Aam Aadmi Party Nashik

Aam Aadmi Party Nashik

Official page of Aam Aadmi Party Nashik It's a Political revolution

Photos from Arvind Kejriwal's post 02/03/2024
02/03/2024

आज दि.2 मार्च 2024 काळाराम मंदिर सत्याग्रह दिवस निमीत्त काळाराम मंदिर येथे सर्व आप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्मृतिस्तंभाला अभिवादन केले.

01/03/2024

या वेळेस ही दिल्ली चा बजेट 14000 कोट्यानी नफ्यात आहे ही परिस्थिती पूर्ण राज्य नसल्यावर आहे, प्रत्येक गोष्ट अर्थडा टाकून सुद्धा बजेट नफ्यात.

25/02/2024

आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकची आढावा बैठक संपन्न

आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक नवीन नाशिक मधील वंजारी भवन येथे संपन्न झाली. सदर बैठकीला राज्याचे विभागीय संघटक नवींदरसिंग आहलुवालिया, जिल्हा अध्यक्ष उत्तम निरभुवने, युवा संघटक प्रदीप लोखंडे उपस्थित होते. यावेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संघटन वाढीसाठी श्री फाटके यांनी महत्वपूर्ण सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. महाराष्ट्राचे राजकारण सध्या एका वेगळ्या उंचीवर जात आहे. त्यातच आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. 21 जानेवारीला आप च्या केंद्रीय नेतृत्वाने श्री. अजित फाटके पाटील यांना राज्याची धुरा सोपविली. तेव्हापासून सलग महिनाभरापासून श्री.फाटके महाराष्ट्र दौऱ्यावर आढावा बैठकीसाठी फिरत आहे.

कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील यांनी नाशिक शहर आढावा बैठक घेताना सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेलेले असून जाती-धर्माचे विष पेरले जात आहे. हे विषारी राजकारण उखडून आपल्याला शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या मूळ प्रश्नांवर काम करायचे आहे. यासाठी आम आदमी पार्टी सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्ष संघटन वाढ अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे."

तसेच यावेळी श्री फाटके पाटील यांनी नाशिकमधील आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी वैयक्तीक बैठक घेतली. पक्ष वाढीसाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली. तसेच आम आदमी पार्टीचे कार्य सर्वसामान्यांना उच्च दर्जाचे के जी टू पीजे मोफत दर्जेदार शिक्षण, तसेच, कांदा व ऊस यासारख्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव, 300 युनिट पर्यंत सर्वसामान्यांना मोफत वीज, उच्चतम दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत खात्री देऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने आजवर केलेल्या उत्तम कामाची सखोल माहिती कार्यकर्त्यांना देत त्यांच्यात जोश भरला. नाशिक ग्रामीणच्या समस्यांबद्दल जिल्हाध्यक्ष उत्तम निर्भावणे यांनी आपले मत मांडले.

कार्यकर्त्यांशी सु-संवाद साधून महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी कार्यकर्त्यांना अनमोल मार्गदर्शन केले व आगामी लोकसभा निवडणुका आम आदमी पार्टी इंडिया आघाडीत तर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे, याबाबत माहिती दिली. यावेळी प्रदेश सहसंघटनमंत्री श्री नविंदर सिंग यांनी सांगितले की, "नाशिकमधील नामांकित लोक आपल्या संपर्कात असून ते अरविंद केजरीवाल यांच्या विकासकामांवर अत्यंत प्रभावित असून लवकर पक्षात प्रवेश करतील."
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from Aam Aadmi Party Nashik's post 24/02/2024

नाशिक जिल्हा आढावा मिटींग.

Gopal Italia Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party

22/02/2024

आज जळगाव शहरात आढावा बैठकीच्या अनुषंगाने आप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
या दरम्यान पक्षाची राज्यात कशा प्रकारे वाटचाल राहील व संघटन बांधणी याबद्दल मांडणी केली.

