Virar shahar

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Virar shahar, Landmark & historical place, Mumbai.

13/12/2023

🙏कौतुकास्पद आणि अभिमानास्पद नक्की वाचाचं🙏

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.
फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे.
मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.
आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग :-
कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत.
याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले कि त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.
प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे
सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्ट पासून *ड्रोन* बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग :-
आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने *दुसरे पारितोषक* पटकावले.
त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा.
जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते.
हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.
प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता. निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा... आणि घोषणा झाली *'आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे'* त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले.
त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला.
आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)
"रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन"
मध्ये त्याला सामावून घेतले आहे
भारतीय 'बलस्य मूलं विज्ञानं' चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

07/12/2023
18/09/2023

🔸एक कडवट सत्य.🔸

एके काळी लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे....

चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान .... मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर.... पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.

मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला .... पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं .... अगदी बाप्पांचा आकारही वाढला .... काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.

सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.

साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग .... पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन .... प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा....

आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ....

श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का .... ?

नसेल कदाचीत, कारण आता "राजा" अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, "VIP" झाला आहे बाप्पा ....

आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो .... आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो .... "राजा" ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.

" देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?

देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.

देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.

देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.

देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.

देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.

देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो .... !!

✒️एक मुंबईकर गणेशभक्त 🙏

|| गणपती बाप्पा मोरया ||

06/09/2023

प्रति
1) माननीय.श्री.एकनाथजी शिंदे साहेब ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )
2) माननीय.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )
3) माननीय. श्री.अजित पवार साहेब ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )
4) माननीय.श्री.अतुल सावे साहेब (गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य )

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण ------उत्तर सापडत नाही.
-------------------------------------

महोदय,

मी श्रीकृष्ण गणपत गोसावी, संस्थापक,नागरिक सहकारी गृहनिर्माण संस्था.वय-68वर्षे, राहणार, गणपत बुवा चाळ, मालपा डोंगरी नंबर 3,महाकाली रोड,अंधेरी पूर्व,मुंबई 93. आयुष्यभर झोपडपट्टीत राहून सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारा एक सामान्य सेवानिवृत्त तहसीलदार.मी अत्यंत तळमळीने पुढील प्रश्नांची उत्तरे शोधतो आहे.

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण----पण उत्तर सापडत नाही.
----------------------------------------

1) आमचा पुढील नमूद पुनर्वसनासंबंधीचा भूसंपादन प्रस्ताव आणि मुंबई शहरातील रखडलेले अनेक प्रस्ताव पाहता, अत्यंत नम्रतापूर्वक आपणास निवेदन करतो की, मौजे -- मोगरा, तालुका-- अंधेरी, जिल्हा --मुंबई उपनगर न.भू.क्रमांक 429/ब आणि 429/ब 1 ते 286 क्लस्टर नंबर के पूर्व 199,मालपा डोंगरी नंबर 3,महाकाली रोड,अंधेरी पूर्व, मुंबई 93.या झोपडपट्टीत माझे घर असून त्या झोपडपट्टीचा स्वयं पुनर्विकास करण्याचा सन 2006 पासून प्रयत्न सुरू आहे.आज रोजी एस. आर. ए.कार्यालय बांद्रा पूर्व,मुंबई यांचेकडे हे काम प्रलंबित आहे.समक्ष भेटून पत्रव्यवहार करून काही होत नाही.पत्राचे उत्तर देण्यास कुणालाही वेळ नाही.कारण आमच्याकडे बिल्डर नाही, आमच्याकडे पुढारी नाहीत, आमच्याकडे कोणी मोठा अधिकारी नाही,आमच्याकडे पैसे नाहीत,शासन दरबारी आमचा कुणी वाली नाही. सर्वसामान्य झोपडीधारक हतबल आहे,निराश आहे, पुनर्वसनाचे स्वप्न पाहतो आहे. इमारतीमध्ये राहण्याचे स्वप्न पहात अनेक जणांचे गेल्या 17 वर्षात कायमस्वरूपी देवाघरी पुनर्वसन झाले. खरंच ही योजना झोपडपट्टीत हयात असणाऱ्या झोपडीधारकांसाठी की,------

