Coat Tech

Heritage structure restoration & preservation,
Rainwater Harvesting, waterproofing

Photos from Coat Tech's post 26/08/2022

आपले घर मुसळधार पाऊस, कडक सूर्यप्रकाश, जास्त ओलावा अशा परिस्थितीतून जाते, ज्यामुळे बारीक भेगा पडतात. त्यामुळे भिंत, स्नानगृह, छतावरून पाणी टपकू लागते किंवा गळू लागते.जेथे पाणी थेट प्रवेश करते आणि साचते, तेथे छत, भिंती एकतर ओलसर होतात किंवा पाणी गळू लागते.पाणी पृष्ठभागावर साचून राहिल्याने अथवा गळती झाल्याने, घराचे नुकसान होते जसे भिंतीवर बुरशी तयार होणे, पेंट निघून जाणे, प्लास्टर पडू लागणे व त्यानंतर काँक्रीट मधील स्टील गंज पकडणे इत्यादी. ह्या समस्या गळतीने निर्माण होऊ शकतात व इमारतीचे व घरांचे आयुर्मान कमी करतात, म्हणून ह्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असते.
वॉटरप्रूफिंग ही पृष्ठभाग किंवा संरचनेला पाणी-प्रतिरोधक बनविण्याची प्रक्रिया आहे, जेणेकरून त्यावर पाण्याचा प्रभाव पडत नाही आणि पाणी पृष्ठभागावर येऊ देत नाही.
अशा ठिकाणी आम्ही आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने वॉटरप्रूफिंग करतो. त्यामुळे पाणी येत नाही, छत, भिंती मजबूत होऊन नवीन व सुंदर दिसते.
सल्ला घेण्यासाठी आजच संपर्क करा आणि नियोजित भेट निश्चित करा.

संपर्क- 9158375177

07/05/2022

रांझ्यातील प्रकल्पाने सुटली पाणी समस्या...!
रांझे येथे 'अफार्म' संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये उभारण्यात आलेली दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी.

दहा वर्षांपूर्वी बाजार मूल्यापेक्षा ३०% ते ४०% कमी खर्चात बांधलेल्या ह्या टाकीचा अजूनही त्याच क्षमतेने वापर होत आहे.विशेष म्हणजे दहा वर्षांपासून टाकीला कुठयालही प्रकारच्या मेंटन्सची गरज भासलेली नाही.
ही टाकी कोट-टेक कंपनीचे संस्थापक श्री. राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आली आहे.

ही बातमी महाराष्ट्र टाईम्स यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आली आहे.

संपर्क- ९१७५४०५२१२
९८६०८२१४७९

03/05/2022

सर्जनशीलतेतून साकारलेली पाण्याची टाकी...

रांझेगाव..! पुणे-बंगळूरू महामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्यानजिक वसलेलं एक छोटेखानी गाव. हिरवाईने नटलेल्या व डोंगरराजीने वेढलेल्या या टुमदार खेड्यात, जलसंवर्धन विषयातील एक अनोखा असा प्रयोग झालाय. या ठिकाणी असलेल्या ‘अफार्म’ या संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ चा पुणे परिसरातील सर्वात मोठा प्रकल्प साकारला गेलाय, याची वास्तविक खूप कमी लोकांना कल्पना आहे. कारण त्याचा गवगवा झालाच नाही...मीडियाने जुजबी प्रसिद्धी दिली, परंतु शासन दरबारी त्याची हवी तशी दखल घेतली गेली नाही.

'अफार्म' या पुणे-स्थित सामाजिक संस्थेने ‘जलसंधारणाच्या’ च्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. परंतु 'रूरल डेव्हलोपमेंट' मध्ये ५० वर्षांहून अधिक काळ सक्रीय असलेल्या तसेच जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आमच्याच संस्थेला, पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागले, .....

