Pravin Takey

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pravin Takey, Writer, nagpur, Nagpur.

19/12/2021

देशीन का...? बघा वऱ्हाडीतील पहिली वेब सिरीज

महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्यपर्यंत योग्य तंत्रज्ञान पोहोचलं की, ही माणसं सोन्यासारखी चमकायला लागतात. आपल्या अवतीभवती अनेक गुणवंत असतात, अशा गुणवानांना संधीची आणि प्रोत्साहनाची गरज असते. त्यातून जे उतरते ते असली सोनं असते.
अशीच सोन्यासारखी एक कलाकृती आपल्यापुढे आणायची आहे. मित्रांनो,ही सारी प्रस्तावना आहे. यवतमाळच्या मातीत बनलेल्या 'देशीन का ' या वेब सिरीजची. ज्यांचे वऱ्हाडी भाषेवर प्रेम आहे, ज्यांना वऱ्हाडचा गावगाडा, गावातला बेरकीपणा आणि गमतीजमती, जगण्याचा आनंद देतात. ज्यांना आपल्या मातीचा, रितीचा, भाषेचा अभिमान आहे, अशा सर्वानी ही वेबसिरीज एकदा नक्कीच बघावी.
दिग्दर्शन म्हणजे नेमके काय ? चित्रपटाची पटकथा म्हणजे नेमके काय ? नाटक - सिनेमा यातील अभिनयातला फरक काय ? पार्श्वसंगीत काय ? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे माहिती नसलेल्या नवख्या कलाकारांची जमलेली भट्टी म्हणजे देशीन का वेबसिरीज. प्रयोगातून सगळ्या गोष्टी शिकाव्यात, त्यातून चमत्कार घडावा म्हणजे 'देशीन का वेब- सिरीज '. घरचे डब्बे घेऊन शुटींग, सुटया बघून चित्रीकरण,वाहन मदत म्हणून मिळवणे, बंगले विना किरायाने मागणे, तीन महिन्यात चित्रीकरण पूर्ण करणे,अशी ही अडथळ्याची शर्यत पडदयावर 'कम शक्कर कडक मिठी ' कलाकृती झाली आहे.
खरं तर ही यथकथा आहे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील छोट्याशा धनज माणिकवाडा या गावातील नव्या दमाच्या सलीम - जावेदची!या गावातील दोन मित्रांच्या अथक परिश्रमाची. धनज-माणिकवाडा हे गाव म्हणजे श्री. संत फकिरजी महाराजांचे गाव, विदर्भाचे ख्यातनाम कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे गाव.या गावाने कला, क्रीडा, समाजकारण,शिक्षण, प्रशासन, संशोधन, वैद्यकीय क्षेत्रात नामवंत -गुणवंत दिले आहेत. एक एका क्षेत्रातील बिन्नीचे कलावंत देण्याची गावची परंपरा. फक्त एक रुपेरी पडदा बाकी होता.आता या गावच्या दोन तरण्याबांड मुलांनी रूपेरी पडदयाच्या जगाला वेड लावणे सुरू केले आहे. प्रवीण तिखे आणि रूपेश कावलकर असे या दोन कलाकारांचे नाव आहे. प्रवीण तिखे हे झी टीव्हीवरील लोकप्रिय 'चला हवा येऊ द्या ' मालिकेत छोट्या भूमिका आणि लेखनाचे काम करतात. तर रुपेश कावलकर हे ख्यातनाम गझलकार, उत्कृष्ट निवेदक आणि गझलमित्र या लोकप्रिय युट्युब चॅनलचे निर्माते आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलला एक लाखाच्यावर सबस्क्रायबर आहे. रूपेश कावलकर या शब्दांशी खेळणाऱ्या, हळव्या कवीने अतिशय संवेदनशीलपणे या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. वऱ्हाडी बाज, वऱ्हाडी थाट, नात्यातला गोडवा, भाषेतील गोडी, मैत्री,यारी, नाती आणि जीवनातील अपूर्णतेला संवादाची खमंग फोडणी देत या वेब सिरीजला उत्कंठावर्धक बनविले आहे. रुपेशच्या दिग्दर्शनातील ही पहिलीच कलाकृती आहे. मात्र हा गझलकार लंबी रेस का घोडा आहे. हे या कलाकृतीतून दिसून येते.दोघेही शिक्षक म्हणून काम करतात. त्यापैकी रूपेश कावलकर हे घाटंजी येथे शिक्षक आहेत. तर प्रवीण तिखे एका नॉन ग्रँडेड शाळेवर गावाजवळ शिक्षक म्हणून काम करतात.