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण ----पण उत्तर सापडत नाही.
---------------------------------------

2) पुनर्वसन म्हणजे मोफत घर. म्हणजे झोपडीधारकांवर फार मोठी मेहरबानी,दया,उपकार, देणगी,मदत आणि सहानुभूती. कारण की झोपडीधारक गरीब, लाचार, भिकारी,याचक झोपडीधारकांच्या झोपडीवर संबंधितांची कमाई, कमाईच्या प्रमाणाचे अवलोकन करता, झोपडीधारकास 10 % फायदा तर संबंधितास 90% फायदा.हे गणित समजून येत नाही.मग प्रश्न पडतो की,------

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण -----पण उत्तर सापडत नाही.
----------------------------------------

3) मुंबईतील सुमारे 40/50 टक्के भाग झोपड्यानी व्यापलेला आहे.या शहरातील सफाई पासून अन्य कोणत्याही कामासाठी झोपडीधारकांचा उपयोग होतो. सफाई,घरकाम,मजुरी अन्य अनेक छोटी-मोठी कामे करण्यासाठी झोपडीधारकांचा प्राधान्याने उपयोग केला जातो. राजकारणात मते मिळवून देण्यासाठी झोपडीधारक आघाडीवर असतो.पक्षाच्या उमेदवाराचे भवितव्य झोपडीधारक ठरवितो.पण गरीब झोपडीधारकाच्या भवितव्याचे काय? उमेदवार जिंकला की उमेदवाराच्या पाच पिढ्यांची काळजी मिटते.पण झोपडीधारकाची,नेत्यांची हुजरेगिरी करून हळूहळू एक एक पिढी संपून जाते.आपले पुनर्वसन कधी होणार असे 15 ते 20 वर्ष आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या झोपडीधारकांसाठी ही योजना आहे की अन्य कुणासाठी? आणि मग मनात काहूर माजते, मन विचलित होते,त्यामुळे प्रश्न पडतो की,------

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण ----- पण उत्तर सापडत नाही.
----------------------------------------

4) मुंबई महानगरात अनेक पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत. यामागे कुठे कायद्याचा प्रश्न,कुठे आर्थिक प्रश्न,कुठे फसवेगिरी,कुठे दादागिरी,कुठे राजकीय दबाव, कुठे प्रलोभन,कुठे भ्रष्टाचार,कुठे प्रकल्पाची दुसऱ्याला विक्री, कुठे कालमर्यादा अभाव अशी अनेक कारणे समोर येतील.त्यामुळे नाहक झोपडीधारक पुनर्वसनापासून दूर फेकला जातोय. मग प्रश्न पडतो की----

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण -----पण उत्तर सापडत नाही.
----------------------------------------

5) माझ्या सामान्य बुद्धीला असे वाटते की,याचे खरे उत्तर हे शासनाच्या प्रमुख महोदयांकडे सापडेल. कारण शासनाने झोपडीधारकांच्या भल्यासाठी अत्यंत चांगल्या हेतूने ही योजना सुरू केली.योजना सुरू करणे सोपे होते,परंतु अंमलबजावणी कठीण झाली.योजना शासनाची, कायदे शासनाचे,अंमलबजावणी ही शासनाची,पण या योजनेचा ज्याला जसा हवा तसा अर्थ लावून,आपला वैयक्तिक फायदा कसा होईल,यासाठी कायद्याचा किस काढून,कायद्याला बगल देऊन, अनेक प्रस्तावांचे पूर्ण वाटोळे झाले आहे.अनेक झोपडीधारक घराबाहेर आहेत. अनेक जण बेघर होऊन देवा घरी गेले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर हे गांभीर्य कुणालाच कळले नाही,तर मग प्रश्न पडतो की-----

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण ----पण उत्तर सापडत नाही.
----------------------------------------

6) ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुळात होऊच नये,असा कुणाचा उद्देश आहे काय?कारण हा प्रश्न जेवढा प्रलंबित राहील तेवढी झोपडीधारकांची आशा जिवंत राहील आणि त्या आशेपोटी,अनेकांना त्या आशेच्या शेकोटीवर आपली पोळी भाजून घेता येईल.अशी मानसिकता तयार होतेय का ? एक म्हण आहे," प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे " परंतु ही म्हण बदलताना दिसते,ते असे की प्रेत लवकर आणि व्यवस्थित जळावे यासाठी प्रेताच्या अंगाला लोणी,तूप लावले जाते तेही चाटणाऱ्यांची औलाद निर्माण होतेय काय?अशी शंका येते. खरंच जे झोपडीधारक पुनर्वसनाचे स्वप्न पहात मयत झाले आहेत,त्यांच्या वारसांना घर मिळेल काय? मग प्रश्न पडतो की------

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण -----पण उत्तर सापडत नाही,
----------------------------------------

मन विचलित आहे.मात्र पत्र विस्ताराला आवर घालणे आवश्यक आहे.महोदय आपण ठरविल्यास उपरोक्त प्रश्नांची उत्तरे सापडतील असा पूर्ण विश्वास आहे.ज्या उत्तरात झोपडीधारकांचे भवितव्य सामावलेले आहे. त्या उत्तराचा उलगडा होऊन आपणाकडून असे कायमस्वरूपी काम व्हावे की, मुंबई शहरातील झोपडीधारक व त्याची येणारी पिढी आपणास आशीर्वाद देतील. हे आशीर्वाद आपणास आणि आपल्या पुढील पिढीला वरदान ठरतील.गरिबांच्या शाप व वरदानाची ताकद ही परमेश्वराच्या वरदानापेक्षाही अधिक असते हे विसरून चालणार नाही मग प्रश्न पडतो की------

ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुणासाठी ????

पण ------पण उत्तर सापडेल असा पूर्ण विश्वास आहे.
----------------------------------------

आपल्या सकारात्मक उत्तराकडे माझ्यासोबत राहणारे 1329 झोपड्यातील सुमारे 6500 झोपडीधारक व मुंबई शहरातील लाखो झोपडीधारक आशेने पाहत आहेत.महोदय,सदरचे पत्र आपले चरणी अत्यंत विनम्रपणे सादर करीत आहे. आयुष्याच्या शेवटी या जगातून जाताना झोपडीधारकांचा आशीर्वाद मिळावा आणि आयुष्याचा शेवट गोड व्हावा हीच आपल्या व परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना.

उपरोक्त पत्राचा गंभीरपणे विचार होऊन कार्यवाही व्हावी ही विनम्र प्रार्थना.कळावे.

(टीप : हे पत्र नागरिक सहकारी गृहनिर्माण संस्थेपुरते मर्यादित नसून,मुंबई शहरातील जे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडलेले आहेत, त्या सर्वांची व्यथा सांगणारे आहे. शासनाकडे व प्रसार माध्यमांकडे ते पोहोचावे आणि आपल्याला न्याय मिळावा हीच या पत्रामागची प्रामाणिक भावना आहे.)

आपला नम्र

श्रीकृष्ण गणपत गोसावी
सेवानिवृत्त तहसीलदार
( मो. नं.9969654848 )

22/08/2023

पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते.
परंतू "राजगुरू"मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही.
ही काय दर्जाची उपेक्षा. म्हणायची......?
या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले.
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता.
ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता.
नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता.
एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला - हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो.

साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही.असे होते राजगुरू!

(आज हुतात्मा राजगुरुंची इंग्रजी तारखेप्रमाणे जयंती. त्यानिमित्त पूर्वी लिहिलेल्या एका लेखातील हा संपादित अंश.)
संकलीत लेख.