रांझेगाव येथील संस्थेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये सामाजिक संस्था, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, समाजाभिमुख संस्था, शासकीय कर्मचारी ह्यांचे साठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.यांमुळे संस्थेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये पाण्याची निनांत गरज भासते. ही गरज भागविण्याकरिता, सुरुवातीला एका विहिरीतून पाण्याची व्यवस्था करण्यात आली, पण काही काळानंतर संस्थेला तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली. पाण्याची कमतरता भरून काढण्याकरिता प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीजवळ छतावरील पाऊस पाणी संकलन प्रकल्प उभा केला त्या अंतर्गत ५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. परंतु गळतीच्या समस्येने, टाकी बांधूनसुद्धा व प्रकल्पाची क्षमता वापरूनसुद्धा गळतीने पूर्ण पाणी वाहून जाणे व टाकी रिकामी होणे, अशा समस्यने संस्थेचे व्यवस्थापन सदस्य हैराण झाले होते. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता आणखी एका पाण्याच्या टाकीचे खोदकाम करण्यात आले, जेणे करून अतिरिक्त मोठ्या टाकीत पाण्याचे नियोजन करता येऊ शकेल. मोठी टाकी उभारण्याकरिता खोदकाम केलेल्या जागेत टरपोलीन पॉलिमर (प्लास्टिक) कापड आच्छादून पाणी साठविण्याची व्यवस्था केली गेली. ह्या करिता प्रशिक्षण केंद्राच्या मागील भागात असलेल्या डोंगरातून वाहून येणारे पाणी नियोजित ठिकाणी संकलित होईल अशी व्यवस्था केली. परंतु काही दिवसांतच पुन्हा गळती सुरु होऊन पाणी पूर्णपणे वाहून गेले व एवढा सगळा खटाटोप करून पाणी प्रश्नाचा तिढा मात्र सुटला नाही.

दरम्यान, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री. रामभाऊ चव्हाण व कार्यकारी संचालक श्री. सुभाष तांबोळी सर ह्यांचा 'कोट-टेक’ च्या श्री. राजेश राठोड यांच्याशी सुदैवाने परिचय झाला. सर्फेस कोटिंग तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या तसेच वॉटरप्रूफिंग चे एकाहून एक मोठे व आव्हानात्मक प्रकल्प हाताळलेल्या श्री.राठोड यांची भेट होणे, ही आमच्या संस्थेच्या दृष्टीने खरंच सकारात्मक बाब होती. सदर भेटीत तिघांमध्ये पाणीप्रश्नावर बराच विचारविनिमय झाला.

श्री. राजेश राठोड (९८६०८२१४७९) यांनी त्वरित आमच्या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली; त्यांचे विचारचक्रही सुरु झाले. पाण्याचा होणारा अपव्यय त्यांना अस्वस्थ करत होता... सूक्ष्म निरीक्षण, समस्येच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आणि पठडीबाहेरचा विचार करण्याची अंगभूत सवय, या त्यांच्या स्वभावातून एक आगळे-वेगळे सोल्युशन साकारले गेले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

वरील समस्या व पाण्याची वाढती गरज लक्षात घेउन १० लाख लिटर क्षमतेची मोठी टाकी बांधायचे ठरले. वरील कामाचे डिझाईन व पावसाचे पडणारे पाणी टाकीत विना गळती कसे टिकेल ह्यावर त्यांनी काम सुरु केले. सर्वप्रथम पाण्याच्या टाकीचे ड्रॉईंग - डिझाईन व क्षमतेबाबत आर.सी.सी.कनसलटंट कडून प्रमाणित केले. क्षमतेबाबत त्यांनी सुचविलेले नाम-मात्र बदल स्वीकारून, सुधारित डिझाईन बनवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. टाकीचा मुख्य भाग हा जमिनीखाली (अंडरग्राऊंड) असल्यामुळे पारंपरिक पद्धतीला फाटा दिला, कारण पारंपारिक पद्धतीने आर.सी.सी. (सलोह) मध्ये बांधकाम केल्यास ते खूपच खर्चिक ठरत होते. कमी खर्चात बांधकाम करण्यावर भर देताना त्यांनी कोठेही तांत्रिक स्वरूपात वा गुणवत्तेत तडजोड केली नाही.

टाकीचे बांधकाम करतानाच बांधकामास लागणारी सामग्री - जसे की वीट, वाळू व सिमेंट - ह्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे काही घटक (झाड व जमिनीखालील खनिजांमधून) योग्य प्रमाणात मिसळून तसेच योग्य त्या तापमानाची लय साधून,हे सदरचे मिश्रण बांधकामात वापरण्यात आले. विशेष म्हणजे ह्याच मिश्रणाचा वॉटरप्रूफिंग लेयर मध्येही वापर करण्यात आला. पहिल्यांदाच अशा पद्धतीचे काम करण्यात आले, ज्यामुळे पाण्याच्या टाकीचे बांधकाम व त्यावरील वॉटरप्रूफिंग हे एकत्रितच साध्य झाले. आज १० वर्षांनंतर सुद्धा टाकी पूर्ण क्षमतेने भरते; आता आमची संस्थेची पाणी टंचाईच्या समस्येतून पूर्णतः सुटका झाली आहे.

