करण्यात आले.

उपरोक्त कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी उपस्थित प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया साहू तर आभार कु. आयुषी खरतड यांनी केले.

18/10/2023

'ble Vice Chancellor Dr. Ujwala Chakradeo Madam Visited At SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 10/10/2023

Visit and Interaction of Hon'ble Vice Chancellor Dr. Ujwala Chakradeo at Ballarpur Campus
( Date- 08.10.2023 )
Hon'ble Vice Chancellor Dr. Ujwala Chandradeo visited the newly opened campus in Ballarpur, Dist. Chandrapur. Campus Director Dr. Rajesh Ingole welcomed her.
The identity of Chandrapur, represented by a jungle and tiger Rangoli, was beautifully portrayed by some students to welcome Madam.
Hon'ble VC visited the campus to interact with students, lecturers, and other officials. The session began with a tribute to Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve and a welcome to the dignitories on the dais. Honble VC Dr. Chandradeo, Director Dr. Rajesh Ingole, Dr. Balu D. Rathod, and Mr. Vedanand K. Almast were present on the dais. Dr. Ingole gave the introductory remarks. Some students shared their experiences of classes and campus. Madam delivered the presidential address, sharing her wonderful experiences and eagerly mentioning important points under the National Education Policy (NEP) 2020.
Ms Poonam Yadav, a BCA student, presented a beautiful portrait of Hon'ble VC Madam.
The session was anchored by Assistant Ms. Neha Giradkar, and the vote of thanks was given by Assistant Ms. Khushboo Joseph.
The visit concluded with a meeting with staff members. Madam provided significant suggestions for the future improvement of the campus.


Rajesh Ingole Ashish Nugurwar Sai Argelwar Neha G. Giradkar Ashwini Chetan Karekar-Wani Mamta Talmale Bhende Shrutika Raut Sharda Parimal

Photos from SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus 's post 09/10/2023

's_University_Ballarpur_Campus
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल ( विद्यापीठ कॅम्पस ) बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे सुरू झाले आहे....या भागातील मुली - महिलांना शिक्षणाची सुवर्णसंधी यामुळे प्राप्त झाली आहे...या कॅम्पस मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सोबतच याचे परिसर अत्यंत देखणे व निसर्गरम्य आहे...

बल्लारपूर आवारातील विविध सोयी सुविधा....

अवश्य भेट द्या..!
गोरक्षण वॉर्ड, एफ.डी.सी.एम. कार्यालय जवळ, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर....
cont.:- 07172299654/ 9595587156

Prof-Vedant Almast Balu Rathod Ashish Nugurwar Mamta Talmale Bhende Neha G. Giradkar Vivek Patil SNDT Women's University Mumbai India Ashwini Chetan Karekar-Wani Shrutika Raut Sharda Parimal Sai Argelwar Rajesh Ingole

07/10/2023

Prof-Vedant Almast Balu Rathod Neha G. Giradkar SNDT Women's University Mumbai India Shrutika Raut Mamta Talmale Bhende

07/10/2023

Ashish Nugurwar Balu Rathod Prof-Vedant Almast Shrutika Raut Neha G. Giradkar Mamta Talmale Bhende

07/10/2023

Ashish Nugurwar Balu Rathod Mamta Talmale Bhende Sharda Parimal SNDT Women's University Mumbai India Prof-Vedant Almast Shrutika Raut Vivek Patil Neha G. Giradkar

06/10/2023

SNDT Women’s University is the first Women’s university in India as well as in South-East Asia. The University was founded by Maharshi Dr. Dhondo Keshav Karve in 1916 for a noble cause of Women’s Education. The first five women graduated in 1921 from this University. The University Headquarters is in Churchgate Campus, Mumbai and the other three campuses of this University are at Juhu, Mumbai and Karve Road, Pune and Ballarpur.

Want your school to be the top-listed School/college in Chandrapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#NEP-2020#SNDT#WomenEmpowermentsSNDT Women's University Mumbai Indiaस्कूल कनेक्ट संपर्क अभियानातून ‘एनईपी’ ची जनजागृतीचं...

Telephone

Address


महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर , गोरक्षण वार्ड, बल्लारपूर, जिल्हा. चंद्रपूर
Chandrapur
442701

Opening Hours

Monday 9:45am - 5:30pm
Tuesday 9:45am - 5:30pm
Wednesday 9:45am - 5:30pm
Thursday 9:45am - 5:30pm
Friday 9:45am - 5:30pm