💐💐💐💐 हुतात्मा स्वातंत्रवीर मर्द मराठी विर "राजगुरु जयंती"निमित्त अभिवादन
( Forwarded By
दंडवते 18-08-2019)

16/08/2023

"पाणवठा" भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम | ग्रेट-भेट - श्री गणराज जैन

https://www.youtube.com/watch?v=u_6_xeoGK9s

श्री गणराज जैन यांनी अपंग आणि अनाथ प्राण्यांच्या सेवा संगोपन करणाऱ्या ‘पाणवठा’ ह्या त्यांच्या संस्थेविषयी माहिती सांगितली तसेच त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणी मन माझे ग्रुप सोबत शेयर केल्या.

श्री गणराज जैन आणि डॉ. अर्चना जैन यांनी सुरु केलेले "पाणवठा" हे भारतातील पहिले अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम आहे. या आश्रमात अंध, अपंग किंवा अपघातात जखमी झालेल्या पाळीव-जंगली पक्षी-प्राण्यांचे विनामूल्य उपचार केले जातात आणि अगदी पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांची इथे काळजी घेतली जाते आणि त्यांना कायमस्वरूपी आसरा दिला जातो. अनेक प्रकारच्या सामाजिक तसेच आर्थिक अडचणींना तोंड देऊन श्री गणराज जैन आणि डॉ. अर्चना जैन इथे सर्व प्राण्यांची काळजी घेत आहेत.

३ वेळा अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे या आश्रमाचे खूप नुकसान झाले होते आणि त्यासाठी आता ह्या प्राण्यांना कायमस्वरुपी सुरक्षित अशी जागा देण्यासाठी प्रयन्त सुरु आहेत आणि त्यासाठी खूप आर्थिक मदतीची गरज आहे. आज अगदी स्वतःचे घरदार, मौल्यवान वस्तू ,फर्निचर इत्यादी विकून जैन परिवार या आश्रमाच्या पुर्नवसनाचे काम करत आहेत.

मन माझे ग्रुप तर्फे आम्ही सर्वाना, विविध संस्था, दानशूर व्यक्तींना आम्ही आवाहन करत आहोत कि तुम्ही सुद्धा एकदा पाणवठा अनाथाश्रमाला भेट द्या आणि काही आर्थिक मदत करून आश्रमाच्या कार्याला हातभार लावावा.

आश्रमाचा पत्ता:
पाणवठा अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम
कांबरी फार्मच्या मागे, पोद्दार कॉम्प्लेक्स जवळ,
बदलापूर-कर्जत रोड, चामटोली, बदलापूर (पूर्व)

धन्यवाद
मन माझे ग्रुप

11/08/2023

वसई विरार शहरात पोलिसांची धडक कारवाई👍🏼
वसई विरार मध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी घर घेत असाल किंवा घेतलं असेल तर त्यांनी ही व्हिडीओ वेळ काढून नक्की बघा🙏🏼

Fraud CC, Approve plan, OC copy building's 👆🏻

1) Rudransh Apartment, Virar East.
2] Siddharth Apartment, Virar East.
3] Jivdani Darshan, Virar East.
4] Anandi villa Apartment, Virar East.
5) Gurakrupa Apartment, Manvel Pada, Virar East.
6) Gurukrupa Apartment, phool Pada, Virar East.
7) Akshay Visava Apartment, Virar East.
8) Ambika Apartment, virar East.
9) Ekta Apartment, Virar East.
10) Vinayak Apartment, Virar East.
11) Sai siddhi Apartment, virar East.
12| Omkar Apartment, virar East.
13) Amit Apartment, Virar East.
14) Prem Apartment, Virar East.
15) Jagdish Apartment, Virar East.
16) Mahashakti Apartment, Virar East.
17) Falak Apartment, Virar East.
18) Jayashree Apartment, Virar East.
19) Jaganth Nagar Apartment, Virar East.
20) OM Apartment, Virar East.
21) Hanse Apartment, Virar East
22) Shole Apartment, Virar East.
23) Sai darshan, Virar East.
24) Paras Apartment, Virar East.
25) Shree siddhi building 1, Virar East.
28) Shree siddhi building 2 virar East.
29) Shree siddni building 3, Virar East.
28) Shivsal Sankul, Virar East.
29) Damodar Apartment, Virar East.
30) All 22 bulldings of sant Nagar, Virar East