मित्रांनो, या दोघांनी केवळ साठ हजार( ६० हजार ) रुपयांमध्ये एक वेब सिरीज पूर्ण केली आहे. सगळे कलाकार स्थानिक, जवळपास सर्वच यवतमाळ जिल्ह्यातल्या छोट्या-मोठ्या गावातील. काही यवतमाळचे, काही घाटंजीचे, तर काही नेर तालुक्यातील धनज माणिकवाडयाचे. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारे आणि छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायात असणारे सर्व कलाकार. अनेक महिला हौशी कलाकार म्हणून काम करणाऱ्या. यापूर्वी कोणीही रुपेरी पडद्यावर काम केलेले नाही. छायांकन, चित्रीकरण, गीत, संगीत सर्व स्थानिक कलाकारांचेच. परवा या वेब सिरीजच्या प्रिमियरसाठी जाण्याचा योग आला. एका जगावेगळ्या प्रीमियर शो साठी मी पहिल्यांदाच आलो होतो. या सर्व निर्मितीमध्ये कुठल्या न कुठल्या रुपाने सहभागी झालेले तीस ते चाळीस जणांची टीम. फक्त मी आणि माझे जुने लोकमतचे सहकारी संतोष अडसोड असे आम्ही दोनच कलाकृती बाहेरचे पाहुणे. मुंबईमध्ये अनेक प्रिमियर शो ला जाण्याचा योग आला. तिथली श्रीमंती, झगमगाट, खाणपान,माध्यमांचा वावर, प्रत्येकाचा तोरा सगळाचा कसा दणदणाट. मात्र घरच्या लोकांचा, घरच्या भाकरी वरच्या सिनेमाचा हा प्रिमियर पाहिल्यांदाच पाहत होतो. प्रत्येक कलाकाराचा त्यासाठीचा ध्यास, घेतलेली मेहनत आणि त्यातून उगवलेलं सोनं श्रमाच्या सुगंधानं भारलेलं होतं.
' देशीन का ' या बेवसिरीजची दोन गाणी अप्रतिम आहे. 'तुह्या कानातले डुल देते प्रेमाची चाहुल, आणि देशीन का तुहया नंबर देशीन का..? सध्या युट्युब वर धूम घालत आहे. ही गाणी ऐकली तर निश्चितच सिरीज काय तडका असेल याची कल्पना येते.
या सिनेमाची कथा प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक पुनीत मातकर यांनी लिहिली आहे. संवाद प्रविण तिखे, गीत रूपेश कावलकर, संगीत संतोष मानकर यांचे आहे. या मधील दोन्ही गाणे हिट झाली असून संदीप बिचेवार व गौरव चाटी यांनी आपल्या दमदार आवाजात या गाण्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. संगीत संयोजन वैभव दुरतकर ,प्रतीक ढोके, श्रेयस ढोके यांनी सांभाळले आहे. छाया अमीत डंभारे, अक्षय डंभारे यांचे तर संकलन नासिर शेख यांचे आहे. नासिरच्या प्रचंड मेहनतीतून छायाचित्रण झाले असून उपलब्ध तंत्रज्ञानाचा महत्तम उपयोग केला आहे. ध्वनी व्यवस्था निलेश जाधवची आहे.सोनार दाम्पत्याच या कलाकृतीच्या निर्मितीत दातृत्वाची भूमिका आहे.
या वेबसीरीज मध्ये अपूर्वा सोनार, अविनाश मानेकर, लखन सोनुले,शिवानी धुमाळ -नोमुलवार, ऋषिकेश व्यास, सतीश पवार, चारुलता पावशेकर, जनार्दन राठोड,प्रेम चक्रे, रोशन जोल्हे, साहिल दरणे, जुगल गुंडकवार, गजानन जुडेकर, प्रतिभा पवार या कलाकारांनी अप्रतिम भूमिका अदा केल्या आहेत. या वेब सिरीज मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लखन, छबु,रसिका,तेजस, बाल्या, या पात्रांनी अतिशय धूम केली आहे.
मित्रांनो !हा लेख प्रपंच यासाठी की, या कलाकृतीचे जोरदार स्वागत झाले पाहिजे. तंत्रज्ञान आता गावांपर्यंत पोहोचत आहे. गावातली मुलं काही नवे प्रयोग करत आहे. ते दर्जेदार आणि दमदार सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं. केवळ तंत्रज्ञान माहिती आहे म्हणून श्रेष्ठत्व ही मक्तेदारी आता बंद व्हायला हवी. आमची भाषा, आमची संस्कृती, आमच्या कथा, आमच्या व्यथा, आमच्याच माणसांच्या मार्फत मांडल्या गेल्या पाहिजे. वेब सिरीज सारख्या नव्या माध्यमातून ही मुले नव्या माध्यमांवर आरूढ होत आहे. माल कलदार आहे. मुलंही दमदार आहेत. तेव्हा यांच्या पाठीशी उभे राहू या.. ! सध्या दोन भाग युट्युबवर रिलीज झाले आहेत. छान प्रतिसाद आहे.देशीन का वेबसिरीजला डोक्यावर घ्यायलाच हवे.आपल्याशिवाय कोण घेणार. एकदा नक्कीच बघा ! गझलमित्र प्रोडक्शन युट्युबवर देशीन का !

