चवदार स्वादिष्ट utkarsha recipes

शाकाहारी आणि मांसाहारी विविध प्रकार?

30/12/2021

पालक कॉर्न

पालक पनीर आपण नेहमीच खातो. काहीसं त्याच पद्धतीने आज आपण पालक कॉर्न बनवू या.

साहित्य- 1 कप उकडलेले कॉर्न, 2 जुडी पालक , 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 -5 पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, 4 मिरच्या तिखटवाल्या, अर्धा चमचा जिर, 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा भाजलेले बेसन, अर्धा चमचा मिरची पावडर , 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा किचन किंग मसाला ,पाव चमचा पेक्षा कमी आमचूर , मीठ चवी नुसार , तेल

कृती - दोन कप पाणी उकळून त्यात थोडी साखर घालून पालक व हिरवी मिरची 5 मिनिटे वाफवून घ्यावा. blanch करून. मग थंड पाण्यात पालक काढावा. वरून बर्फ क्यूब ही टाकाव्यात. त्यानंतर पाणी बाजूला काढून पालक व मिरचीची मिक्सर मध्ये पेस्ट करावी. कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे व लसूण फोडणीत टाकावा. लसणाचा कच्चा वास जाई पर्यत परतून घ्यावा मग कांदा टाकून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतावा. कांदा थोडा परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकून छान परतून घेणे. मग त्यात मिरची पावडर, धणेपूड आणि गरम मसाला टाकून मिश्रण एकजीव करून भाजलेले बेसन टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. पालक प्युरी टाकून 5 मिनिटे उकळी काढावी आवश्यक नुसार पाणी टाकावे. मग कॉर्न व मीठ टाकून 2 मिनीट उकळून घ्यावे. मग किचनकिंग मसाला व पाव चमचा पेक्षा कमी आमचूर पावडर टाकून मिश्रण ढवळून घ्यावे. अर्धा मिनिटे उकळून भाजी सर्व्ह करावी. सर्व्ह करताना चीज किसून टाकता येते. तसेच तूप गरम करून बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी दिल्यास चव आणखीन वाढेल.

26/09/2021

सुकी करंदीचा (सुकट) भात

साहित्य - 1 वाटी सुकी करंदी, 1 कांदा उभा चिरून, 1 टोमॅटोची प्युरी, 1 चमचा आगरी कोळी मसाला नसल्यास दीड चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला वापरावा, हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा धने पूड, अर्धा काश्मिरी मिरची पावडर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट एक चमचा, 1 चक्री फुल, 1 इच दालचिनी तुकडा, चार लवंग , 5 ते 6 काळीमिरी, दोन तमालपत्र, मीठ, लिंबाचा रस, दोन मोठे चमचे तेल, 1 वाटी बासमती तांदूळ (15 ते 20 मिनिटे स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवावा)
कृती- सर्वप्रथम सुकी करंदी कोमट पाण्यात 15 मिनिटं भिजत ठेवावी त्यानंतर दोनदा स्वच्छ धुवून घ्यावी. बाजूला ठेवावी. एका कुकर मध्ये तेल टाकून गरम झाल्यावर त्यात खडा मसाला नंतर कांदा टाकून सोनेरी होईपर्यत परतावा, त्यात आलं, लसूण, मिरची कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा घालावी नीट परतून घ्यावे मग त्यात टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतावे, हळद, मिरची पावडर, धने पावडर , आगरी कोळी मसाला टाकून मसाला परतून घ्यावा त्यात सुकी करंदी टाकून चांगले एकजीव करावे.मग त्यात दीड वाटी गरम पाणी टाकावे नंतर भिजवलेला भात टाकून उकळी आणावी मग मीठ , लिंबाचा रस आणि पाव चमचा गरम मसाला टाकून मिश्रण ढवळावे आणि कुकर तीन किंवा दोन शिट्या घ्यावा. कुकर थंड झाला की भात गरमागरम वाढवा वरती कोथिंबीर पेरावी.

25/07/2021

चिकन तंगडी ग्रील

1 कप बांधलेले दही , 6 चिकन ड्रम स्टिक, सुकी लाल मिरची आलं लसुण वाटलेली पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिर पावडर, 1 चमचा धने पूड, 1 मोठा चमचा चिकन तंदुरी मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर, 2 चमचे भाजलेले बेसन, चवीनुसार मीठ, दोन चमचे तेल , अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा लिंबाचा रस
पेस्ट- गरम पाण्यात 5ते 6 काश्मिरी आणि बेडगी मिरची 10 ते 15 भिजत ठेवा, बी काढून घेतल्यातर उत्तम, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या मिरच्या 5-6 लसूण पाकळ्या , अर्धा इंच आलं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावि..
Marination - एका भांड्यात बांधलेले दही, त्यात वाटलेली मिरचीची पेस्ट , मिरची पावडर , तंदुरी मसाला, गरम मसाला, धने जिर पूड, कसुरी मेथी, अर्धे लिंबू मीठ आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. या मिश्रणात चिकन टाकून मसाला सर्व बाजूनं छान लावून घेणे.. फ्रीज मध्ये मॅरीनेट केलेले चिकन 1 तास किंवा त्याहूनही जास्त वेळ ठेवणे..
फ्रीज मधून चिकन काढून नॉर्मल टेम्परेचर आलं की त्यात भाजलेले बेसन टाकून मिश्रण एकत्र करून घ्यावे आणि ग्रील पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून चिकन फ्राय करायला ठेवणे..चिकन सर्व बाजूने शिजायला साधारण 20 ते 25 मिनिटे लागतात. नंतर हे चिकन गॅसवर जाळी ठेवून थोडे रोस्ट करून घेणे स्मोकि फ्लेवर येतोय.