07/01/2023

जंजिरे अर्नाळा : इतिहास सफर

🗒️कधी व कुठे :
शनिवार दिनांक १४ जानेवारी, अर्नाळा किल्ला, विरार (पश्चिम)

⏱️सर्वसाधारण नियोजन :
- स. ८.०० विरार स्थानक
- स. ८.३० अर्नाळा गावात पोहोचणे
- स. ९.०० वाजेपर्यंत चहा/नाश्ता
- स. ९.३० वाजेपर्यंत बोटीने किल्ल्यावर पोहोचणे
- स. ९.३० ते दु. १२.०० दुर्गसफर व माहिती
- दु. १२.०० ते दु. १.३० जेवण व विश्रांती
- दु. १.३० ते दु. ४.०० दुर्गसफर व माहिती
- सायं. ४.३० वाजेपर्यंत परत अर्नाळा गावात पोहोचून चहा
- सायं. ५.०० कार्यक्रमाची सांगता

📣वैशिष्ट्ये :
- सफर: इतिहास अभ्यासक श्रीदत्त नंदकुमार राऊत यांच्यासोबत किल्ल्याची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वारावरील शिलालेख व ईतर ऐतिहासिक वास्तू तसेच पुरातन मंदिरे आणि मुर्त्या.
(शक्य झाल्यास हणमंत बुरूज व भुयारी मार्ग)

- माहिती: दुर्गबांधणी व किल्ल्याचा इतिहास, किल्ल्याचे भा़ैगोलिक व ऐतिहासीक महत्व, वसईची मोहीम, मराठा-पोर्तुगीज युद्ध इत्यादी.

💸सफर शुल्क: रू.६५०/- मात्र

☕समाविष्ट :
किल्ल्याची सफर व माहिती, फेरी बोटीच्या प्रवासाची तिकीटे, सकाळचा चहा/ नाश्ता, दुपारचे जेवण (व्हेज) व संध्याकाळचा चहा ई.

🚙कसे पोहोचाल :
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात उतरून पश्चिमेस असलेल्या स्टेशनलगतच्या बस थांब्याहून अर्नाळा गावाकडे येण्यासाठी परिवहन मंडळाच्या तसेच महानगरपालिकेच्या बसेस सुटतात त्या थेट अर्नाळा गावातील पारनाक्याजवळ सोडतात. (शिवाय प्रायव्हेट व शेअर रिक्षा/ओला-उबर देखील मिळू शकतात. शेअर रिक्षा देखील पारनाक्याजवळच् सोडतात.)

🎒काय आणाल :
- प्रत्येकी एक लीटर पाणी
- टोपी, सनग्लासेस, सनस्क्रीन लोशन ई.
- गरजेनुसार आ़ैषधे, ग्लुकोज वगैरे

📞सहभागी होण्यासाठी संपर्क साधा :
+91 99692 85045

(लिमिटेड सीट्स असल्याकारणाने बुकिंग लवकरच् बंद होईल, तसंच ॲडव्हान्स बुकींगशिवाय प्रवेश स्वीकारला जाणार नाही. डिस्काउंट अथवा फुकट पासेस मागू नयेत.)

🚭सूचना :
१. नियोजन तासभर पुढे मागे होऊ शकेल. त्यातील सर्व प्रकारच्या बदलांचे सर्वाअधिकार आयोजकांकडेच रहातील.
२. वर नमूद न केलेल्या कोणत्याही गोष्टी सफर फी मध्ये समाविष्ट नसतील.
३. सफरीदरम्यान धुम्रपान तथा मद्यपान निषिद्ध असल्याने कोणीही व्यक्ती असे गैरप्रकार करताना आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
४. सदर सफर ही पर्यावरणपूरक असल्याने प्रत्येकाने प्लास्टिक तथा इतर कचऱ्याची योग्य ती सोय लावावी.