20/11/2021

नमस्कार मित्रांनो
महाराष्ट्र टाईम्समध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या माझ्या फीलगुड या सदरातील आजचे हे शेवटचे पुष्प. 20 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेले हे सदर खास आपल्या अभिप्रायार्थ

चलो इक बार फिर से...

सुनील गावसकर, सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी या सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये यशाच्या शिखरावर असताना थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयानं संपूर्ण देश हळहळला. एक सांगू का, आयुष्यात प्रगती जेवढी महत्त्वाची आहे, तेवढेच कुठे थांबायचे... कुठून परतायचे... कुठे ‘यू टर्न’ घ्यायचा हे कळणंही फार महत्त्वाचं आहे. व्यवहार, व्यवसाय, नाते, करिअर, नोकरी वा कोणतंही क्षेत्र असो... आपली डेडलाइन कळली पाहिजे.
नात्यांची उत्कटता अनुभवायची असेल तर तणावाला सुरुवात झाली की, एका हळुवार वळणावर अलिप्त होणं, थांबणं कधी कधी महत्त्वाचं असतं. अगदी बेजार होईपर्यंत, एकमेकांना नकोसं होईपर्यंत दात खुपसून राहणं नात्यातला रोमान्स घालवतं, मग ते नातं कोणतंही असो. नात्यांची गुंफण गुंता होईपर्यंत ताणू नये. काहीवेळा कुठे थोडं लांब असणंही महत्त्वाचं असतं. अतिपरिचयात अवाज्ञा होण्याची शक्यता असते. अशा अंतरानं प्रेम कमी होत नाही. उलट कोंडलेले श्वास मोकळे होतात. विरह आंतरिक प्रेमाला बळकटी देतो. विरह, चिंतनातून आत्मीयता वृद्धिंगत करते. विरह स्पर्शाची अभिलाषा निर्माण करते. समीपता, समर्पण, उत्कटता वाढवत नेते. आसक्तीच्या वादळासाठी विरहाच्या वाळवंटात अतृप्तेची वाळू आवश्यक असते. अडथळे नको, जवळीकता हवी, मात्र तरीही त्यातून दम कोंडायला नको! किती सुंदर भावना आहे. रवींद्र जैन यांनी ‘सौदागर’ सिनेमात लिहिलेल्या या प्रेमगीतात बेजार शब्दांचा सुरेख वापर केला आहे.
बीच हम दोनो के, कोई दीवार न हो
तू कभी मेरे ख़ुदा, मुझसे बेज़ार न हो
प्यार की प्रीत की यूँ ही बरसात रहे
तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ रहे...
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे...
साथ हवी, मात्र त्यामध्ये सुरक्षित अंतर हवं. प्रवास हवा, पण त्यात सिग्नलही असावेत. भावनांचा निचरा असा नियमित हवा. प्रत्येक मनाला त्याची ‘स्पेस’ हवी असते. ती जाणिवा असणाऱ्यांनी नव्यांना दिली पाहिजे. ती सहज मिळाली तर आनंदाला पारावर नसतो. त्यामुळे काळाचा, वयाचा आणि वास्तविकतेचा गाभा समजला पाहिजे. मुलांच्या पायात आपली चप्पल आल्यानंतर जबाबदारीतून हळूच वडिलांनी बाहेर पडावे. हिंदू संस्कारांमध्ये हे अधोरेखित आहे. पण, मुलाला सरपंचपदाची स्वप्न पडत असताना आपण वॉर्डात उमेदवारी जाहीर करणं म्हणजे पाय घासेपर्यंत काहीच न सोडणं होय. जगणं तसंच सुंदर आहे. जगण्याचा तमाशा करण्यापेक्षा एखाद्या नात्याला कधी दिलेला आराम प्रेम वाढवते.
