MahaJyoti
'ध्यास आधुनिक समताधिष्ठित समाज निर्माण’
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या घटकांचा सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि शाश्वत विकासकरिता 'महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून वरील तीनही घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगार वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक
#महाज्योतीनागपूर
#महाज्योतीनागपूर
हा फोटो महाज्योती लोकाभिमुख असल्याचे चित्र आहे!
दिनांक 08/08/2024 महाज्योतीचा ५ वा वर्धापन दिन साजरा झाला, त्यात कर्मचार्यांना महाज्योतीने जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी काम केले पाहिजे असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.राजेश खवले साहेब यांनी केले. या आवाहनाला कर्मचारी प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे!
आज पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेत सहभागी विद्यार्थ्यांचे कागदपत्र Verification सुरु आहे, त्यात एक महिला एका हातात Walker घेऊन आणि एका हातात बाळ घेऊन महाज्योतीच्या कार्यालयाखाली बसली होती.
कार्यालयाची Light गेलेली त्यात लिफ्ट देखील बंद! हताश बसलेली महिला बघून प्रीतेश मेश्राम या कर्मचाऱ्याने त्यांची चौकशी केली असता ती पीएचडी अधिछात्रवृत्तीच्या कागदपत्र पडताळणी करिता आल्याचे लक्षात आले. Verification कक्षात जाता येणार नाही म्हणून काळजीत असल्याचे तिने सांगितले, याची नोंद घेऊन तातडीने पीएचडी विभागातील धम्म गजभिये यांनी खाली जाऊन त्या महिलेचे Verification करून दिले.
तिने महाज्योतीचे आभार व्यक्त केले!
Nagpur
#महाज्योतीनागपूर
आज दि. 22.08.2024 रोजी पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेत सहभागी विद्यार्थ्यांचे कागदपत्र Verification सुरु आहे, त्यात दोन्ही पायाने दिव्यांग असलेले विद्यार्थी महाज्योतीच्या कार्यालयाखाली बसले होते.
कार्यालयाची लिफ्ट देखील बंद! हताश बसलेल्या विद्यार्थ्याला बघून तातडीने पीएचडी विभागातील स्वप्नील वंजारी व विक्रम सरोदे यांनी खाली जाऊन त्या विद्यार्थ्यांचे Verification करून दिले.
विद्यार्थ्याने महाज्योतीचे आभार व्यक्त केले!
Nagpur #महा ज्योती नागपूर
# set bharti # digitaleducation
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधकी विचार आजही महत्वाचा : सप्तखंजिरीवादक कीर्तनकार तुषार सूर्यवंशी
महाज्योती कार्यालयात महात्मा जयंती कार्यक्रमानिमित्त व्याख्यान कार्यक्रम
“क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला सत्यशोधकी विचार दिला, सत्याच्या विचाराने जीवन आनंदी व सुखी होण्यास मदत होते आणि तोच विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या संपूर्ण जीवन कार्यातून दिला आहे. कृतीशील विचारवंत म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देखील महात्मा फुले यांचा ग्रामगीतेत गौरव केलेला असून मानवतावाद हेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचे सार आहे” असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक कीर्तनकार तुषार सूर्यवंशी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी तुषार सूर्यवंशी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रबोधन परंपरेच्या विचार कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.राजेश खवले, सहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले, प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे व लेखाधिकारी श्री.बोधनकर उपस्थित होते.
“महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धांचे निर्मूलन, विषमतेला विरोध करीत स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांसाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या विचारांवर कार्य करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे” असे ही सूर्यवंशी म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्यात मनुष्याच्या जीवनाचा सार समावलेला आहे. शोषणातून मुक्ती आणि सकारात्मक समाजाची निर्मिती हा त्यांच्या जीवनाचा संदेश आहे. महाज्योती संस्थेमार्फत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणे हा आपल्या कामाचा उद्देश असायला हवा असे प्रतिपादन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. राजेश खवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
या प्रसंगी श्री.धम्म गजभीये यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती भावना पटले यांनी आभार प्रदर्शन केले.
#महात्माज्योतीबाफुलेजयंती2024
मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन 18 व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या शैक्षणिक विचारांच्या ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांच्या कार्याचा वसा घेतलेल्या महाज्योतीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#महाज्योतीनागपूर
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, MA/15/1, S Ambazari Road, Vasant Nagar
Nagpur
440020
Opening Hours
Monday | 10am - 6pm |
Tuesday | 10am - 6pm |
Wednesday | 10am - 6pm |
Thursday | 10am - 6pm |
Friday | 10am - 6pm |
Saturday | 10am - 6pm |
Room No. 19 , 20 Tahsil Offfice, Nagpur (Urban), Civil Lines Nagpur, Nagpur, India
Nagpur
Takli Feeder Road, Rajnagar
Nagpur, 440013
Ministry of Home Affairs Government of India #We_Serve_To_Save
Nagpur, 440002
A page of Nagpur Mofussil Division
Wardha Road Near FCI Godown Chuna Bhatti
Nagpur, 440015
HI FRIENDS WE PROVIDE GOVERNMENT RELATED SERVICES
Near Mangalwari, Sadar
Nagpur, 440001
Continuing Education is one of the important services provides by the institute to the society. The activity initiated under World Bank Project (WBP), was again fostered through th...
VANAMATI, VasantraoNaik State Agriculture Extension Management Training Institute 626, VIP Road, Gorepeth
Nagpur, 440010
Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute
Raman Science Centre Subhash Road Near Gandhi Sagar Lake
Nagpur, 440018
Innovation Centre is providing a platform to the youth of Vidarbha to engage in innovative and creative activities. The underlying idea is to promote scientific and critical thi...
R. T. Road, Civil Lines, Opp. Air India Office
Nagpur, 440008
Government of Maharashtra Autonomous Institute affiliated to RTM Nagpur University