- भोवरा
भिरी भिरी भ्रमंती

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्ट : 127Km अंतरासाठी 60,000 कोटींचा निधी, ‘या’ दिवशी होणार कामाचा श्रीगणे 04/01/2023

https://shetishivar.com/government-scheme/virar-alibaug-corridor-project-info-in-marathi/

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्ट : 127Km अंतरासाठी 60,000 कोटींचा निधी, ‘या’ दिवशी होणार कामाचा श्रीगणे एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास सरकारला किती तोटा सहन करावा लागतो, याचं सर्वात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे विरा.....

20/08/2022

झणझणीत वास्तव

मला एक गोष्ट कधीच समजली नाही की हे कलाकार किंवा अभिनेत्री असे काय करतात की त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी किंवा 100 कोटी मिळतात?

ज्या देशात अव्वल शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, अधिकारी इत्यादींना वर्षाला 10 लाख ते 20 लाख रुपये मिळतात, त्या देशात एक चित्रपट अभिनेता वर्षाला 10 कोटी ते 100 कोटी रुपये कमावतो.

शेवटी तो काय करतो?

देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय? शेवटी, तो काय करतो की त्याने फक्त एका वर्षात एवढी कमाई केली की देशातील सर्वोच्च शास्त्रज्ञ होण्यासाठी कदाचित 100 वर्षे लागतील!

आज ज्या तीन क्षेत्रांनी देशाच्या नव्या पिढीला भुरळ घातली आहे ती म्हणजे चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण.

या तिन्ही क्षेत्रांतील लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा सर्व मर्यादेपलीकडे आहे.

ही तिन्ही क्षेत्रे आधुनिक तरुणांचे आदर्श आहेत, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे ते देश आणि समाजासाठी निरुपयोगी आहे.

बॉलीवूडमध्ये ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, गुंडगिरी आणि राजकारणात भ्रष्टाचार. या सगळ्यामागे पैसा हे मुख्य कारण आहे आणि हा पैसा आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचवतो.

आपलेच पैसे जाळून आपण आपलेच नुकसान करत आहोत. ही मूर्खपणाची उंची आहे.

70-80 वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य मानधन मिळायचे.

30-40 वर्षांपूर्वीपर्यंत क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती.

30-40 वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणात एवढी लूट होत नव्हती.

हळूहळू त्यांनी आम्हाला लुटायला सुरुवात केली आणि आम्ही आनंदाने लुटत राहिलो.

या माफियांच्या तावडीत अडकून आपण आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहोत.

50 वर्षांपूर्वीपर्यंत इतके अश्लील आणि फालतू चित्रपट बनत नव्हते. क्रिकेटपटू आणि राजकारणी इतके अहंकारी नव्हते. आज तो आपला देव (?) झाला आहे. आता त्यांना डोक्यावरून उचलून मारण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना त्यांची स्थिती कळेल.

एकदा, व्हिएतनामचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हो-ची-मिन्ह भारतात आले असताना, भारतीय मंत्र्यांच्या भेटीत त्यांनी विचारले - "तुम्ही काय करता?"

हे लोक म्हणाले - "आम्ही राजकारण करतो."

हे उत्तर त्याला समजू शकले नाही, म्हणून त्याने पुन्हा विचारले - "म्हणजे, तुझा व्यवसाय काय आहे?"

हे लोक म्हणाले - "राजकारण हा आमचा पेशा आहे."

हो-ची मिन्ह जरा वैतागला आणि म्हणाला - "कदाचित तुम्हा लोकांना माझा अर्थ समजला नसेल. मी पण राजकारण करतो, पण व्यवसायाने मी शेतकरी आहे आणि शेती करतो. शेतीतूनच माझा उदरनिर्वाह चालतो. सकाळ संध्याकाळ मी माझ्या शेतात जातो. मी काम करतो. राष्ट्रपती या नात्याने मी दिवसा देशाची जबाबदारी पार पाडतो."