नात्यात असो, व्यवहारात की कार्यालयात, ‘गॅप’ कळल्या पाहिजे. साहित्य-पत्रकारिता, साहेब-कर्मचारी, मालक-कामगार, प्रेयसी-पत्नी, प्रियकर-नवरा यातला फरक कळला पाहिजे. प्रत्येक नात्याची नजाकत असते. प्रेयसी ही कवितेसारखी. हवी त्या फॉरमॅटमध्ये! मात्र ती बायको झाल्यावर अग्रलेखच. ती हाणणारच किंवा व्हाइस-व्हर्सा. उगीच याला त्या रूपात, त्याला या रूपात बघण्याची चूक करू नये. भोळी बायको अन् भोळा नवरा असं काही नसतं. घण म्हटला की, दणके मारणारच. ऐरण ते सहन करणारच! चुकीच्या अपेक्षांचं ओझं असं कधीच वर न चढणाऱ्या कंपनीच्या शेअर्ससारखं असतं.
या सगळ्यात साहिर लुधियानवी या शायरचं एक गाणं जगण्याचा सार सांगून जातं. गाणं तसं चिरपरिचित आहे, ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...’ यातील शेवटचं कडवं अप्रतिम आहे-
तार्रुफ़ रोग हो जाये
तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये
तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक
लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर
छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से...
ही फकिरी, हा मनाचा मोठेपणा आणि ही विरक्ती आयुष्यात गोडी निर्माण करते. नातं नव्यानं समजून घेण्याची ऊर्जा देते. नातं असो, करिअर असो, नोकरी, शहर, संस्था, कार्यालय किंवा जगण्याची वहिवाट असो, कोणाला किती चिटकायचं हे ठरलं पाहिजे. कुठं तरी थांबलं पाहिजे!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Nagpur
Nagpur
440001

Other Nagpur public figures (show all)
Job Alert Job Alert
Nagpur
Nagpur

New job alert gov and pvt sector

HS Pawar 8602 HS Pawar 8602
Mecosabagh Christian Colony
Nagpur, 440004

� Thank you For Everything �

Wasti_writer Wasti_writer
Nagpur

Motivator

Journalist Shriya Journalist Shriya
Nagpur, 440003

News presenter

Afsana's tailored tales Afsana's tailored tales
Mahdi Bagh Colony
Nagpur, 440017

This page is a bird's eye view to the beauty of nature.

milkywayap milkywayap
Nagpur

MeMeS gIvE mE wInGs�� �MilKyWaY GaLaXy a GalAxy Of mEmeS �

मराठी स्वाक्षरी मराठी स्वाक्षरी
Nagpur

मराठी स्वाक्षरी | Marathi Signature|�

DREAM Chaser DREAM Chaser
Plot No. 76, Ujjwal Nagar, Zingabai Takli, Godhani Road
Nagpur, 440030

असंभव से परे जाकर संभावनाओं की तलाश करो।

Feel It shayri Feel It shayri
Nagpur

Feel full lines ���

Dr. Prashant Koratkar Dr. Prashant Koratkar
Nagpur, 440015

Prashant Koratkar I have been a journalist for the last 22 years and this page has been created for

Sketch_shubh1 Sketch_shubh1
Nagpur

� Drawings | Sketching |painting �the page where you found best