20/02/2024
19/02/2024

19 फेब्रुवारी 2024 रोजीसालाबाद प्रमाणे आम आदमी पार्टी नाशिकचे मा. युवा शहराध्यक्ष अमर गांगुर्डे यांच्या प्रभागात शिवजयंती उत्सव आप नासिक पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला त्याप्रसंगी राज्य मिडीया प्रमुख चंदन पवार Chandan Pawar , राज्य युवा सह-संघटक प्रदीप लोखंडे प्रदिप दिनेश लोखंडे , एड. अभिजीत गोसावी Abhijeet Gosavi , स्वप्नील घिया Swapnil Ghiya , सुमेध गांगुर्डे, रेखा गोसावी, ज्ञानेश्वर गुठ्ठे , Deepak Sarode दीपक सरोदे, Girish Ugale Patil मा.शहर अध्यक्ष गिरीश उगले पाटील. आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Gopal Italia Aam Aadmi Party Maharashtra AAP Youth Wing - Maharashtra AAP Youth Wing - Nashik Aam Aadmi Party Jalgaon Aam Aadmi Party Dhule Aam Aadmi Party - Youth Wing Aam Aadmi Party - Delhi Dr. Sandeep Pathak Aam Aadmi Party Nashik Ajit Phatake Ajit Phatake

19/02/2024

बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा मा.युवा शहराध्यक्ष अमर गांगुर्डे यांनी शिवजयंती निमीत्त प्रभाग क्र.15 मध्ये सादर केलेला देखावा.

18/02/2024
17/02/2024

आम आदमी पार्टीचे नियुक्त कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील यांचा उत्तर महाराष्ट्र संयुक्त जिल्हा/ महानगर बैठक दौरा.

ाराष्ट्र

17/02/2024

शहरातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आप नाशिकचे "बोंबाबोंब" आंदोलन.

15/02/2024

आम आदमी पार्टीचे नासिक महानगरपालिकेवर "बोंबाबोंब" आंदोलन.

नाशिक महानगरपालिकेचे उद्यान विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, साफसफाई विभाग, नालेसफाई विभाग, रस्ते विभाग, या सर्व विभागांकडे आम आदमी पार्टी वेगवेगळ्या प्रभागातील कामांसाठी पाठपुरावा करीत असते, या कामांसाठी अनेक वेळा निवेदने, स्मरणपत्रे देऊनही या विभागातील वरिष्ठ लक्ष देत नसल्यामुळे शेवटी झोपेचे सोंग घेतलेल्या वरिष्ठांचे लक्ष जनहिताच्या कामांकडे वेधण्यासाठी आम आदमी पार्टीने महानगरपालिका मुख्यालयातील गेटवर बोंबाबोंब आंदोलन केले.

नाशिकमधील जवळपास सर्वच प्रभागातील बरीच कामे अनेक महिन्यांपासून अजूनही तशीच प्रलंबित असल्यामूळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना जनतेला उत्तर देण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो आहे, मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळें नगरसेवकांनीही कान आणि डोळे बंद करून जनतेच्या समस्यांना त्यानीं वाळीत टाकले आहे, अश्या परिस्थितीत फक्त आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आप आपल्या प्रभागांतील समस्या महानगरपालिकेत पोहचवीत आहेत. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी सर्वच कामात चालढकल करीत असल्यामुळे, शेवटी त्रस्त होवून मोठया संख्येने एकत्र येत आपच्या कार्यकर्त्यानी "बोंबाबोंब आंदोलन" केले आहे, या आंदोलनानंतर महानगरपालिकेचे झोपलेले अधिकारी नक्कीच जागे होतील आणि सर्व प्रलंबित कामांची पूर्तता करतील अशी अपेक्षा नागरिकांसह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे.

ह्यावेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलूवालिया, राज्य युवा संघटन मंत्री प्रदीप लोखंडे, गिरीश उगले पाटील, योगेश कापसे,स्वप्निल घिया, अमर गांगुर्डे, भाग्यश्री आहेर,पद्माकर अहिरे, बाळासाहेब बोडके,दीपक सरोदे,शुभम पडवळ,सुमित शर्मा,एकनाथ सावळे,कलविंदर गरेवाल, नूतन कोरडेे, विकास पाटील, चंद्रशेखर महानुभव,रमेश पाटील आदी आंदोलनात सहभागी होते.

15/02/2024
15/02/2024

आम आदमी पार्टी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील यांची नेवासा नगरपंचायत येथे जनसभा.
https://www.facebook.com/share/v/FaY2kJW95y1yMXEy/?mibextid=oFDknk

15/02/2024

सर्वांनी सामील व्हा.