जेव्हा हो-ची-मिन्हने पुन्हा तेच विचारले तेव्हा शिष्टमंडळातील एक सदस्य खांदे उडवत म्हणाला - "राजकारण हा आमचा व्यवसाय आहे."

याला भारतीय नेत्यांकडे उत्तर नव्हते हे स्पष्ट आहे. भारतातील 6 लाखांहून अधिक लोकांच्या रोजीरोटीला राजकारणाचा आधार असल्याचे नंतर एका सर्वेक्षणातून समोर आले. आज हा आकडा कोटींवर पोहोचला आहे.

काही महिन्यांपूर्वी, जेव्हा युरोप कोरोनाने उद्ध्वस्त होत होता, डॉक्टरांना सलग अनेक महिने थोडीशी सुट्टीही मिळत नव्हती, तेव्हा एक पोर्तुगीज डॉक्टर रागाने म्हणाला - "जा रोनाल्डोकडे, ज्याला लाखो डॉलर्स देणार. पाहण्यासाठी. मला फक्त काही हजार डॉलर्स मिळतात."

ज्या देशात तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ नसून अभिनेते, राजकारणी, खेळाडू असतील, त्यांची स्वत:ची आर्थिक प्रगती होईल, पण देशाची कधीच प्रगती होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे.

सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सामरिकदृष्ट्या देश नेहमीच मागासलेला राहील. अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील.

ज्या देशात अनावश्यक आणि असंबद्ध क्षेत्राचा दबदबा वाढत राहील, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल. देशात भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढतच जाणार आहे. प्रामाणिक लोक उपेक्षित होतील आणि त्यांना कठीण जीवन जगण्यास भाग पाडले जाईल.

प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, समाजसेवक, लढाऊ, देशभक्त नागरिक तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण वातावरण तयार केले पाहिजे.

वाचण्यासारखे आहे. ....✍️
jagdish gaikwad

Photos from Virar shahar's post 06/08/2022
06/08/2022

: मोदी सरकार मध्ये हिम्मत असेल यांच्यावर ED ची चौकशी लावणार का? 2014 नंतर झोपेचे सोंग घेतलेल्या सर्वांसाठी..!! मात्र इथं ED ईडी का चालणार नाही ?
1) पंकजा मुंडे 206 कोटी चिक्की घोटाळा
2) पंकजा मुंडे 7200 कोटी टी.एच.आर घोटाळा
3) देवेंद्र फडणवीस- 1700 कोटी सिडको खारघर जमीन घोटाळा
4) देवेंद्र फडणवीस- मुंबई डीपी घोटाळा
5) देवेंद्र फडणवीस : 2800 कोटी युएलसी जमीन घोटाळा
6) देवेंद्र फडणवीस : महा ई- परीक्षा पोर्टल घोटाळा
7) प्रकाश मेहता : एम पी मिल कंपाऊंड एफएसआई घोटाळा 1200 कोटी
8) सुभाष देशमुख : तूर भरडाई घोटाळा 2000 कोटी
9) सुभाष देशमुख : लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा
10) जयकुमार रावळ तोरणमाळ हिल रिसॉर्ट घोटाळा 49 कोटी रुपये
11) जयकुमार रावळ चा रावळ बँक घोटाळा 369 कोटी रुपये
12) जयकुमार रावळ गड किल्ले हॉटेल्स बार ला विक्री करणे घोटाळा
13) विनोद तावडे अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा 191 कोटी रुपये
14) विनोद तावडे 114 कोटी रुपये राष्ट्रपुरुष तस्वीर व अर्ली रीडर्स बुक खरेदी घोटाळा
15) विष्णू सावरा आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा
16) गिरीश बापट तूरडाळ घोटाळा
17) अंगणवाडी मोबाइल खरेदी, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा
18) बीएमसी रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा
19) धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दोंडाईचा भुसंपादन घोटाळा
20) चन्द्रकांत पाटील पुणे जमीन घोटाळा
21) देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मेटे यांनी एक ही वीट न लावता 80 कोटी शिवस्मारक घोटाळा केला.
22) पंकजाताई चेअरमन असलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना वर सुमारे 900 कोटी रुपयाचे कर्ज थकीत. शेकडो कोटींचा तोटा.