अभिनव पद्धतीने काम केल्याने आर.सी.सी. वर होणारा खर्च व वॉटरपूफिंग करिता नंतर येणारा खर्च टाळण्यात यश आले. यामुळे एकूण खर्चात जवळ-जवळ ४०% टक्के बचत झाली.

प्रत्यक्ष काम पूर्ण झाले व पुढे काही दिवसांतच पाऊस सुरु झाला. अवघ्या काही दिवसांतच पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरली व वाहू सुद्धा लागली.


नगररचनाकार,वास्तुरचनाकार,अभियंते,जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था आणि जबाबदार नागरिक, अशा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा तसेच यशस्वी जलसंवर्धनाचा कानमंत्र देणारा हा निश्चितच एक पथदर्शी प्रकल्प आहे.

– श्री अनिल गायकवाड,
(९८५००६२२७२)

कार्यक्रम व्यवस्थापक,

'अफार्म', पुणे.

------------------------------------------------------------------------------------------------------

28/04/2022

सौजन्य- सकाळ वृत्तपत्र.

पर्वतीवरील विष्णू-नारायणाचे मंदिर अडीचशे वर्षांपूर्वीचे आहे. मध्यंतरी देखभालीअभावी मंदिराच्या कळसापासून ते भिंतींपर्यंतच्या बहुतेक भागाची पडझड झाली होती. मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवून मंदिराची पुनर्वाधणी करणे हे काम तज्ज्ञांशिवाय शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन या मंदिराचे काम पृष्ठभाग विलेपणतज्ज्ञ राजेश राठोड (कोट टेक कंपनीचे संस्थापक) यांच्याकडे सोपविण्यात आले.
कोट टेक ही एक उदयोन्मुख मल्टी-सर्व्हिसेस फर्म आहे जी वॉटरप्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग, हेरिटेज स्ट्रक्चर रिस्टोरेशन आणि इनोव्हेटिव्ह रोड रिपेअर्स या क्षेत्रात विशेष आहे.

Want your business to be the top-listed Engineering Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411011
Other Engineering Services in Pune (show all)
Process Equip India Process Equip India
Pune, 411037

Protomech Consultant Protomech Consultant
Plot No. 37/2/3/2, Omkar Colony Lane No. 2, Near Gajanan Maharaj Mandir, Kalepadal, Hadapsar
Pune, 411028

Prototype & New Product Development by Transforming ideas into reality with precision and creativity.

Kotech Infra Kotech Infra
G*t No 97/1, Solu, Alandi
Pune, 412105

Established back in 2019, we are a professional organization actively working in the Manufacturing of precision and high-quality Components used for specific applications in mining...

Patiltechnicalsolutions Patiltechnicalsolutions
PCNDTA MIDC Sector No. 10 Plot No. 04/9 BHOSARI PUNE (MH)
Pune, 411026

PATIL TECHNICAL SOLUTIONS has at its disposal more than thirty manufacturing techniques and can produce almost any tool for metal forming technology or applied technologies with ou...

AMS3D-The world of 3D Metrology AMS3D-The world of 3D Metrology
Plot No. 249, Sector No. 7, PCNTDA Bhosari
Pune, 411026

3D Metrology services/ sub contracts for 3D Inspection

Shubham Udyog Shubham Udyog
J 359 MIDC Bhosari Pune Near Quality Circle
Pune, 411026

Projexel Process Equipment Pvt.Ltd Projexel Process Equipment Pvt.Ltd
Projexel Process Equipments Plot No 1567, Shelar Wasti, Chikhali
Pune, 412114

Projexel Process Equipments Pvt Ltd is a Turnkey Solution Provider in the field of Zero Liquid Discharge plant (Multiple Effect Evaporator).

Super Engineers Super Engineers
MIDC BHOSARI
Pune, 412801

An ISO 9001:2015 Company We are in the business of manufacturing CNC and VMC machined components.

Shiv Enterprises Shiv Enterprises
Bhosari , Pune
Pune, 411026

MechanicalTricks.com MechanicalTricks.com
Pune, 411001

Cloos India Welding Technology Private Limited Cloos India Welding Technology Private Limited
Pune, 411001

ALL from Single Source Robotics and Manual welding solution