15/02/2024

*सूचना*
*निकलो घर, दुकान से जंग लड़ो बईमानो से*
*आम आदमी पार्टी* नासिक.

आझ दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी नासिक शहरातील विविध प्रभागातील समस्यावर दिलेले निवेदन व स्मरण पत्र महापालिकेच्या आयुक्तांना देऊनही प्रभागातील कामे पूर्ण करत नाही त्या संदर्भात उद्या दुपारी 12:00 वाजता महानगरपालिका नाशिक च्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार आहोत सर्व प्रभागातील सर्व रहिवासी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

*आम आदमी पार्टी* नासिक.

धन्यवाद 🙏🙏

13/02/2024

अन्नदाता शेतकऱ्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केंद्र सरकारने बवाना स्टेडियमला तुरुंग बनवण्याचा दिलेला प्रस्ताव अरविंद केजरीवाल सरकारकडून धुडकावून लावण्यात आला.
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आम आदमी पक्ष सदैव कटिबध्द आहे.

Photos from Aam Aadmi Party Nashik's post 09/02/2024

महाराष्ट्रात वकील संरक्षण विधेयक मंजूर करावे- आम आदमी पार्टी

भारत हा कायद्याचे राज्य असणारा संवैधानिक देश आहे. आणि हेच कायद्याचे राज्य टिकविण्यासाठी वकील समूह न्याययंत्रणेतील सर्वात महत्वपूर्ण घटक आहे. वकीलांशिवाय न्यायालयीन कामकाज होणे अशक्य आहे. संवैधानिक यंत्रणा सुदृढरित्या चालण्यासाठी, एकंदरीत लोकशाही बळकटीकरणासाठी वकील समूह महत्वपूर्ण भूमिका बजावतो. अशी आमच्या पार्टीची ठाम भूमिका आहे.

मात्र अलीकडे वारंवार वकिलांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. अलीकडेच राहुरी येथे वकील आढाव दांपत्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर वकिल निर्भयपणे आपले दायित्व निभावू शकले नाही तर संवैधानिक यंत्रणा कोलमडण्यास वेळ लागणार नाही. एकंदरीत लोकशाही धोक्यात येईल.

त्यामुळे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये "वकील संरक्षण कायदा" लागू करण्यासंदर्भात बार कौन्सिल महाराष्ट्र ॲण्ड गोवा यांच्या वतीने राज्य शासनाकडे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाचा मसुदा सहा महिन्यांपूर्वीच सादर केलेला आहे. परंतु हे बिल महाराष्ट्रात लागू करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. शिवाय सदर कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रचंड उदासीन दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर वकील वर्गात असुरक्षतेची भावना पसरलेली आहे. राजस्थान आणि कर्नाटक राज्यातील वकील संरक्षण विधेयक २०२३ याचा देखील अभ्यास करून महाराष्ट्रात वकील सुरक्षासाठी कायदा पारित करण्यात यावा आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करावी. जेणेकरून वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ह्या कायद्याचा वापर होईल आणि वकील निर्भयपणे काम करू शकतील. परिणामी लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. तसेच वकील आढाव दांपत्य हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी.

याशिवाय दिल्लीतील केजरीवाल सरकारने ज्याप्रमाणे वकील वर्गासाठी वेल्फेअर साठी काम केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील योग्य ते पाऊले उचलण्यात यावी. यासाठीचे निवेदन आज नासिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

ह्यावेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलूवालिया, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, राज्य युवा संघटन मंत्री प्रदीप लोखंडे, गोरख मोहिते, अमर गांगुर्डे, अमित यादव, विकास पाटिल, गिरीश उगले, दीपक सरोदे आणि वकील समुहातर्फे ऍड.अभिजीत गोसावी, ऍड. भुषण टाटीया, ऍड. प्रशांत जाधव, ऍड. उमेश खैरनार, ऍड. कमलेश औटे, ऍड.अमोल वानखेडे, ऍड. रवी कांबळे ईत्यादी वकील आणि आप चे पदाधिकारी उपस्थित होते.