यांना ईडी लावली तर भाजपा ची मोठी इनकमिंग कशी होईल ?
कोटी कोटी भाजपा ?

अत्यंत महत्वपूर्ण माहिती:-

1. सोमाभाई मोदी (75 वर्ष) सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत.

2. अमृतभाई मोदी (72 वर्ष)
पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत.

3. प्रह्लाद मोदी (64 वर्ष) यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत.

4. पंकज मोदी (58 वर्ष) पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात.

5. भोगीलाल मोदी (67 वर्ष) किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत.

6. अरविंद मोदी (64 वर्ष) हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत.

7. भारत मोदी (55 वर्ष) पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे.

8. अशोक मोदी (51 वर्ष) यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत.

9. चंद्रकांत मोदी (48 वर्ष) एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत.

10. रमेश मोदी ( 57 वर्षे) शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

11.शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (44 वर्ष) हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत

12. बिपिन मोदी (42 वर्ष) अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत.

1 ते 4 - पंतप्रधान मोदी यांचे भाऊ

5 ते 9 - मोदींचे चुलत भाऊ

10 - जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा

11 - भार्गव कांतीलाल, 12 - बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आह ..
सर्वांना विनंती आहे की हा मेसेज प्रत्येक भारतवासी पर्यंत पोहचला पाहिजे...

भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले आणि दलाल भक्त मंडळी सतत टिमकी वाजवत असतात की म्हणे....
मोदी आपल्या नातेवाईकां समोर गवतसुद्धा घालत नाहीत. परंतु हे सर्व गेल्या कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत.🤷🏻‍♂

(फॉरवर्ड पोस्ट) वास्तव जनतेसमोर यावे

Photos from Virar shahar's post 29/04/2022

Virar west skywalk situations

Want your organization to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai
401303

Other Landmarks in Mumbai (show all)
Juhu Tara Road Juhu Tara Road
Juhu Tara Road
Mumbai, 400049

Dis page is for ol dose who hav deir residence surrounding Juhu Tara Rd or who admire Juhu Beach along wid dis road.Also for dose who like ol da hotels, restaurants,clubs&pubs surr...

Manori beach, Manori Manori beach, Manori
Mumbai, 400095

One of the best location in Mumbai to relax and have FUN. Beautiful island, wonderful food and amazin

Aga hall (Wadi) Aga hall (Wadi)
Aga Hall, Nesbit Road, Mazgoan
Mumbai, 400010

This page is 4 all d lovers of wadi aga hall..d best place 2 live in mazgoan....:D

Childish Politics Childish Politics
Mumbai, 400066

Disclaimer dated 26th of December 2016 posted in this groups page applies on you for viewing this group or if you are a member of this group.

Ismail Building, Flora Fountain Ismail Building, Flora Fountain
Ismail Building, Veer Nariman Road, Flora Fountain, Fort
Mumbai, 400001

A 113-year-old 5-storey heritage structure in Mumbai with balconies and brickwork, giving the Flora Fountain area a much-needed nip and tuck.

APNA Mumbai APNA Mumbai
APNA Mumbai
Mumbai, 421301

all type off social media advertising

चेंबूर - Chembur चेंबूर - Chembur
R C Marg
Mumbai, 400071

चेंबूर या पेजवर आपले स्वागत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Sahar Road, Andheri East
Mumbai, 400099

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai, formerly known as Sahar International Air

SHOUC SHOUC
Mumbai

Video Songs

Shon Akhon Khanki Shon Akhon Khanki
Mumbai, 400614

Hi I Am Riad

Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Terminus Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Terminus
Dadar East Railway Station Road
Mumbai, 400014

दादर स्थानकाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस, (BACT) झाले पाहिजे या मागणीसाठी आग्रही.