15/07/2021

कटाची आमटी..थोडी वेगळी पद्धत

साहित्य: अर्धा वाटी किसलेले सुख खोबर, 1कांदा उभा चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या, 2 बेडगी मिरची, 1 चमचा धने, अर्धा इंच आलं, 5 लसूण पाकळ्या , 1 चमचा मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला , दोन तमाल पत्र, 4 कोकम, तेल आणि मीठ चवीनुसार,
कृती- कढईत किसलेले खोबर खरपूस भाजून घ्यावे, नंतर त्याच कढईत उभा चिरलेला कांदा भाजून घ्यावा ब्राउन रंग आल्यावर थोड तेल टाकून परतावे त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं टाकून 2 मिनिटे परतून घ्यावे. कांदाचे मिश्रण बाजूला ठेवावे, त्याच कढईत धने आणि सुकी मिरची खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यावे. सर्व मिश्रण थंड झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक वाटून घेणे.
जाड बुडाच्या कढईत मोठे दोन चमचे तेल गरम करून त्यात दोन तमालपत्र फोडणी द्यावी , पाव चमचा हिंग मग त्यात वाटलेले कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून ते तेल सुटेपर्यंत परतून घेणे, त्यात मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून परतणे, त्यात पुरणाचा पाणी टाकून उकळी घेणे मग त्यात 4 कोकम आणि चवीनुसार मीठ टाकून 5 7 मिनिटं आमटी उकळून घेणे. गरमागरम आमटी पुरणपोळी सोबत खाणे..
(तिखट प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात.)

Photos from चवदार स्वादिष्ट utkarsha recipes's post 12/07/2021

पंचरत्न डाळ..
साहित्य..चना डाळ, मसूर डाळ, सालाची उडीत डाळ, मूग डाळ, तूर डाळ प्रत्येकी पाव वाटी, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा आलं लसूण पेस्ट, तीन लवंग, एक मोठी वेलची, 1 चमचा जिर, दोन सुक्या मिरच्या, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, दोन टोमॅटो बारीक चिरून किंवा वाटून आवडीप्रमाणे, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पूड, 1 चमचा जिर पूड, 1 चमचा तिखट आवडीप्रमाणे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, तूप , चवीनुसार मीठ.
कृती- पाच ही डाळी पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणे. त्यानंतर डाळी कुकरला हळद, मीठ, 2 तमाल पत्र आणि एक चमचा तूप , थोडं मीठ आणि दुप्पट पाणी टाकून 5 शिट्या काढून घेणे.
कढईत 2 चमचे तूप गरम करून लवंग, मोठी वेलची, एक तमालपत्र आणि जिर, सुकी लाल मिरची टाकून परतून घेणे मग त्यात कांदा आणि आलं लसूण, हिरवी मिरची टाकून कांदा ब्राउन रंगाचा होईपर्यंत परतून घेणे. मग त्यात बारीक चिरलेली टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ एकजीव होइपर्यंत परतून घेणे. त्यात धने पूड, जिर पूड, मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घेणे. उकळी आल्यावर गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून 10 मिनिटे झाकण लावून वाफ काढून घ्यावी. वरून कोथिंबीर घालावी. तडका पॅन मध्ये एक चमचा तूप गरम करून त्यात जिर फोडणी द्यावी, मग लाल तिखट एक सुकी लाल मिरची टाकून हा तडका तयार डाळीवर टाकावा..
या डाळी सोबत चपाती, तंदुरी रोटी, साधा भात, जिरा राईस छान लागतो.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


400003
Mumbai
400003

Other Public Figures in Mumbai (show all)
pravin vyas pravin vyas
5 Vireshwar Dhara, Near Vileparele Station, Vileparle West
Mumbai, 400067

Circus Workus Circus Workus
Mumbai

Anil Kant Anil Kant
Mumbai

Welcome to official Anil Kant page. www.anilkant.org www.instagram.com/anilkant

John Gloster John Gloster
Mumbai

Anand Majumdar Anand Majumdar
Juhu
Mumbai, 400049

The Salsa Guru

Tukaram Omble Tukaram Omble
Mumbai

Ashoka Chakra awardee, Asst Sub Inspector of Police who laid his life and nabbed the only alive terr

Arsh JaiKrishan Arsh JaiKrishan
Santa Cruz (West)
Mumbai, 400054

Actor, Model, TV anchor, Photographer & DSLR Filmmaker, Scribbler too.. ( for friends say i write well)

S Ramadorai S Ramadorai
Mumbai

S. Ramadorai is the Former MD & CEO of Tata Consultancy Services and Former Chairman of National Ski

Tarun Mansukhani Tarun Mansukhani
14th Road, Khar (W)
Mumbai, 400052

Harleen Sabharwal - Trend Forecaster Harleen Sabharwal - Trend Forecaster
Mumbai

'FASHION IS 99% RESEARCH & 1% INSPIRATION' - Research is to see what everybody else has seen and to

Aditya Singh Rajput Splitsvilla 9 Aditya Singh Rajput Splitsvilla 9
Mumbai

Official page of Aditya Singh Rajput - Splitsvilla 9

Dimple Patel Dimple Patel
Mumbai

Participating and winning the Femina Miss India contest has been a childhood dream. I am here to give this my best and my all.