Aam Aadmi Party Maharashtra
AAP Youth Wing - Maharashtra
AAP Youth Wing
Aam Aadmi Party Nashik
AAP Youth Wing - Nashik
AAP Nashik District- Rural
Aam Aadmi Party

Gopal Italia

08/02/2024
06/02/2024

शरद पवार साहेबांच्या गटाने AAP च्या झाडू चिन्हावर निवडणूक लढवावी - आप महाराष्ट्र चे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी विनम्रपणे दिली ऑफर

‘’तुमची मुलगी कॉलेजात कशी जाईल?, तुमच्या पत्नीला…’’ आपकडून ED वर गंभीर आरोप, आतिशी म्हणाल्या... 06/02/2024

गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.

‘’तुमची मुलगी कॉलेजात कशी जाईल?, तुमच्या पत्नीला…’’ आपकडून ED वर गंभीर आरोप, आतिशी म्हणाल्या... AAP Serious Allegation on ED: गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्या पार्श्व...

03/02/2024

भाजप आ. गणपत गायकवाड यांनी पोलिस स्थानकात गोळीबार करून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवले आहेत. याविरुद्ध आज आप नाशिक टीम ने निदर्शने करीत व जिल्हाधिकारी कार्यालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन देत निषेध व्यक्त केला.

Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party Arvind Kejriwal Navinder Ahluwalia AAP Nashik District- Rural AAP Youth Wing - Maharashtra AAP Youth Wing - Nashik AAP Ka Deepak Singla Aam Aadmi Party - Delhi Aam Aadmi Party Jalgaon Aam Aadmi Party Yavatmal Gopal Italia Dr. Sandeep Pathak Maharashtra Times CMOMaharashtra AAP Youth Wing Aam Aadmi Party - Youth Wing Aam Aadmi Party Dhule AAP Malegaon Aam Aadmi Party Nashik

#जागोमतदारजागो #महाराष्ट्र

Photos from Aam Aadmi Party Nashik's post 31/01/2024

आप नाशिकच्या वतीने करण्यात आलेल्या बेरोजगार आक्रोश आंदोलनाची दैनिक लोकमतने, दिव्य मराठी व लक्ष महाराष्ट्र यानी घेतलेली दखल.

30/01/2024

बेरोजगार आक्रोश आंदोलन

सदोष सरकारी नोकर भरती मधील पेपरफुटी चे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. याउलट सरकारने "सदोष तलाठीभरती" चा "सदोष" निकाल ५ दिवसांपूर्वी लावला आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सदर विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली.

आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांना व आपल्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन मंगळावर दि.३० जानेवारी, २०२४ रोजी नाशिक शहरात संविधनिक मार्गाने, सदोष नोकर भरती प्रक्रियेच्या विरोधात, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी "बेरोजगार आक्रोश आंदोलन" करण्यात आले.

Photos from Aam Aadmi Party Nashik's post 30/01/2024

बेरोजगार आक्रोश आंदोलन

सदोष सरकारी नोकर भरती मधील पेपरफुटी चे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. याउलट सरकारने "सदोष तलाठीभरती" चा "सदोष" निकाल ५ दिवसांपूर्वी लावला आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांचे फोन/मेसेजेस येत आहेत.

आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांना व आपल्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन मंगळावर दि.३० जानेवारी, २०२४ रोजी नाशिक शहरात संविधनिक मार्गाने, सदोष नोकर भरती प्रक्रियेच्या विरोधात, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी "बेरोजगार आक्रोश आंदोलन" करण्यात आले.

27/01/2024

दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू, AAP च्या 21 आमदारांना प्रत्येकी रु 25 कोटींची ऑफर, मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करून सरकार पाडणार.
धक्कादायक !

25/01/2024

26 जानेवारी रोजी (प्रजासत्ताक दिन) सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Want your organization to be the top-listed Government Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिनानिमीत्त आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने अभिवादन करण्यात आले.त्याप्...
आम आदमी पार्टी तर्फे संविधान दिवस व 26/11 च्या शहिदांना वंदन करत असताना adv अभिजीत गोसावी यांनी दिलेली प्रतिक्रिया....!
आप खासदार संजय सिंग यांना ED ने केली खोट्या आरोपाखाली अटक.देशात अघोषित आणीबाणी.
गणपती विसर्जन मुख्य मिरवणूक......

Telephone

Address


Dehnar Bungalow, Behind Ashoka Tower, Ashoka Road Nashik
Nashik
422009